Skip to main content

चित्रपट

चार फूल हैं और दुनिया है आणि परफेक्ट डेज

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी सोमवार, 12/01/2026 या दिवशी प्रकाशित केले.
हा चित्रपट मी खूपदा पाहिला आहे. खूप मेडिटेटिव असा हा चित्रपट आहे. अगदी जादू केल्यासारखा धरून ठेवतो. x विनोदकुमार शुक्ल गेले. हा चित्रपट आणि विनोदकुमार शुक्ल यांच्यातला एक दुवा जुळून आला. त्यांच्यावर केलेली "चार फुल हैं और दुनिया है" ही डाक्यूमेंट्री मागच्या वर्षी मुबईवर पहिली होती.

सेव्हन इयर्स इन तिबेट-seven years in Tibet

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 08/01/2026 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो तेव्हा लेक एका कोकरासारखे स्वछंद बागडत होती. तेवढ्यात ती एक पुस्तक घेऊन आली ,"हे पुस्तक मला पाहिजे आहे ". पुस्तकाचे पूर्ण नाव आठवत नाही पण 'माओ झेडाँग' या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा संस्थापक यांच्या आयुष्यावरचे ते पुस्तक होते. "तुला माहितेय का,कि हा कोण आहे?"मी विचारले ."चीनचा कम्युनिस्ट माओ "मला माहिती आहे ती म्हणाली. आज तू नळीची कृपा म्हणावी कि काय तिला पहिले महायुद्ध ,दुसरे महायुद्ध ,हिटलर ,रशिया ,चीन,जपान ,अमेरिका यांची बरीच माहिती आहे . त्यातलाच एक हा 'माओ' याबद्दल तिला माहिती आहे.

निशानची (हिंदी सिनेमा)

लेखक मन यांनी सोमवार, 05/01/2026 या दिवशी प्रकाशित केले.
‘निशानची’ (अर्थ : नेमबाज, बंदुकबाज, sniper) ह्या सिनेमाचे दोन्ही भाग आवडले. सिनेमाचा विषय एका पैलवान असणाऱ्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबाची झालेली स्थिती, त्या परिस्थितीला दोन भिन्न स्वभावाच्या जुळ्या भावांनी आणि नेमबाजीमध्ये तरुणपणी निपुण असणाऱ्या,  पदकविजेत्या त्यांच्या आईने दिलेलं तोंड, त्यानंतर उलगडत जाणाऱ्या घटना, नवीनच माहिती होत गेलेले धागेदोरे आणि दरम्यान वाढत गेलेली गुंतागुंत असा काहीसा सांगता येईल. अनुराग कश्यपच्या इतर काही सिनेमांप्रमाणेच ह्यातही महिला पात्रे निव्वळ पूरक भूमिका म्हणून, सोबत असायला हवीत म्हणून अशी असण्यापलीकडे आहेत.

'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 11/12/2025 या दिवशी प्रकाशित केले.

सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.

दशावतार - आठवणींची साठवण

लेखक चिमी यांनी गुरुवार, 25/09/2025 या दिवशी प्रकाशित केले.
||श्री कातळोबा प्रसन्न|| ढिशक्लेमर – हा दशावतारचा review नाही. फक्त काही आठवणींची साठवण. शनिवारी दुपारी घरातली सगळी कामं आवरली आणि बहिणीला call केला - ‘ए वैदू, उद्या दशावतार बघायला जायचं का?’ “हो चल ना, जाऊ की, मी येऊ शकते.” आमच्या बहिणाबाई काहीही आढेवेढे न घेता, अगदी पहिल्या झटक्यात सिनेमा बघायला यायला तयार झाल्या हा माझ्यासाठी अगदी सुखद धक्का होता. म्हणलं मॅडमचा मूड बदलण्याआधी पटकन तिकीट काढून घेऊ. तिकीट book केले आणि facebook उघडले. एव्हाना दशावतारचे reviews यायला लागले होते. एक-एक review वाचून मला अगदी तळ्यात – मळ्यात होत होतं.

चित्रपट परिक्षण:मला भावलेला चित्रपट "मियळगन" (Meiyazhagan)....(Spoiler Alert )

लेखक श्वेता२४ यांनी शनिवार, 23/08/2025 या दिवशी प्रकाशित केले.
फोटो

तुमच्या अतिशय तरल आणि सुंदर आठवणी ज्या राहत्या घराशी निगडीत आहेत असे घर कायमस्वरूपी सोडण्याची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का?

रहें ना रहें हम महका करेंगे... एका गीताचे अनेक प्रतिध्वनी!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 05/08/2025 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच. पण तुम्हांला हे माहिती नसेल की, ह्या चारही गीतांची चाल एकमेकांशी विलक्षण जुळते!

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 06/06/2025 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित "ड्युअल (Duel)"

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 21/05/2025 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर ड्युअल (Duel) हा चित्रपट खूप आधी देखील पाहिला होता, आवडलाही होता. परवा घरचे इंटरनेट मुसळधार पावसामुळे बंद पडले असल्यामुळे हार्ड डिस्क टीव्हीला जोडून पुन्हा एकदा पाहिला. स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित ड्युअल (१९७१) हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या जीवघेण्या संघर्षावर आधारित आहे, ज्यामध्ये भय, मानसिक तणाव आणि अस्तित्वाची झुंज यांच्यापासून निर्माण झालेल्या थराराने पुरेपुर भरलेला आहे. हा चित्रपट स्पिलबर्गचा केवळ दुसराच पूर्ण लांबीचा चित्रपट असून, त्याने त्याच्या कारकीर्दीची ठोस पायाभरणी ह्याद्वारे केली.

मराठी / हिंदी चित्रपटा मधील चाली

लेखक स्वरुपसुमित यांनी रविवार, 16/02/2025 या दिवशी प्रकाशित केले.
आप लेल्या मजेदार अश्या वाटलेलया गाण्याचा ओळी शेअर करा ९० मधे सर्वात मजेदार जब् तक रहेगा समोसे मे आलू तेरा रहुंगा मै शालु सध्या शनै वार राती मुझे नींद नही आती झाड से टुट के हम गिर पडे तुम्ही पण अजुन सुचवा