लेखकमूखदूर्बळयांनी गुरुवार, 30/10/2008 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल माझ्या आयुष्यात काही तरी वेगळ घडतय. वेगळ म्हणजे नक्की काय ते अस सुसंगत पणे नाही सांगता येणार पण तरीही एक प्रयत्न करतो. आता हेच बघा ना मी कोण हे सांगायच्या आधीच तूम्हाला दूसरच काहीतरी सांगायला सुरूवात केली. अस हल्ली सारख घडतय. माझ मन थार्यावर नाही. कसली तरी टोचणी लागून राहीलीये मनाला. आता राहील मी कोण्?.सांगतो. माझ नाव राकेश. देसाई वकिलांकडे मी असिस्टंट म्हणून सुरूवात केली. ते त्यांच्या निव्रुत्ती नंतर ही अजून तिथेच आहे. आज काल त्यांचा मुलगा वकिली बघतो. कधी तरी माझा सल्ला विचारतो. आता माझी चाळीशी आलीये. म्हणजे काही फार वय नाही. Life begins at 40 म्हणतात ते काय उगाच?
लेखकविसुनानायांनी गुरुवार, 30/10/2008 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
"जाता पंढरीशी सुख वाटे जीवा..." हे तर खरंच!
पण माझं पंढरपूर मात्र निसर्ग आहे.
डांबरी सडका, काँक्रीटी इमारती, वाहनांचा गदारोळ,मोबाईलचा पाश, पोटापाण्याची चिंता, समाजातील पांढरपेशे उच्चभ्रू वर्तन यांपासून अधूनमधून दूर जातो.
कोणी आपल्याला ओळखत नाही आणि आपणही कोणाला ओळखत नाही अशा ठिकाणी वृक्षवल्लींसोबत वारी करतो.
निसर्गाशी गळाभेट होते.
लेखकचाफायांनी बुधवार, 29/10/2008 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
वैतागुन समिधाने हातातली डिझाईन्सची वही बेडवर टाकली. पुन्हा पुन्हा मन लाउन काढलेल्या तिच्या डिझाईन्स आत्ता तिला फ़ारच टाकावू वाटत होत्या, उद्याच तिला एका लग्नाच्या मेहंदीची ऑर्डर होती आणि तिच्याकडे अजुनही ज्या साठी ती ईतकी प्रसिध्द होती तश्या आगळ्यावेगळ्या डिझाईन्स नव्हत्या. तिच्या अप्रतिम डिझाईन्समुळेच तर ती नावा रुपाला आली होती, मोठ्या मोठ्या लग्नाच्या ऑर्डर तिला मिळत होत्या. पैसा ही महत्वाची बाब होतीच पण आता तिला प्रसिध्दीही मिळत होती.
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी बुधवार, 29/10/2008 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजी, आजाला काठीवीना चालण्याचे आपले मनोदय सांगत असताना,ते संभाषण तानुच्या कानावर पडते.स्वपनाळू तानु दुसऱ्या दिवशी आपले स्वप्न
आजाला सांगते.
चिमुकल्या तानुला
स्वप्न पडे पाहाटेला
आजी आणि काठी
एकमेकांशी बोलताना
काठी म्हणे आजीला
नको सोडू कधी मला
संगतीत राहून तुझ्या
महत्व आलेच मला
आजी सांगे काठीला
नकोच घालू गळ मला
इतक्या वर्षाच्या सोबतीने
आला कंटाळा तुझाच मला
ऐकून त्यांच्या संभाषणाला
म्हणे तानु स्वत:ला
स्वप्नांत का असेना
पाहीन माझ्या आजीला
काठीवीना चालताना
श्रीकृष्ण सामंत
लेखकमूखदूर्बळयांनी बुधवार, 29/10/2008 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन )
भैया हलेना भैया चालेना
भैया खंत करी काही केल्या परतेना
गेले 'जोगेश्वरी' च्या गोठी
म्हटली म्हशींसवे गाणी
आम्ही दूधात पाणी मिळवून रे
आले सप च्या मनी
अबू बरळला जनी
राजास पाहून गळाले हातपाय रे
हा तर संजय निरूपम
करी जिवाची तगमग
म्हणे राहू आपण दोघे जण रे.
चल ये रे मूलायमा
घालू आपण छट पूजा
लाठया काठ्यांनी करू दांडगाई रे
अमर सिंगाचे किडे
ह्यांचे लक्ष मतांकडे
आपण करू एकगठ्ठा मतदान रे
भैया फूली (xxx) आला खूलून
गेल्या सर्व दिशा आटून
इथे भैया मग कुठे मुंबईकर रे.
लेखकचाफायांनी मंगळवार, 28/10/2008 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
शल्या आणि त्याची सिगारेट हा एक महा भयंकर प्रकार आहे. दोघे एकमेकांना सोडायला तयार नसतात. बरं शल्याची अवस्था पार चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यु सारखी आहे. सिगारेटच्या धुम्रवलयात शिरलाय पण बाहेर पडता येत नाहीये. तरी आम्ही बारके सारके योध्दे आहोत मदतीला. त्याचे अखंड धुम्रकांड फ़क्त तेजुच्या घरी किंवा तेजु हजर असताना तीही संदेश आणि तन्मय सह असेल तेंव्हा बंद असते. त्यालाही एक कारण आहे.
एकदा अशीच आम्हा सगळ्यांची एकत्र मैफ़ील आटोपल्यावर एक दोन दिवसानी तन्मय म्हणजे तेजुचा मुलगा एकटाच चित्र काढत होता.
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी मंगळवार, 28/10/2008 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांचे इंग्रजी आणि गणित हे दोन विषय एकदम पक्के होते.आईचे सर्व घरगुती व्यवहाराचे हिशेब ते तोंडीच करत.२ ते ३० पर्यन्तचे पाढे,पावकी निमकी,पाउणकी ,सवायकी,दीडकीचे पाढे तोंडपाठ असल्याने गुणाकार,भागाकार,बेरीज आणि वजाबाकी हातचा मळ असायचा.
लेखकविकासयांनी मंगळवार, 28/10/2008 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच याहूच्या संकेत स्थळावर गेलो होतो आणि एक सुखद धक्का बसला!
त्यांच्या गृहपर्णावर (होमपेजवर भारतासाठीचे जे .in आहे त्यावर आहेच पण हे जगाचे मुख्य पान...) चक्क याहू या अक्षराच्या अलीकडे दोन लुकलुकत्या पणत्या आणि दुसरीकडे "हॅपी दिवाली" असा संदेश. त्याच्यावर टिचकी मारल्यावर दिवाळीवर विशेष माहीती मिळाली.
वास्तवीक अशी रेखाटने मी गुगलच्या प्रमुखपानावर कायम पाहीली आहेत पण दिवाळीसाठी मात्र दिसले नाही...