Skip to main content

विरंगुळा

(मदार)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 20/10/2008 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
नीरज कुलकर्णी यांची 'मदार' कशावर आहे हे बघून मला माझी मदार विडंबनावरच कशी आहे त्याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि.... नवटाक ह्या कवींची, भाषा सुमार आहे... आता विडंबने ही, माझी मदार आहे... आश्वासने मिळाली, त्यांना जरी कुणाची; निश्चीत आज त्यांची, कविता शिकार आहे... मी हासलो तुलाही, वाचून ओळि सार्‍या; असतील दोन जमल्या, तिसरी चुकार आहे... का भाव मोल केला, ही शायरी अशी का? मारुन सर्व बाता, होतो फरार आहे! 'हे काव्य आज त्याचे, उसवून काढले मी!!' हा कोणता निराळा, शिंपी टुकार आहे? गझला किती कवींच्या, मी फाडल्या प्रभावी; 'रंग्यास' कल्पनेचा, चढला बुखार आ

चारोळ्या

लेखक mina यांनी सोमवार, 20/10/2008 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
परक्यांनाही आपलसं करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही कोड पडावं अशी काही गोड माणसं असतात किती मोठ भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात !! ............................. ............................ काळाचे बांध फुटून जातात वाहून जाते पाणी तरिही मैत्रीचा अंकूर तग धरुन राहतो कारण भिजत राहतात त्या फक्त आठवणी ! ............................... ............................
Taxonomy upgrade extras

...पण "वेळ' आली नव्हती!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 19/10/2008 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
--------- विधान परिषदेत कुठलं भाषण करायचं, याची तयारी सुबोध मोहितेंनी सुरू केली होती. शिवसेनेला नामोहरम करण्याच्या युक्‍त्याही योजून ठेवल्या होत्या. नितीन गडकरींच्या भाषणावर कडी कशी करता येईल, याचा विचार सुरू होता. सगळी जय्यत तयारी झाली होती. विमानही सज्ज होतं. विधान परिषदेच्या उमेदवारीचा अधिकृत फोन आला नव्हता, तरी त्यांना त्याबद्दल खात्री होती. मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांनी बाकीची "व्यवस्था' ठीकठाक असल्याचंही कळवलं होतं. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीही अर्ज भरण्याची सूचना आली नाही, तेव्हा मात्र मोहिते अस्वस्थ झाले. येरझारा घालत असतानाच फोन वाजला. त्यांनी उत्सुकतेनं घेतला.

आणि सावकार स्वर्गात गेला....

लेखक आगाऊ कार्टा यांनी शनिवार, 18/10/2008 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
फार वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक सावकार राहत होता. तो सावकार महाधूर्त, महाचतूर आणि मोठा डांबिस होता (पिवळा डांबिस नव्हे). गावातले लोक तसे गरीबच. त्यामुळे ते अडीनडीला सावकाराकडे पैसे मागायला येत असत. सावकार दामदुप्पटीने व्याज आकारुन पैसे देत असे. त्याची हिशेब करण्याची निराळीच तर्‍हा होती. कितिही पैसे दिले तरी सावकाराचे व्याज काही फिटत नसे. काही जणांनी त्याच्यावर पंचायतीत दावा लावून त्याला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो सावकार सगळ्यांचे बारसे जेवलेला होता. त्याच्या हिशेबाच्या वह्या आणि तो हिशेब पाहून भल्याभल्यांच्या मेंदूला झिणझिण्या येत.

