चांगल्या बातम्या - एक उपक्रम!
नमस्कार मिपाकर्स!
खूप दिवसांपासून मनात एक विचार घोळतोय. येथे त्याबद्दल थोडी चर्चा कराविशी वाटली.
आपल्याकडील मिडिया अट्टाहासानं नकारात्मक बातम्या देतांना आढळतो. टीव्ही पाहणं बंद करून टाकावं इतकं ते नकारात्मक असतं, मनांवर वाईट परिणाम करणारं असतं. खासकरून जेव्हा आपण आपल्या परिवारासमवेत टीव्ही पाहत असतो त्यावेळेस हे ठळकपणे जाणवतं. अगदी वर्तमानपत्रातून देखील एखादी सकारात्मक, सर्जनशील बातमी शोधून काढावी लागते. आणि बर्याचशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत हेही तेवढंच खरं.
म्हणून एक उपक्रम सुरु करावासा वाटला. चांगल्या, सकारत्मक, सर्जनशील बातम्या/माहिती पुढे आणण्याचा.
मिसळपाव
गर्भाचे लिंग निश्चित होण्यास वाय-गुणसूत्र कारणीभूत असते असे मानले गेले आहे. पण वाय गुणसूत्रावरील Sry या जनुकाचे गर्भधारणेच्या काळात काम बिघडले तर लिंगदोष निर्माण होतात. पर्यावरण यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पाडत असते.
निसर्गाच्या या चुकीचे उंदरांमधले कारण शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. गर्भधारणेच्या काळात लोहाची कमतरता या दोषाला कारणीभूत ठरते, असे उंदरावरील संशोधनात आढळले आहे.