भयकथा: तुला पाहते रे!
मनोजला इंजिनियरींगच्या पहिल्या वर्षी हॉस्टेलमध्ये राहिल्यानंतर स्वतंत्र रूम घ्यावीशी वाटली.
दोन मित्रांसह तो रूममध्ये राहू लागला. किचन आणि मोठा हॉल अशा रचनेच्या घरात ते तिघेजण रहात होते. भाडे तिघांमध्ये विभागले जात असल्याने परवडत होते आणि ही रूम त्या एरियातल्या इतर रूम्सपेक्षा खूप स्वस्तात मिळाली होती. तिघांनी रुममध्ये टिव्ही मुद्दाम ठरवून घेतला नव्हता, त्याऐवजी एक स्वस्त वाय फाय घेतले होते. पैसा आणि वेळेची बचत हे हेतू त्यामागे होते.
मनोजचे आईवडील गावी होते. अधून मधून त्याला भेटायला येत. पहिल्या वर्षी 60 टक्के मार्क मिळाले होते म्हणून आईवडिलांनी चांगला नवीन स्मार्टफोन घेऊन दिला होता.
मिसळपाव