Skip to main content

विरंगुळा

रूम नंबर- 9 (गूढकथा)

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 21/10/2017 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
आसावरी सहा महिन्यांची गर्भवती होती. आज कारने ऑफिसला जातांना तिच्या मनात कालच्या “लाईफ वेलनेस सेमिनार” चा विषय घोळत होता. त्यात एकाच गोष्टीवर वारंवार भर दिला गेला होता – “तुमच्या बॉस, सहकारी, हाताखालचे कर्मचारी तसेच आपल्या नातेसंबंधात आणि प्रवासात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या चांगल्या गोष्टींचे योग्य ते कौतुक (योग्य) वेळेवर करायला विसरू नका. जमल्यास रोज एका अनोळखी व्यक्तीला छोटी मोठी मदत करा. कधीतरी नंतर त्याचे फळ आपल्याला मिळावे म्हणून नव्हे तर फक्त आपण या सृष्टीचे काहीतरी देणे लागतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून!

गाण्यांचे शब्द व आमचे मजेशीर शब्द

लेखक dadabhau यांनी मंगळवार, 17/10/2017 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मराठी शाळेच्या दिवसात म्हणजे बच्चनभौ शिखरावर असतांना (जेव्हा दूरदर्शन आमच्या गावात आलेले नव्हते) हिंदी मराठी गाणी फक्त रेडिओ वर च कानावर पडत ( विविधभारती म्हणजे जीव कि प्राण होता आमचा !!) आमच्या गावाच्या पूर्वेस एक ओपन टाकी ( टॉकीज नव्हे...टाकीच) होती , दर मंगळवारी म्हणजे बाजारच्या दिवशी शिनेमा बदलत असे. नवीन आलेल्या पिच्चर चे पोस्टर हातगाडीवर ठेवून ढोल ताशाच्या गजरात गावभर मिरवत असत. आम्ही मुले त्या गाडीमागे गावभर फिरून त्यांच्या जाहिरातीस हातभार लावत असू. देवीची यात्रा १५ दिवस चाले व आमच्या शाळेस सुट्ट्याच असत.

बुलेट घेतल्यापासूनचे सुखद क्षण

लेखक वामन देशमुख यांनी शुक्रवार, 13/10/2017 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
रोज ऑफिसला बुलेटवरच जातो. मनमोकळ्या स्वभावाच्या माझ्या बॉसशी ऑफिसात गप्पा मारताना सहजच म्हणालो, हैद्राबादपासून तीन-चारशे किलोमिटरच्या परिघात मी सर्वत्र बुलेटवर फिरलोय. एक स्कोडा, एक व्हॉल्वो, दोन टोयोटा आणि इतर किरकोळ, ही कौटुंबिक वापराची वाहने असलेल्या बॉसच्या डोळ्यात मनोमन कौतुक आणि (मी प्रवासाला वेळ काढू शकतो म्हणून की काय,) किंचित हेवा तरळला. त्यानं माझ्या पाठीवर थाप मारली व म्हणाला, “तू साला बहोत ऐश करता है!” *** ऑफिसला जाताना मालकिणीला शाळेत सोडतो.

दिमाग का दही (शतशब्दकथा)

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 28/09/2017 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसचा पहिला दिवस. मस्तपैकी लवकर उठलो...अंघोळ वगैरे आटपून कपड्यांना इस्त्री केली...मग घातले! फॉर्मल शर्ट... इन केला. नवा चेरीचा डबा फोडून बुटपॉलिश उरकलं. सकाळी ऑफिसात पायधूळ झटकणारा पहिलाच एम्प्लॉयी. कुठे बसायचं माहित नसल्याने रिसेप्शनला सोफ्यावर रेलून मॅगझीन चाळत बसलो. ऑफिसबॉयने इंटरव्हयूला पाहिलेलं मला.

'किनारा'यण!

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 20/09/2017 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एक बिनशिडाचं तारू भक्कम जहाजाचा आधार सोडून समुद्रात भरकटलं. मग तगण्याचा एकाकी प्रयत्न करू लागलं. त्यावर फक्त तिघे प्रवासी होते. प्रत्येकजण प्रचंड आशावादी, स्वाभिमानी! होडीचं वल्हं आपल्याच हाती आहे अशा समजुतीत वावरणारा! होडी भरकटत चालली तरी, हाच आपला मार्ग आहे आणि याच मार्गाने आपण कि'नारा' गाठणार यावर मात्र तिघांचही एकमत होतं. अशातच समुद्र खवळला. वादळ उठलं. होडी हेलकावे खाऊ लागली. आता आपण काही तरत नाही, या भयानं तिघंही हादरले. लांबवर एक भव्य जहाज खवळलेल्या समुद्रातही संथपणे पुढे सरकत होते. तिघांनी त्याकडे पाहून हातवारे सुरू केले. शिट्ट्या वाजवल्या. 'आम्हाला वाचवा' असा आक्रोशही सुरू केला.

