Skip to main content

विरंगुळा

स्वैपाकघरातून पत्रे २

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 25/05/2018 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अन्नपूर्णा, जसे शहरात अपार्टमेंट, तसे किचनमध्ये आम्ही. एकावरएक चार, पाच, सहा किंवा आणखी कितीही मजली. तुझ्या choice प्रमाणे. घरातील माणसांच्या संख्येवर लोक माझी खरेदी करतात. तुझ्या घरात आमचे सहा मजले आहेत. पण तू त्यातलेही एक दोन काढून ठेवतेस. म्हणतेस, ‘घरात इतकी कमी माणसे, कशाला सगळे मजले चढवत बसा?’ मग आमच्यातला वरचा मजला काढून ठेवतेस किंवा रिकामा तरी ठेवतेस. मग उरलेल्या सगळ्यांना कुकरमध्ये बसवतेस. आम्ही सहसा बाहेर येतो, ते सुट्टीच्या दिवशी. तो दिवस आमच्या outing चा.

दोसतार-१०

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 24/05/2018 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://misalpav.com/node/42617
आईने तीच्या हातातला पुडा पिशवीत ठेवला. या शेंगा बाबाना . तो पुडा तुला. मी पुड्यातल्या चार गरम शेंगा काढून आईला दिल्या. आईने माझ्या हातातला पुडा किती गरम आहे याचा अंदाज घेतला आणि तो माझ्या शर्टच्या खिशात उपडा केला. अर्धवट भिजलेल्या शर्ट मुळे वाजणारी थंडी त्या खिशातल्या गरम शेंगानी एकदम पार पळवून लावली. पुढच्या आठवड्यात पुस्तंक आली आहेत का ते पहायला यायचं ते पाऊस येणार आहे हे बघूनच. हे ठरवूनच टाकले.
पुस्तकं कधी येणार हे माहीत नव्हते. शाळेच्या वर्गात बहुतेकांची हीच परिस्थिती होती.

माझ्या हवाईदलातील आठवणी - श्रीनगरच्या पहिल्या पोस्टींगमधे...

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 22/05/2018 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी एका स्पर्धेत एक आठवणीचा किस्सा पाठवला होता त्याला बक्षिस मिळाल्याचे आज कळले... अॅड गिमिक असावे असे दिसते कारण बक्षिस नक्की काय ते गुलदस्तात आहे...! तो इंग्रजीत होता... कधी वेळ मिळाला तर मराठीत लिहायचा प्रयत्न करेन.... 1 मी हवाई दलात कसा प्रवेश केला आणि नंतर जीवनाला कसा कसा आकार घडत गेला यावर लेखन वेळ मिळाला की करतो... त्यातला एक किस्सा सादर... ...हा प्लॅंचेट करतो ही बातमी काही मित्रांमार्फत बाहेर फुटली. त्यामुळे माझा भाव वधारला.

Everything , everything

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 21/05/2018 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , चित्रपट समीक्षण वगैरे करण्याइतका मी दर्दी नाही.. त्यातही इंग्लिश चित्रपट --ज्यातले सगळे संवाद नेमके कळाले असतीलच असं नाही.. झरकन जाणारे सगळे सब टाईटल्स सुद्धा १००% वाचले गेल्याची शक्यता नाही. झालंच तर पात्रांची नावं पण विसरलोय (इंटरनेटवर पुन्हा शोध घेता येईल पण कट्ट्यावर गप्पा मारताना कशाला पुन्हा तो खटाटोप).. तर समीक्षण नाही पण एका सुंदर चित्रपटाबद्दल सांगावेसे वाटतेय.. ते सांगण्याचा हा प्रयत्न मुळात मी इंग्लिश चित्रपट फारसे बघत नाही..

दोसतार-९

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 14/05/2018 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : https://misalpav.com/node/42589 मी आईला हे एकदा सांगितले . ती मला खुळा म्हणाली नाही. माझ्या केसांवरून ,गालावरून हात फिरवला, माझी हनुवटी हातात धरली. आणि तिचे डोळे एकदम रानातल्या तळ्यासारखे पाण्याने भरून आले.काठोकाठ. ढग गडगडायच्या अगोदर मला त्यांना एकदा सांगायचंय. तुम्ही खुशाल गडगडा...पण विजेची टाळी देवून कुणाची आज्जी घेवून जाऊ नका. विजेची टाळी देवून ढग गडगडले की मला वाटते कोणाची तरी मऊसूत कापसाची आज्जी गेली. शाळा सुरू झाल्याझाल्या पहिली गोष्ट काय केली असेल तर ती म्हणजे.

