मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

औषधोपचार

डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग ९

अवलिया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील भाग - http://misalpav.com/node/16898 ***
माझ्या लहानपणच्या ज्या आठवणी अजून लक्षात आहेत त्यातली अगदीच लख्ख आठवणारी आठवण म्हणजे, संध्याकाळी आजीबरोबर विठोबाच्या देवळात जाणे. आमच्या गोरेगावात घरापासून अगदीच जवळ अशी तीन चार देवळं होती. एक अगदीच जवळ असणारं दुर्गादेवीचं. दुसरं म्हणजे गोगटेवाडीतलं गणपतीचं, पण ते जरा लांब. आणि तिसरं हे गवाणकर वाडीतलं विठोबाचं. आजी हिंडती फिरती असे पर्यंत वारानुसार, तिथीनुसार रोज संध्याकाळी देवळात जायची. विठोबाच्या देवळात जायचं म्हणजे आरे रोड ओलांडावा लागायचा. त्यावेळी तिला सोबत लागायची. मग आमची वरात निघायची तिच्यामागे.

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ८

अवलिया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील भाग - http://misalpav.com/node/16883 *** अनेक कथा कादंबर्‍या आपण वाचतो. काही आवडतात, काही आवडत नाहीत. काहींचा काही भाग आवडतो. कुणाला त्याबद्दल सांगायला जावे तर आवडली किंवा आवडली नाही किंवा ठिक आहे.. पण या दोन तीन ठराविक प्रतिक्रियांपलीकडे आपली सहसा मजल जात नाही. जाईलच कशी? जे काय कळले आहे, जे काही समजले आहे त्याला शब्दांचे रुप तर देता आले पाहीजे ! हे काही सहजसाध्य नसते. मग कुणीतरी कधीतरी असंच आपण वाचलेल्या कथा कादंबर्‍यांबद्दल काहीतरी लिहीतो आणि आपल्याला असे वाटते की अरे हे तर मला मांडायचे होते तसेच आहे.

डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग ७

अवलिया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील भाग - http://misalpav.com/node/16851
मीटींगमदी ठरला क ह्ये गनपती उत्सवान गावचा नाटक बसवाचा. पन ईशय कोन्ता ? कूनी म्हनालं सामाजीक ठीवा, त कुनी म्हनल सांस्क्रुतीक , त कुनी आनकी कसला चीक्कार भांडना झायली पन कुन्याव कई बी आयकना. तवा काश्या (माजा बा मंडली, काशिनाथ भोईर, पन तेला सगलीजना काश्या म्हनुनच वलीकतान. आवराच नाय तो सोता पन काशिनाथ म्हुन हाक दील्ली क पाच मिन्ट ईचार करुन ओ देतं) उबा राह्यला न म्हनला "यंदा आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. क र मास्तर ?" मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं. "व्हय व्हय ! आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा.

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ६

अवलिया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक रिकामी जागा बघून मी टेकतो न टेकतो तर दाण दाण दाण असा पावलांचा आवाज करीत प्रोफेसरसाहेब वर्गात शिरले. त्यांच्याहि हातात असलेलं ते जाडजूड पुस्तक त्यांनी धाडकन त्यांच्या पुढ्यातल्या टेबलावर आदळलं. सगळ्या वर्गाकडे बॅटसमन जशी फिल्डींग बघून घेतो तशी नजर फिरवली. आणि अतिशय घनगंभीर आवाजात बोलायला सुरवात केली, "धिस इज ऑरगॅनिक केमिस्ट्री ९०१ क्लास!! फॉर दोज ऑफ यू हू डिड नॉट नो दॅट, धिस इज द राईट टाईम टू गेट अप ऍन्ड गेट लॉस्ट!!" कुणीच उठलं नाही. बहुदा सगळ्यांना आपण कुठे आलोय हे माहिती असावं!! "गूड!! माय नेम इज जॉर्ज कॉल्डवेल!! आय हॅव बीन टीचिंग धिस क्लास फोर द लास्ट टेन इयर्स!

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ५

अवलिया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील भाग - http://misalpav.com/node/16785 *** उन्हाळातल्या लाहा लाहा होणार्‍या दिवसांत अचानक कुठुन तरी चुळुक चुळुक आवाज येतो. घूंगरांचा तो परिचित आवाज येताच मनाला जवळच रसवंती असेल असे समजते आणि कोरड्या झालेल्या घशाला अन तापलेल्या डोक्याला थंड करण्यासाठी पाय आपोआप त्या आवाजाच्या दिशेने चालू लागतात. कधी जोरजोरात आवाज करणारा टेपच जवळच्या रसवंतीची सूचना देत असतो. गेल्याबरोबर हाफ नाही तर फुल्ल ची ऑर्डर देत आपण हाश्श हुश्श करत बसतो. समोर रस येताच पटकन ते अमृत घेत, तृप्त होत परत आपल्या मार्गाने निघुन जातो. किती वेळा आपण त्या रसवंतीत कामाला असलेल्या लोकांचा विचार करतो ? बहुधा नाहीच.

