सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


आताशा जीवनात

Primary tabs

चैत्राली's picture
चैत्राली in जे न देखे रवी...
14 Mar 2009 - 3:49 pm

आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑
सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑
चालत असलेली ही वाट कधी स॑पणारच नाही वाटतय॑
या सरळ वाटेवर कोणतच॑ वळण येणार नाही वाटतय॑
आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑
सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑
ज्याच्याबरोबर या वाटेवर पाऊल टाकल॑ तोच अर्ध्यावर सोडून गेला
'माझच॑ प्रारब्ध' त्याच काही चुकल॑च नाही अस॑ वाटतय॑
आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑
सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑
समोर पसरलेल्या उजाड वाळव॑टात सगळ॑ मृगजळच दिसतय॑
क्षणभर विसाव्याची सावली कधी लाभणारच नाही वाटतय॑
आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑
सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑
लोक म्हणतात नाराज होऊ नकोस तुझ्याही जीवनात वस॑त फुलेल
पण सप्तर॑गी ही दुनिया आपल्यासाठी नाहीच अस॑ वाटतय॑
आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑
सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑

कविताविचार

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Mar 2009 - 4:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आवडली कविता. अशा सरळ, साध्या, लगेच अर्थ समजणार्‍या कविता मला आवडतात. आणि ही त्याची पावती.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

चटपटीत's picture

14 Mar 2009 - 5:35 pm | चटपटीत

कविता खुपच छान अर्थपूर्ण समजणारी आहे. पण एकट॑ एकट॑ वाटणार्‍यांसाठी मि.पा. आहेच.
चटपटीत.

प्रभाकर पेठकर's picture

14 Mar 2009 - 5:44 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर कविता.
अभिनंदन.

आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑
सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑
चालत असलेली ही वाट कधी स॑पणारच नाही वाटतय॑
या सरळ वाटेवर कोणतच॑ वळण येणार नाही वाटतय॑

जीवनातले उत्साही क्षण टिकवून ठेवायचे असतात,
सगळे जवळ असले तरी आपले किती असतात?
वाट कधी संपूच नये, असं वाटत राहावं,
वळण कधीही येऊ शकतं, वाट पाहणं का सोडाव?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Mar 2009 - 5:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका, तुमचा प्रतिसाद फारच जास्त आवडला.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

अवलिया's picture

14 Mar 2009 - 5:50 pm | अवलिया

हेच बोलतो

--अवलिया

प्राजु's picture

14 Mar 2009 - 8:58 pm | प्राजु

+३
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

15 Mar 2009 - 12:58 am | शितल

सहमत.:)

विसोबा खेचर's picture

14 Mar 2009 - 5:57 pm | विसोबा खेचर

का हो इतक्या उदास? मिपावर नेहमी येत जा म्हणजे अस्वस्थ वाटणार नाही..

तात्या.

अनिल हटेला's picture

16 Mar 2009 - 8:19 am | अनिल हटेला

ज्याच्याबरोबर या वाटेवर पाऊल टाकल॑ तोच अर्ध्यावर सोडून गेला
'माझच॑ प्रारब्ध' त्याच काही चुकल॑च नाही अस॑ वाटतय॑
आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑
सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑

सुंदर !!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

क्रान्ति's picture

14 Mar 2009 - 6:25 pm | क्रान्ति

कविता खूप खूप आवडली. तशी मी पण उदासीन पंथीच आहे, पण मिपावर आल्यापासून माणसात आल्यासारख वाटतय. कारण इथे आपल्या दु:खालाही हास्यात बदलण्याची विशेष सोय आहे. तेव्हा आता हळूहळू तुझा एकटेपणा पण कमी होईल नक्कीच!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

लवंगी's picture

14 Mar 2009 - 8:35 pm | लवंगी

एकतरी जिवलग मित्र-मैत्रीण असावी. कवितापण चांगले माध्यम आहे मन मोकळे करायला, पण हा एकटेपणा मात्र आपल्या माणसांत राहूनच दूर होईल. तुझे एकटेपण दूर करणारी मैत्रीण/मित्र लवकरच तुला लाभो. तोपर्यत मिपावरचे छान -छान लेख वाचा.

मराठमोळा's picture

15 Mar 2009 - 12:36 am | मराठमोळा

खुप छान!!!!! शब्द नाहीत.

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

शितल's picture

15 Mar 2009 - 12:56 am | शितल

कविता आवडली. :)