Skip to main content

विरंगुळा

दोसतार...२

Published on 21/03/2018 - 07:36 प्रकाशित मुखपृष्ठ
मागील दुवा http://www.misalpav.com/node/42264
आम्ही ओणवे होऊन अंगठे धरले होते तरी ही हसत होतो. हसत हसता धन्या जाधवचा तोल गेला तो पडला. भामरे मास्तर आणखीनच भडकले. ते काही बोलणार इतक्यात छोटी सुट्टी झाल्याची घंटा झाली. आम्ही सगळे मास्तरना तेथेच सोडून वरच्या ग्राउंडवर पसार झालो. पुढच्या प्रसंगातून आम्हीही सुटलो आणि भामरे मास्तरही सुटले.
पण घडल्या प्रसंगामुळे टंप्या खूपच बिथरला होता. तो म्हणाला की मी आता जे करायचे ते करुनच दाखवतो. आम्हाला वाटले की हा आता संध्याकाळी जाऊन त्या आपी जोशीला दम देणार वगैरे. अर्थात ते शक्यच नव्हते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 8296

माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की....

Published on 11/03/2018 - 14:04 प्रकाशित मुखपृष्ठ
मैना, तू तो गां, मेरा नाही तो कमसे कम अपना ही दिल बहलाँ …. प्राक्तनाच्या अदृष्य पिंजर्‍यात अडकलेली सलमा अतिशय आर्त स्वरात पौलादी पिंजर्‍यात बंदी असलेल्या मैनेला कळकळीने सांगते. आपण सुन्न झालेले असतो आणि त्यात वेदनेची परमावधी साधत लताबाईंचे प्रभावी सूर काळीज चिरत कानावर येतात. न तड़पने की इजाजत है न फरियाद की है, घुट के मर जाऊँ, ये मर्जी मेरे सैय्याद की है ! कै. अविनाश चव्हाण, मंदार काळे, अशोक पाटील यांच्यासारख्या काही स्नेह्यांच्या संगतीमुळे मलाही हिंदी सिनेसृष्टीत दुर्लक्षीत राहिलेले चित्रपट शोधायची सवय लागलेली आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6546

वलय - प्रकरण ३४ ते ५२ (समाप्त)

Published on 09/03/2018 - 12:37 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रकरण २९ ते ३३ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42181 प्रकरण 34 शेवटी राजेश मोहिनीला सोबत स्वतःच्या गाडीत घेऊन निघाला. ती अर्धवट धुंदीत राजेशच्या बाजूला बसली होती. मोहिनीने "यंग गर्ल" हा परफ्यूम लावला होता. त्याचा सुवास अगदी छान, मस्त आणि मादक होता. अगदी फक्त लेडीजला शोभेल असा! थोडी कमी शुद्धीत असल्याने ती त्याला जास्त चिकटून बसली होती आणि त्यामुळे तिच्या शरीराचा गंध राजेशच्या शरिराला हळूहळू लागत होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6086

वलय (कादंबरी) - प्रकरण २९ ते ३३

Published on 07/03/2018 - 15:42 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रकरण २४ ते २८ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42176 प्रकरण 29 इकडे रागिणी सूरजच्या ब्राझीलहून परत येण्याची वाट बघत होती. संध्याकाळ झाली होती. स्वतःसाठी स्वयंपाक बनवून ती जेवली. मग सूरजला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण तो कॉल उचलत नव्हता. मग झोपतांना सहज बातम्या बघाव्या म्हणून तिने टीव्ही लावला. ‘फ्रेश न्यूज- आप तक, आपके घर तक!” हे चॅनेल सुरु होते. "फिल्मी खुलासा" या कार्यक्रमात निवेदक ओरडून ओरडून सांगत होते: "फेमस हॉरर सिरीयल की फेमस ऐक्ट्रेस रागिणी के बारे में एक बडा खुलासा! एक ऐसा सच जो आजतक किसीको नही था पता! देखीये थोडीही देर में!" बेडवर झोपलेली रागिणी अचानक उठून बसली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1931

वलय (कादंबरी) - प्रकरण २४ ते २८

Published on 06/03/2018 - 13:04 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रकरण 24 राजेश सोबतच्या दु:खद ब्रेकपनंतर जीवनाला अचानक मिळालेली सुखद कलाटणी तिला आठवली. तिने मुद्दाम राजेशला असे सांगितले होते की ती यापुढे प्रोफेशनल रिलेशन कायम ठेवेल म्हणजे राजेश बेसावध राहील आणि तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार नाही. राजेशकडून नकार आला तर असे सांगायचे हे तिने आधीच ठरवले होते. नंतर सोनी बनकरला राजेशसोबत झालेल्या ब्रेकपची कल्पना दिल्यानंतर ती काही दिवसांनी हॉस्टेल सोडून गेली होती. तिने मॅडम अकॅडमीच्या फायनल इयरच्या असाईनमेन्ट बऱ्याच आधी संपवल्या होत्या आणि रीतसर "मॅडम" चे प्रोव्हीजनल सर्टिफिकेट मिळवले. मग तिने कायमचे पुण्याला घरी परत जाऊन आईला ब्रेकपबद्दल सांगितले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2069

मराठी दिन २०१८: धुयानी होयी नी धुयवड (अहिराणी)

