Skip to main content

विचार

उल्लेखनीय प्रथा

लेखक Nitin Palkar यांनी सोमवार, 16/03/2020 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात एका मित्राच्या मुलाच्या विवाह समारंभात गेलो होतो. नेहमी सारखाच मराठमोळा समारंभ. दोन उल्लेखनीय बाबी आढळल्या. हॉल मध्ये शिरताना, प्रवेशद्वारापाशी सर्व पाहुण्यांना एक कागदी पिशवी दिली जात होती. ज्या मध्ये बीज गोळ्या (seed balls) होत्या. सीड बॉल म्हणजे उपयुक्त झाडांच्या बिया शेणखत, अथवा तत्सम खातात लपेटून त्याचा तिळगुळा एवढा, थोडासा मोठा केलेला लाडू. आशा प्रकारे त्या बिया सहज रुजू शकतात.

कृतघ्न -4

लेखक बाप्पू यांनी मंगळवार, 10/03/2020 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 आता पुढे.... किसन्याने रामदास चा तो अवतार बघितला आणि त्याची घाबरगुंडी उडाली. जवळच्या विहिरीतून पाणी आणून तो रामदास च्या तोंडावर शिंपडू लागला. रामदास ला थोडीशी शुद्ध आली, पण बोलण्यासाठी कंठ फुटेना. घशातून फक्त पाय पाय असा पुसटसा आवाज येत होता. त्याच्या पायातील त्राण गेले होते.

मुंगूसाची गोष्ट- भाग २

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 07/03/2020 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
।। मुंगूसाची गोष्ट २ ।। ज्यांचे मांजे दिसत नाहीत अशा माना डोलावणाऱ्या पतंगांनी भरलेलं निळंशार आकाश पाहिलंय का? आणि मांजे दिसलेच तरी ते धरणाऱ्यांचे हात दिसत नाहीत. कोणीतरी फिरकी धरतं कोणीतरी उडंची ( पतंग हातात धरून लांब जाऊन योग्य वेळी वाऱ्याचा अंदाज घेऊन जागच्या जागी उंच उडी मारून हातातला पतंग आभाळात उडवणे) देतो; कोणीतरी कटलेल्या पतंगाला गोळा करायला धावतं. एकंदरीत पतंगाची पूर्ण काळजी घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. तर आम्ही एकत्र कुटुंबातले पतंग आसपासच्या सगळया अंगणात आणि आभाळात बागडत बागडत मोठे झालो.

कृतघ्न -3

लेखक बाप्पू यांनी गुरुवार, 05/03/2020 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 आता पुढे - ‌घरातील वातावरण आता बदलत होत. रामदास ला देखील याची थोडीफार जाणीव झालेली होती, इतके वर्ष घरातील प्रत्येकाच्या सुख दुःखाची काळजी घेणाऱ्या आणि कुटुंबावर आलेले प्रत्येक संकट लिलया पेलणाऱ्या माउलीच्या विरोधात आता घरातील च काही लोकं छुपा मोर्चा उभारत होते. ज्या सुना माउलीने घरात वाजत गाजत आणल्या होत्या त्याच सुनांनी आता माऊलीच्या विरोधात आपल्या नवऱ्याचे कान भरले होते.

ब्रह्मांड निर्मीती..ॐ=mc^2

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 03/03/2020 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रह्मांड निर्मीती..ॐ=mc^2 मी कोण आहे..आदीचा शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या वैदीक ऋषि नी केला.. योगविज्ञान.मेडिटेशन..चक्र ऎक्टिवेट केली अन त्याना तो अनाघत ओम्काराचा नाद ऐकु आला..तो अलोक दिसला.. व हे ब्रह्मांड म्हणजे अणु अन उर्जे पासुन निर्माण झाले असा सिद्धांत मांडला गेला म्हणजेच पिता शीव व माता पार्वति म्हणजेच उर्जा असे तीला नाव दिले गेले.. ब्रह्मांडातल्या प्रत्येक गोष्टीत चराचरात व त्याच्या निर्मीतित शिव पार्वती तत्व आहे असा सिद्धांत मांडला गेला.. मात्र पाश्च्याताना हा सिद्धांत माहित नव्हता त्यानी ब्रह्मांडाची विभागणी २ ढोबळ स्वरुपात केली.. १ म्य़ाटर..म्हणजे पदार्थ २ एन्रजी म्हणजे उर्जा.. म्याटर

कंटाळा..