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ४

अवलिया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील भाग - http://misalpav.com/node/16729 *** लहानपणी आई, काकू, मावशी, आत्या ह्या महिला मंडळाच्या एकंदर सरंजामी वृत्तीमूळे, काही आणायचे असले की जा रे नाना हे आणुन दे, काही करायचे असले की जा रे नाना ते करुन दे असल्या हुकुमांचे पालन करता करता केव्हातरी महिला ह्या कुणी भयानक प्राणी आहेत हे माझ्या मनाने पक्के धरले होते. पण हळू हळू केव्हातरी वर्गात नेहमी ड्रेसमधे दिसणारी दोन वेण्या घातलेली दोन बेंच पलिकडे बसणारी मुलगी एका लांबलचक कापडात गुंडाळुन समोर आली की भलती चिकणी दिसते आणि मनाची घालमेल अचानक वाढते हे लक्षात आलं.

भीतीचं इंजेक्शन..!

गवि ·
माझ्या "स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा" या पुस्तकातून ..पण सुधारित आणि पुनर्लिखित.. .................... मी रात्री दोन वाजता भकास डोळ्यानी जागत बसलेला असतो.. छोटा बाळ बाजूला झोपलेला..बायको ही बिचारी शांतपणे डोळे मिटून पडलेली.. सुखात आहेत दोघं.. त्यांना काहीच कल्पना नाही.. हे मल्टिपल स्क्लेरॉसिसचं आत्ताच कळलंय...

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ३

अवलिया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील भाग - http://misalpav.com/node/16707 *** अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय यात साम्य काय आहे आणि यावर काहीतरी लिहा असे जर सांगितले तर आपल्यापैकी किती जणांचे डोके चालेल हे मला माहित नाही. किमान मी तरी असे काही लिहू शकणार नाही हे नक्की. लिहिल्यानंतर लोकांना ते आवडेलच याची खात्री नाही. पण काही जण मात्र आरामात अशा वरवर एकमेकांशी संबंध नसलेल्या शब्दांच्या शीर्षकाचा लेख लिहितात आणि तो वाचला की आपल्याला वाटते "अरे हो यार ! आपण पण असे लिहू शकलो असतो !!

डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग २

अवलिया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझं जन्मगांव सोडलं.. तर माझा संबंध फक्त मुंबईशीच आला.. इतर ठिकाणीही असेच होत असेल असा माझा कयास आहे.. तर, बरेचसे मुंबईतले दाक्षिणात्य- जे स्थलांतरीत होऊन इकडे आले, इकडे जन्मले वाढलेले नव्हेत- त्यांना मराठी/हिंदी कळत असूनही कळत नाही असा आव आणतात आणि फक्त इंग्रजी मध्ये बोलल्यासच उत्तर देतात... याला मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या लोकांचा अपवाद आहे.. अगदी चांगले मराठी बोलणारे खूपसे दाक्षिणात्य परिचयाचे आहेत.... असंच एकदा सगळेजण गप्पा मारत होतो.. गाडी बोलता बोलता.. नेहेमीप्रमाणे.. माझ्या उत्तरभारतीय असण्यावर आली.. एव्हाना याची चांगलीच सवय झाली होती.. मी म्हटलं.. हे तर नेहेमीचे झालं..

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग १

अवलिया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपण अनेक लेख कविता वाचत असतो. त्यातील व्यक्तीरेखा आपल्या मनात घर करुन बसलेल्या असतात. कित्येकदा बोलता बोलता समोरच्या व्यक्तीचे बोलणे किंवा लेखन वाचून आपण आधी कधी वाचलेल्या कथेतील व्यक्तिरेखेशी असलेले साम्य शोधतो. कित्येकदा तसे बोलुनही दाखवतो. पण जर आपल्याला असे सांगितले की ती व्यक्तीरेखाच तुम्ही आहात असे कल्पुन त्या व्यक्तिरेखेचे मनोगत किंवा मनोव्यापार लिहा तर आपल्यापैकी किती जणांना ते जमेल? मला नाही फार हात वर होतील. एखादी व्यक्तीरेखा आपण तयार करुन उतरवणे वेगळे आणि दुसर्‍याने तयार केलेली व्यक्तीरेखा आपण पुन्हा लिहिणे वेगळे. हे येरागबाळ्याचे काम नोहे.. तेथे पाहिजे जातीचे !