Skip to main content

विरंगुळा

वलय (कादंबरी) - प्रकरण १४

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 23/02/2018 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १३ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42022 प्रकरण 14 गोरेगांवच्या फिल्मसिटी स्टुडिओ मध्ये जिंतेन्द्र करमरकर खूप काळजी अणि चिंता करत बसला होता. त्याचे कशातच मन लागत नव्हते.

एसटी कार्यशाळा भेट-चिखलठाणा औरंगाबाद

लेखक आलमगिर यांनी बुधवार, 21/02/2018 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी , आज थोड्या वेगळ्या विषयावर लिहिणार आहे. दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी एसटी लव्हर्स ग्रुप तर्फे केंद्रीय बस बांधणी आणि दुरुस्ती कार्यशाळा चिखलठाण औरंगाबाद ला दिलेल्या भेटीचा हा वृत्तांत. औरंगाबाद शहराबाहेर सिडको बस स्टॅन्ड वरून बाहेर पडला कि चिखलठाना मध्ये आपल्याला दिसते ती एसटीची विभागीय कार्यशाळा. एसटीच्या प्रचंड कारभाराची ती जणू प्रतिनिधीच. ह्याच कार्यशाळेत आम्ही म्हणजे MSRTC LOVERS GROUP च्या सदस्यांनी भेट दिली. कार्यशाळेमध्ये असलेल्या विविध विभागांची माहिती आपण आता घेऊ.

मराठी मालिकांची लेखनकृती

लेखक वनफॉरटॅन यांनी मंगळवार, 20/02/2018 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारी: १. अगदी हार्डकोर ममव असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील. २. लक्ष्य रसिकवर्ग निवडावा. महाराष्ट्रात दोनच असतात. एक म्हणजे मुंबईपुणेकर आणि दुसरे नॉन-मुंबईपुणेकर.

वलय (कादंबरी) - प्रकरण १३

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 19/02/2018 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १२ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42012 --- प्रकरण 13 आठ दिवसांनी कारने रागिणी हॉस्टेलवर गेली. सोनी बाहेरच कट्ट्यावर सिगारेट पित बसली होती. “ओह माय गॉड सोनी. तू सिगारेट प्यायला लागलीस? सो बॅड!” सोनी उठून उभी राहिली पण तीने सिगारेट पिणे चालूच ठेवले आणि निराशेने ती म्हणाली, “केव्हा आलीस? खूप वेळ लावलास या वेळेस रागिणी?” “हो. मी आता सूरज सोबत त्याच्या फ्लॅटवर शिफ्ट होणार आहे. लिव्ह इन रिलेशनशिप! त्याने मला एक कारसुद्धा भेट दिली आहे! बाहेर उभी आहे.” सोनी जवळ कट्ट्यावर बसत रागिणी म्हणाली. “वाव! ग्रेट.

वलय (कादंबरी) - प्रकरण १२

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 16/02/2018 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ९, १० आणि ११ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41948 ---- प्रकरण 12 संध्याकाळी साडेसात वाजता दोघे बेडवर एकमेकांच्या पायात पाय अडकवून बाहुपाशात बसलेले होते. न बोलता. शांत. निवांत. “मी कॉफी बनवून आणते!”, रागिणीने शांतता भंग केली. “थांब. बैस अजून! अशीच मला चिटकून बाहुपाशात बसून रहा! तुला क्षणभरसुद्धा दूर होऊ द्यावेसे वाटत नाही!” सूरज तिला आणखी छातीशी ओढत म्हणाला. “मिस्टर सूरज सिंग! आता अप्रेम बास झालं! थोडं प्रेम उद्यासाठी राहू द्या!”, असे म्हणत तिने जवळ पडलेली ब्रा उचली आणि घालायला सुरुवात केली. “ओके रागिणी जी!

धोकेबाज

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 13/02/2018 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, काय सांगू आणि कुठून सुरुवात करू? कशी आहेस? पाच सहा महिन्यांत एकदा तुझी खुशाली कळते. जग कुठल्या कुठे गेलं पण आपलं गाव अजून तसंच . मोबाईल नेटवर्कच नाही. माणसाने कॉन्टॅक्ट ठेवावा तरी कसा! आणि तू आणि तुझे विचार तर त्या गावापेक्षाही जुने. आठवतं, मी पहिल्यांदी गोव्याला आलो, मला नोकरी मिळाली, तुला गोव्याला घेऊन आलो. तूसुद्धा खूष होतीस पण जेव्हा तुला कळलं की मी बिअर बारमध्ये नोकरीला लागलोय तशी तू त्याच रात्रीच्या एसटीने निघून गेलीस. दारूच्या पैशाने चालणार्या घरात पाणीसुद्धा पिणार नाही म्हणालीस. किती दुखावलंस मला. आजकाल कुणी असं नसतं.

