Skip to main content

विरंगुळा

जागृत स्वप्न (भाग -१)

लेखक आत्मशून्य यांनी गुरुवार, 18/08/2011 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
अल्केमि (किमयागीरी), हे एक शास्त्र आहे पदार्थ तयार करण्याचं, रचण्याचं. आणी तो मोडून पून्हा त्यातून काहितरी दूसरा नवीन पदार्थ निर्माण करण्याचं. म्हणूनच हे लोखंडापासून सोनं निर्माण करू शकत... पण हे एक शास्त्र असल्याने एका मूलभूत सिध्दांताला बाधील आहे आणी तो म्हणजे एखादी गोश्ट तयार करण्यासाठी तीतकेच समान मूल्य असलेली दूसरी गोश्ट गमावणे अत्यावश्यक आहे.... गावाबाहेरच्या टेकडीवर उभ्या असलेला माझ्या छोटेखानी परंतू दगडी गढीबद्दल लोकांना कधि फारसे आकर्षण न्हवतेच. मी मूद्दामच ती गढी गावापासून दूर अशा ठीकाणी राहता येण्यासाठी निवडली होती.

दिवस फुलपाखरी (भाग १)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 18/08/2011 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
(डिसक्लेमर: सदर कथा ही संपुर्णतः काल्पनिक कथा आहे. कथेतील कोणत्याही घटनेचा, ठिकाणचा, संस्थेचा, जिवंत अथवा मृत पात्राचा, वास्तवाशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.) मुंबईतलं एक अग्रगण्य महाविद्यालय.. डी. जी. रुपारेल कॉलेज. दिवस १० ऑगस्ट २००७ वेळ दुपारची.. पाउस रिमझिमत होता आणि वातावरणाला एक प्रकारचा 'रोमांचित साज' चढला होता.. आणि कॉलेजचे कॅम्पस विविधरंगी 'फुलांच्या' ताटव्यांनी बहरून गेले होते.. इकडे आत 'मेन बिल्डींग' मध्ये धावपळ सुरु होती.. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याची गडबड घाई .. १२ वी पर्यंत कॉलेजचा अनुभव घेतला असला तरी ११ वी १२ वी म्हणजे एकप्रकारे शाळाच..

ए टेल ऑफ टू सिस्टर्स

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 16/08/2011 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
द ग्रज पाहिल्यानंतर जापनीज आणि कोरिअन हॉरर चित्रपटांविषयी कायमच उत्सुकता वाटू लागली होती. भयपट बघायचे तर जापनीज किंवा कोरिअनच असे जणू ठरवून टाकले आहे. ह्याच चित्रपटांच्या रांगेत परवा अचानक 'ए टेल ऑफ टू सिस्टर्स' हा कोरिअन चित्रपट हाताला लागला आणि कधी एकदा पाहून संपवतो असे झाले.

दामिनी

लेखक मराठे यांनी सोमवार, 15/08/2011 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या दिवसभर घरात खूपच गरम होत होतं. टिव्ही वरून संध्याकाळी थोडा पाउस असेल असं सांगत होते पण सात साडेसात पर्यंत आकाशात कसल्याही संशयास्पद हालचाली दिसेनात. घरात उकडत होतं म्हणून बाहेर ग्यालरीत येउन बसलो. थोडावेळ गेला नसेल तोच वारा सुरू झाला आणि बघता बघता आकाश भरून आलं. हा हा म्हणता विजांचा कडकडाट सूरू झाला आणि दणदणीत शॉवरबाथ घेतल्यासारखा पाऊस सुरू झाला.

लडाख

लेखक तिमा यांनी शनिवार, 13/08/2011 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी आम्ही लडाखला गेलो होतो. परत आलो आणि दोनच दिवसांनी तिथे ढगफुटी झाली. थोडक्यात वाचलो. तेंव्हा घेतलेले हे फोटो. १. कारगिलकडून येणारा रस्ता. २. चमकणारा पर्वत. ३.

माझी चित्रकला -

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 13/08/2011 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. चित्रगूप्त यांच्या चित्रकलेच्या धाग्यावर मी माझे एक चित्र टाकले होते. त्याबद्द्ल त्यांनी दोन चांगले शब्द काढले होते. त्याने हुरळून जाण्याइतका मी मुर्ख निश्चितच नाही. पण तेवढ्यात श्री राजेश घासकडबींनीही माझी काही चित्रे पहायची इच्छा प्रदर्शीत केली म्हणून काही चित्रे टाकत आहे. (त्यांचाही रसभंग झाल्यास त्यांनी उदार अतःकरणाने माफ करावे) एक बाळबोध प्रयत्न म्हणून रसिकांनी याची चिरफाड करू नये ही विनंती :-) माझे पहिले ऑइल पेंटींग.

पौर्णिमेचा चंद्रमा..

लेखक योगप्रभू यांनी शनिवार, 13/08/2011 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
नोकरी मिळाल्यानंतर सुखाने राहणारा पुरुष जगाला बघवत नाही हेच खरं. आता हेच बघा ना! मला नोकरी लागली आणि आई-बाबांचा धोशा सुरु झाला, 'विद्याधर! आता वेळ घालवू नकोस. मनावर घे. आम्हाला लवकर सून बघायची आहे. तू फक्त हो म्हण. बाकी स्थळे बघण्याचा उपद्व्याप आम्ही आनंदाने करु.' मी हा हट्ट फारसा मनावर घेतला नाही. कारणे दोन. एक तर माझी भटकण्याची आवड आणि दुसरी माझी दिसेल त्या विषयावर वाद घालण्याची खोड. घरी वाद घालायला लागलो, की आई-बाबा कंटाळून म्हणायचे, 'ए बाबा! तू सारखा भटकत असतोस तेच परवडले. सॅक उचल आणि चालू लाग हवे तिथे.' मग पडत्या फळाची आज्ञा समजून मी घराबाहेर पडायचो.

जलेबी बाई...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 12/08/2011 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
जलेबीबाई... आम्ही स्वप्नातून दचकून उठलो आणि क्षणात बरळलो— “आम्ही जिलब्या पाडतो, तुम्ही भजी सोडा...” तसं जिलब्या पाडणं फार काही मोठं काम नाहीये बरं का. अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायचं, कढईतलं तूप उकळू लागलं की कॉटनच्या जाडसर फडक्यात पिठाचा गोळा भरून घेऊन मधोमध किंचित छिद्र पाडून मोठ्या नजाकतीने वेटोळे काढले की झालं. त्या जिलेब्यांना डालडा चांगला आतपर्यंत पिऊ द्यायचा. झाऱ्या कडेला ठेऊन त्या लालबुंद होईतोवर तळायच्या. मग व्यवस्थित निथळून घेतल्या की एकतारी पाकात डुबू द्यायच्या. त्यांनी पाक यथोचित शोषला की झाली खाण्यायोग्य जिलेबी तय्यार! तर अशी ही जिलेब्यांची पाककृती.