लेखक आजी यांनी मंगळवार, 03/03/2020 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी खूप कंटाळा येतो. तो नेमका कशाचा येतो, सांगता येत नाही. सगळं सुखात चालू असतं. आखीव, रेखीव रुटीन. शीशी,मम्मं गाईगाई. त्यात कसलाही बदल नाही. खरं तर नो न्यूज इज गुड न्यूज, असं म्हणतात. त्यानुसार आपला रोजचा घटनाक्रम त्याच वेळेला, तशाच पद्धतीनं चालू आहे ही चांगलीच गोष्ट आहे की नाही? पण नाही. आपल्याला ती चांगली वाटत नाही. काहीतरी वेगळं घडावंसं वाटतं. रुटीन तोडायचं म्हणून पर्यटनाला जाणे, सिनेमाला जाणे, फिरायला जाणे, मित्रमैत्रीणींच्यात गप्पा मारणे असे काही उपाय आपण करतो. पण ते वरवरचे असतात. खोल कुठेतरी कंटाळा हटवादी तापासारखा आपल्यात मुरलेला असतो.

मराठी भाषेची भेट

लेखक शेशाद्री यांनी सोमवार, 02/03/2020 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
व्याकरणशुध्द भाषा वापरणार्यांना आपण न्यायासनावर नाही, याची जाणीव असणे महत्वाचे. तसे संस्कार पुढच्या पिढीवर होणे हेही तितकेच आवश्यक आहे. अन्यथा मराठी भाषेचा ऱ्हासच होईल. मुख्य लेख - मराठी भाषेची भेट लेखक शेषाद्री नाईक मराठी भाषा दिना निम्मित आपल्या मातृ भाषेविषयी --- एखाद्या बेळगावी माणसाने दळणाला 'दळप' म्हटले किंवा मुंबईच्या माणसानें मंडईच्या मागे ऐवजी 'पाठी ' म्हटले तर आपण भाषेचे वैविध्य म्हणून ते सोडून देतो. पण तेच एखाद्याने 'पाणी’ ऐवजी 'पानी ' म्हटले, तर अशुद्ध म्हणून टीका करतो . त्याही पेक्षा वाईट म्हणजे त्या माणसाला आपण 'शिवराळ' किंवा तत्सम उपाधी देऊन हिणवतो. असे कां ?

कृतघ्न -2

लेखक बाप्पू यांनी शुक्रवार, 28/02/2020 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग - https://www.misalpav.com/node/46154 आता पुढे. - रामदास ने मागे वळून पहिले. साडेपाच फूट उंच, अंगात खाकी वर्दी, खांद्यावर 2 स्टार आणि शिट्टी, हातात एक फाईल घेऊन कोणातरी अधिकारी उभा होता. प्रत्येक खाकी वर्दीतला माणूस म्हणजे पोलीसच अशी त्याची समजूत होती. घाबरलेल्या नजरेने त्याने त्याच्या हाकेला ओ दिली. जनाबाई आणि दोन्ही पोरे देखील घाबरली. एकतर दोन तीन दिवस सर्वजण अर्धपोटी, खिशात पुरेसे पैसे नाहीत आणि आता हे पोलिसांचे लफडे मागे लागले म्हणून त्याला घाम फुटला.

मतदार हुशार झालेत का ?

लेखक विवेक9420 यांनी शुक्रवार, 28/02/2020 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोवत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे.

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

लेखक महासंग्राम यांनी गुरुवार, 27/02/2020 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. मिसळपाव परिवारातल्या समस्त मराठी जनांना मराठी राजभाषा दिनाच्या मऱ्हाटमोळ्या शुभेच्छा ! मराठी बोलूया, मराठी जपूया, मराठी वाढवूया ! हे आपलं मिसळपावडॉटकॉम चं ट्विटर खातं ज्यांना शक्य असेल त्यांनी लाईक आणि रिट्विट करा. आणि #मिसळपावडॉटकॉम हा हॅशटॅग वापरायला विसरू नका.