गच्ची वरुन...

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 14/09/2017 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
Epppie.... चिनी गुलाबाचे सीड्स मागवली होती अम्माजानकडुन. पावली नुकतीच. आता ५० बीयापासुन किती रोपं बनताय बघुयात. लगे हातो नर्सरीत चक्कर टाकुन आलो. तर तिथंही त्यानं चिगुची रोप लावलीयेत नुकतीच. अचानक मागणी वाढली म्हणे. आमच्या गच्चीवरील बाग प्रेमी मंडळाची देखिल तुफान चर्चा सत्र होतायेत. फुलांचे नवनवे रंग तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संवाद, संपर्क , समन्वय सुरु झालाय. --चिनी गुलाबाचे कलम करून नवीन कलर बनवता येईल का ? --भाबड्या अपेक्षा लागल्यात फुलांच्या रंगाच्या --बरेचसे ड्युअल कलर बघितलेत मी नेट वर --सगळ्याना द्यायला सोपे जाईल...

प्रतिशोध भाग-४

लेखक कऊ यांनी मंगळवार, 12/09/2017 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ -http://www.misalpav.com/node/40584 भाग २ -http://www.misalpav.com/node/40583 भाग ३- http://www.misalpav.com/node/40568 भाग ४ पुढच्या दिवशी कॉलेज कँटिन मध्ये काव्या स्वतःच्याच तंद्रीमध्ये बसली होती. आतापर्यंत सियालचे किती कॉल येऊन गेले पण तिने उचलला नाही. "हाय काव्या, आज एकटीच,गँग कुठे ग तुझी.."स्वरा तिच्या समोरच्या खुर्चीत बसून बोलली. "माहित नाही.स्वरा तू या कॉलेजमध्ये अकरावी पासून आहे ना?" "हो ,का ग??अस अचानक?" "स्वरा मला तुला का

नाल !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 11/09/2017 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नाल…. आमच्या इंजिनिअरींग कॉलेजमधे आमच्या टोळीत एकाहून एक नवरत्न होती. त्यातील एक राजघराण्यातील रत्न म्हणजे राजे मालोजीराजे पवार. गंमत म्हणजे आम्ही होतो ही नऊ जण. आता हॉस्टेलवर काय काय चालते याबद्दल मी काही सांगायला नको आणि विशेषत: इंजिनीअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलवर. त्या काळात इंजिनिअरींगच्या मुलांना जरा अवास्तव महत्त्व मिळायचे ही वस्तुस्थिती आहे.

हाफ चड्डी गँग (पार्ट -२)

लेखक बाजीप्रभू यांनी रविवार, 10/09/2017 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
हाफ चड्डी गँग (पार्ट -१) संध्याकाळचे सात-साडेसात झाले असतील. देवापुढे दिवा लावून आज दिवसभरात लावलेल्या दिव्यांची उजळणी करत होतो. मला अगदी स्पष्ट आठवतंय शुभंकरोतीच्या एकूण शृंखलेतील शेवटचा श्लोक गात(वाचा रेकत) होतो. मी म्हणत होतो की, "सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो" पुढला कलंक लागण्याआधीच आयमीन ऊच्चारण्याआधीच एका सृजनाचं वाक्य कानी पडलं. माझा सख्खाशेजारी 'राजेश' होता तो. ये बाजी!! कुणीतरी तुला शोधतंय बहुतेक. ते ऐकून माझ्या काळजात धस्स-बिस्स अजिबात झालं नाही कारण एव्हाना माझा गजनी झाला होता.

पाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).

लेखक दिपक लोखंडे यांनी शनिवार, 09/09/2017 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०१ पासून पुढे..... ( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली ) मयुरी : आता? राघव : निघुया? संकेत : हो. मयुरी : काय हो?. राघव, काय प्लॅन आहे? राघव : प्लॅन काहीच नाहीये, जे होईल ते बघून घेऊ. मयुरी : म्हणजे? राघव : अग "डर के आगे जीत है" मयुरी : पण जीत तर या सुकड्याची ना, आपलं काय? राघव : आपल्या मैत्रीची जीत. संकेत : नीघुया का? मयुरी : बघ या सुकड्याला किती घाई आहे जायची! राघव : ए.. चला बस आली निघुया आता. ( सकाळचे ९:५५ झाले होते. तिघही पाटलाच्या वाड्यावर पोहोचले ) मयुरी : आलो तर खरं.