दोसतार-८

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 10/05/2018 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://misalpav.com/node/42569
अशी मुले शाळेत घेताना त्यांची तोंडी परीक्षा कशी घेतात हे एकदा मला बघायचंय. या शाळेतही असा एखादा कोणीतरी मुलगा नक्की असणारच. मला प्रश्न होता की ढगाची पाठ कुठे असते. कुणालातरी विचारावे असा विचार आला पण चुकुन ज्याला विचारावे तो गण्यासारख्या निघाला तर काय या धास्तीन मी तो प्रश्न गिळून टाकला.
मुळात ढगाला आपण भॉ...

दोसतार-७

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 07/05/2018 06:32 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : https://misalpav.com/node/42384
आपली पर्यवेक्षक सरांच्या जुलमापासून आपली सुटका केली. आपली सुटका करणे हे त्या माशाच्या तुकडीचे कार्य होते. टंप्याच्या जिभेवर सरस्वती नाचत होती. त्याने या अवस्थेत किमान एक तासभर तर रामाच्या देवळात कीर्तन केले असते. आपल्याला भगवंताने कोणते कार्य करायला पाठवले असावे हे सांगता येईल का? यल्प्याच्या या प्रश्नाचे उत्तर टंप्याच काय पण आमच्या तिघांचे पालकही देऊ शकत नव्हते.
शाळा सुरू होते तीच मुळी पावसाच्या सोबतीने. गावात पाऊस सुरू होण्याची तारीख ७ जून. शाळा सुरू होण्याची तारीख पण तीच.

रात्रीच्या अंधारात...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 06/05/2018 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या अंधारात... ... रात्रीचे सव्वाबारा वाजलेले. देवळातलं किर्तन संपलं आणि श्रोते पांगले. चारपाच उनाड पोरांनी बाजारपेठेतल्या एका दुकानाच्या कट्ट्यावर अड्डा ठोकला. गावातल्या लफड्यांपासून गरीबी हटावच्या राजकारणापर्यंतचे सगळे विषय चर्चेला येत गेले आणि गप्पांचा फड भलताच रंगला... अचानक चारपाच बायका घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत धावत येताना दिसल्या, आणि गप्पा थिजल्या. किर्तनानंतर घरी, वरच्या आळीत निघालेल्या त्या बायका माघारी फिरल्या म्हणजे वाटेत कायतरी गडबड होती हे टोळक्याने लगेच ताडले. तोवर त्या बायकाही समोर आल्या होत्या. घाबरलेल्या!! ‘माळावरच्या शाळेवर कुणीतरी आहे...

हवाईदलातील सेवेतील रंजक रेल्वे प्रवास! भाग ४

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 05/05/2018 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
सायरनचे भणभणणारे आवाज येताहेत, ‘जी’ सुट घालून हातात हेलमेट घेऊन वावरणारे पायलट एकदम लढाऊ विमानांच्या दिशेने धावताहेत, पुढच्या काही क्षणात विमाने अवकाशात झेपावतात, गोळ्यांचा वर्षाव, विमानांच्या जीवघेण्या डॉग फाईट्स, अचुक वेध. लाल बटणावर अंगठा, पुढल्या क्षणी विमानाचा पेट. कॉकपिटातून अंगठा वरकरून ‘थम्प्स अप’ खुणेने कामगिरी फत्ते, असे हवाईदलातील विजयी वीराचे चित्रीकरण आपणाला पाहून पाहून हवाईदलातील लोक नेहमी विमानातून संचार करत असावेत असे सामान्यांना वाटणे साहजिक आहे. पण एरव्ही हवाईदलातील कर्मचाऱ्यांच्या नशिबी बहुचक्रवाहनाचाच प्रवास असतो. त्यात अनेक मजा मजा होतात.

आमचा पण पुस्तक दिन

लेखक ए ए वाघमारे यांनी बुधवार, 02/05/2018 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक दिन आज सकाळी सकाळीच आपल्या बावळट बाळूला कळलं की आज पुस्तक दिन आहे ते. सकाळी सकाळी म्हणजे असं की त्याच्या फेसबुक क्रश मातकट माऊने रात्रभरात कुठकुठल्या पोस्टला लाईक केले हे बघायला त्याने गोपाळमुहुर्तावर फेस्बुक उघडल्यावर. पण ही ‘प्रोसेस’ आम्ही जितकी सांगितली तितकी सहज नसते. ती समजण्यासाठी त्याआधी त्याने काय केलं हेही जाताजाता बघून घेऊ. म्हणजे झोपेतून उठल्यावर त्याने आधी डोळे उघडले हे महत्वाचं.