जरा `वजन' ठेवा!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 18/10/2008 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
सदू आणि दादू जानी दोस्त. कळायला लागलं, तेव्हापासून एका ग्लासातले. गावातले लोक तर त्यांना ढवळ्या-पवळ्याच म्हणायचे. सदू सातवीपर्यंत शिकला होता, तर दादूनं पहिलीनंतर शाळेचं तोंड पाहिलं नव्हतं, एवढाच काय तो दोघांमधला फरक. सदू ग्रामपंचायतीत चिकटला, तर दादू मोलमजुरी करून रात्रीच्या दारूची सोय बघू लागला. घरदार वगैरे काही प्रश्न नव्हता; कारण दारूवर पैसे उडवल्यानंतर हाताशी फार काही राहत नव्हतं. सदूची नोकरी बऱ्यापैकी चालली होती. तो आणि त्याच्या चार भिंती, एवढाच संसार. खरं तर चार भिंतीसुद्धा नाहीत. एक ढासळलीच होती. पुढच्या पावसाळ्यात राहील की नाही, याची खात्री नव्हती.

नाट्यसंगीत

लेखक mina यांनी शुक्रवार, 17/10/2008 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
किती सांगुं तुला..... गीत-अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत-अण्णासाहेब किर्लोस्कर स्वर-बालगंधर्व नाटक-संगीत सौभद्र (१८८२) राग-आनंद भैरवी (मूळ संहिता) ताल-धुमाळी मिपाच्या या धोरणानुसार लेखन संपादित केले आहे... आणिबाणीचा शासनकर्ता.
Taxonomy upgrade extras

येस `बॉस'!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 16/10/2008 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळ्या पटांगणाऐवजी एका बंद घरातल्या शाळेत त्या मुलांचा खेळ रंगला होता. खेळाचं नाव होतं - "महाराज म्हणतात...' खेळाचं स्वरूप साधारणपणे असं असतं ः एकानं राज्य घ्यायचं. तो होणार महाराज. मग त्यानं एकेकाला ऑर्डर सोडायच्या - महाराज म्हणतात, पाणी प्या. महाराज म्हणतात, खाली बसा. महाराज म्हणतात अमकं करा अन्‌ तमकं करा...! सगळ्यांनी त्या पाळायच्या जो पाळणार नाही, त्यानं बाहेर जायचं. इथे "महाराज'च्या ऐवजी त्याला "बॉस' म्हणत होते, एवढाच फरक... ही मुलं जरा मोठी होती. कुठल्या कुठल्या भागातून आलेली. काही वांड होती, काही आगाऊ, काही अतिउत्साही, काही खोडकर (नॉटी.). या शाळेत एक आधुनिक बाईसुद्धा होत्या.

भावंडांची गुप्त भाषा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 16/10/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा,आबा,दादा,कमाआते आणि आप्पा ह्या पांच भावंडांची एक गुप्त भाषा होती.लहान असतानाच त्या सर्वानी तयार केली होती.जशी एक "चकारी" भाषा आहे.ही चकारी भाषा बहुतेक सर्वांना माहित असावी. उदा. तुला माहीत आहे का? हे वरील "चकारी"भाषेत म्हटलं जाणार "चलातू चहीतमा चहेआ चका?" मला तू सांगू नकोस "चलाम चतू चंगूसा चकोसन" काल त्याच्या आईला पाहिलं "चलका चच्यात्या चईलाआ चहिलंपा" अशाच प्रकारची पण थोडी वेगळी भाषा होती.आणि ही भाषा त्यानी त्यांच्या आईला आणि वडिल- नानांना- कळू नये आणि आप आपसात खाजगीत बोलायला मिळावं, म्हणून तयार केली होती. एकदा काय झालं अण्णा आणि दादा सावंतवाडीहून वेंगुर्ल्याला आप्पांच्याच"सावंतव

बिघडलिये मान

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 16/10/2008 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
बिघडलिये मान तरुण मुलींसमोर लटलटते वाढलेल्या वयाला नाकाराते हिरवटपणाला कंपवात चांगली साथ देतो असाच एक त्रिवेणीचा प्रयत्न ! कसा वाटला... -- लिखाळ
Taxonomy upgrade extras

(भलताच जाच!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 15/10/2008 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
अज्जुका यांची 'बिघडलीये काच' बघून अचानक आम्हाला कवितेच्या दोन-दोन प्रतिमा दिसायला लागल्या आणि मग दुसरी प्रतिमा टंकण्याखेरीज प्रत्यवाय उरला नाही!