भूमिका

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 12/02/2018 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
भूमिका घरासमोरची वाट मिट्ट काळोखात बुडली. दूर कुठेसा दिवा दिसायला लागला तस येसू न लाकडी खिडकी ओढून घेतली खूट्टकन. देवाजवळ दिवा लावला आणि पटकन चूल पेटवून घेतली. पेजेवर झाकण ठेवून देवळाशी आली. नेहेमीच्या जागेवर गोप्या दिसला तिला.निजलेला. बेवारशी कुत्र्यासारखा. उठवल्यावर लगेच उठला. अंग मोडून आळस दिला. "अस्स तिन्ही सांजेच्या वेळेला निजू नये रे पूता" तिन त्याला मायेने समजावल. गोप्या हसला लहान मूलासारखा. हसताना लहान मूलासारखी लाळ गळली.पण ती त्यान पूसली नाही.मग येसू नच पदरान ती पूसून काढली. "चल लवकर गरमा गरम पेज खाऊन घे" गोप्या पाय ओढत तिच्या मागे मागे चालू लागला.

माझा जॉली होतो तेंव्हा

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 09/02/2018 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
"यावेळेस दिवाळीला फराळाचा एक पदार्थ तू बनवायचा." रविवारी सकाळी मी अंथरुणात लोळत पडलो असताना आमच्या हीने बॉम्ब टाकला. उंच धिप्पाड जोएल गॉर्नरने पहीलाच चेंडू शिवसुंदर दासला बाउंसर टाकल्यावर त्याची जी अवस्था होइल तशी काहीशी माझी अवस्था झाली होती. शाळा कॉलेजातले सारे खडूस मास्तर बायकोचे रुप घेउन माझी सरप्राइज टेस्ट घ्यायला उभे आहे असे वाटत होते. हा सारा त्या जॉली एलएलबी सिनेमाचा परिणाम होता. कुठुन दुर्बुद्धी झाली आणि तो सिनेमा बघायला गेलो असे झाले होते.

वलय (कादंबरी) - प्रकरण ९, १० आणि ११

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 05/02/2018 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ८ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41914 ---- प्रकरण 9 मुंबईच्या क्वीन्स नेकलेस म्हणजेच मरीन ड्राईव्ह परिसरात अनेक उंच इमारती दिमाखात उभ्या होत्या. त्या परिसरात असणारे बॉलीवूड मधल्या प्रसिद्ध कलाकारांचे बंगले, त्यांचा तेथला वावर आणि परिसरातला समुद्र हे सगळं एकूणच त्या परिसराबद्दल जनसामान्यांच्या मनात नेहमी कुतूहल आणि आकर्षण निर्माण करत होतं. जवळचा फेसाळणारा अरबी समुद्र आणि मुंबईचा देखणा नजारा तेथील अनेक इमारतींच्या खिडकीतून सहज दिसायचा. रोज सायंकाळी ते दृष्य बघणे म्हणजे डोळ्यांना एक पर्वणीच होती.

वलय (कादंबरी) - प्रकरण ८

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 02/02/2018 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ७ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41877 --- प्रकरण ८: सोनीला तिसऱ्या दिवशी तिच्या रूमवरच्या इंटरकॉमवर हॉस्टेलच्या ऑफिसमधून फोन आला. "आपकी मदर आई है. ऑफिस में बैठी है!" "आई? आत्ता? अशी अचानक कशी आली?" असा विचार करत ती म्हणाली, "ठ ठीक है, भेज दो उनको अंदर!" "नही, वे अंदर नही आयेंगी. आपही को बाहर बुलाया है!" सोनी थोडी साशंक विचारांनी बाहेर जायला निघाली. “आई जवळ फोन आहे पण तिने फोन केला नाही. मला निघतांना किंवा पोचल्यावर कॉल केला नाही? काय झालं असेल?