Published on 05/03/2018 - 16:56 प्रकाशित मुखपृष्ठ
धुयानी होयी नि धुयवड लोकेसहो! धुयवड खेयनात ना! आम्हन्या धुयामां बी होयीना येगळाच रंग चढस. मन्हा बाबा सांगे..त्यासन्हा टाईमले धुयवडनी मोठी धमाल व्हये. आते आम्ही ६वी गल्ली ना लोके तुम्हले माहीती नैत. धुळामां हरेक गल्ली म्हन्जे इशेष शे. म्हंजे पाहा, हाई माशाना काटा र्हास ना तसा धुयाना मझार पारोया रोड जास. त्याले लागून काटकोनमा पह्यली गल्ली, २री गल्ली(तेली गल्ली) ४थी, ५वी, ६वी, ७वी गल्ली शेतस. ६वी गल्ली म्हण्जे दादा लोकेस्नी गल्ली समजेत. सहावी गल्लीना एक साईडले माधवपुरा. बठठा.... काय म्हंतस त्याले संवेदनशील भाग बरं!! गल्लींन एक टोकले सुभाषनगर. म्हणजे जुन धुळे. जुन धुयामा खुनी मस्जिद.

याद्या 4303

मराठी दिन २०१८: सरप धसला कुपात (वर्‍हाडी)

Published on 04/03/2018 - 09:06 प्रकाशित मुखपृष्ठ
खारी म्हणजे गावाले लागून रायते ते वावर, या खारीत ढोरायच्या बरोबरीन माणसायचा बी लय तरास रायते. सकारपासून ते रातरीवरी टमेरल घेउन, जाउन जाउन गाववाले खारीची पार हागणदारी करुन टाकते. रामाच्या खारीच बी तेच झालत. कोणतरी वरडत येउन सांगाव ‘ये रामा खारीत गाय धसली पाय’, रामा हातचा चहाचा कप तसाच ठेवून, धोतराचा काष्टा हातात धरुन ढोर हाकलाले खारीक़ड धावला रे धावला का त्याचा पाय बदकन पोवट्यावर पडे. आता धावता ढोरामांग, समोर ढोर पिक खात हाय अस दिसत असूनबी रामाले घराकड पळा लागे. रामान लय उपाव करुन पायले पण काही उपेग झाला नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5496

मराठी दिन २०१८: मणी गोष्ट..............(अहिराणी)

Published on 03/03/2018 - 06:26 प्रकाशित मुखपृष्ठ

मणी गोष्ट..............

एक गाव मां एक राजा रास. त्याले एक पत्नी आणि पोरे रातस. राजा एकदम साधा माणूस रास. त्यान गावं बी खूश रास. राजा ना पोरे आण प्रजा ना पोरे एकच शाळा मा जातस. एक दिन काय व्हस ; दुसरा गाव ना राजा त्याले निरोप धाडस. " तू मनासंगे युद्ध कर , मी तुले हराई टाकसू" मग राजा बोलस त्याले तु मन गाव बरबाद करी टाकशी त्यानापेक्षा आपण एक युक्ती करु. अमना गामना गावं मां आपण एक वादविवाद स्पर्धा ठेऊ . जर तुमी माले हारी टाक तर हाई गावं तुनं . राजा अशी अट टाकस.'त्या प्रमाणे एक दिन तो दुष्ट राजा येस येवाण ठरावस. हाउ दुष्ट राजाणा जोडे एक मांत्रीक रास.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3535

मराठी दिन २०१८: इरसाल म्हणी (मालवणी)

Published on 03/03/2018 - 06:17 प्रकाशित मुखपृष्ठ
मालवणी माणूस खट म्हणूनच ओळखला जातो. तशीच त्याची भाषा. सरळ शब्दात बोलले तर मालवणचा खरोखरच कॅलिफोर्निया होईल की काय अशी त्याला भिती वाटत असावी. तर आज सादर करतोय अस्सल मालवणी इरसाल म्हणींचा खजिना. कुठेकुठे थोड्या वाह्यात वाटतील पण प्रगल्भ मिपाकर समजुतीने घेतील ही खात्री आहे. १ जळ्ळो तुझी पिठी, घोवान धाडली चिठ्ठी त्याचं काय आहे, एकेकाळी कोकणात घरोघरी चाकरमानी असायचाच. बायका मुलं गावाला आणि चाकरमानी नोकरीसाठी मुंबै लागले. गणपती आणि शिमग्याला फक्त घरी येत असे. त्याची जी काय खुशाली कळायचीची ती पत्र किंवा मनीआर्डरीच्या मागच्या जागेतून.

याद्या 9051

एका सायन्स प्रोजेक्टची गोष्ट

Published on 01/03/2018 - 15:46 प्रकाशित मुखपृष्ठ
"अहो बाबा, तुमचे प्रोजेक्ट्स आजी ने बनवले... माझे तुम्ही बनवताय आणि माझ्या मुलांचे मीच बनवणार आहे कि भविष्यात!! ओपन सिक्रेट आहे हो हे, जजेसनाही माहित असतं कि पॅरेन्ट लोकच बनवतात सायन्स प्रोजेक्ट्स, कशाला भाव खाताय? बनवा कि माझा सायन्स प्रोजेक्ट". आमचं कॉन्सेप्ट, तुमचं लेबर वर्क आणि स्नेहा आणि मी प्रेसेंटेशन करणार, म्हणजे डिमांड-प्रोडक्शन आणि मार्केटिंग असं टिमवर्कचं वर्तुळ पूर्ण होईल सिम्पल. अश्या आर्ग्युमेंट्स करत माझ्या आळशी लेकीने माझ्या गळ्यात एक सायन्स प्रोजेक्ट अडकवला त्याची हि गोष्ट, मी :- बरं विषय काय आहे? ती :- ते माहित नाही तुम्हीच ठरवा. मात्र वर्किंग हवं मी :- ऑ!!

याद्या 9282