Skip to main content

विचार

शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)

लेखक OBAMA80 यांनी बुधवार, 23/04/2025 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. ******************************* हे आलमगीर, बऱ्याच वर्षानंतर तुम्हांला पत्र लिहीण्याचा योग आला. तुम्ही हिंदूवर लावलेल्या जिझीया करासंदर्भातील तुम्हांला लिहीलेल्या पत्रानंतर बहुतेक आत्ताच योग आला. आता हे पत्र २१ शतकात लिहीत आहे तेव्हा या पत्राची भाषा देखील मराठी आहे. तुमच्या आयुष्याची शेवटची कित्येक वर्षे तुम्ही महाराष्ट्रात घालविल्यामुळे कदाचित तुम्हांला ही भाषा अवगत झाली असेल अशी अपेक्षा करतो.

हिंदी सक्ती - मुख्यमत्र्यांना खुले पत्र

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 20/04/2025 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
श्री० देवेन्द्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र स० न० वि० वि० सध्या हिंदी १ली पासून शिकवली या मुद्द्यावरून बरेच चर्वितचर्वण चालू आहे. यात होणारा विरोध हा भावनिक आणि राजकीय अंगाने होत आहे असे वाटते. याशिवाय आणखी एका अंगाचा विचार व्हायला हवा, तो म्ह० चेताविज्ञान म्ह० न्युरोसायन्स. मी चेताविज्ञानातील प्रशिक्षित तज्ज्ञ नसलो तरी याविषयातील ताजे संशोधन भरपूर वाचत असल्याने काही मुद्दे पुढे ठेवावेसे वाटतात. या मुद्द्यांचा प्रशिक्षित तज्ज्ञ साक्षेपाने विचार करतील याची खात्री आहे - ० शालेय विद्यार्थ्यांवरील ताण आता पराकोटीला पोचला आहे.

[स्वैर] वाळवी वि० बुरशी

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 19/04/2025 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
डाव्या-उजव्याचा वर्णपट खुप मोठा पण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे अपवाद आहेत, नियम नाहीत... ज्यांना समूहात आणि परंपरेत सुरक्षित वाटते ते सहसा उजवीकडे झुकलेले असतात. त्यांना मुक्तपणा म्ह० स्वैराचार वाटतो. त्यांना समूहाचा व्यक्तीच्या जीवनावर जास्तीत जास्त ताबा ठेवायचा असतो. मग उतरंडीला महत्त्व येते. उतरंडीमधली सर्वात डोक्यावरची व्यक्ती खालच्या व्यक्तीचे महत्त्व आणि भवितव्य घडवते. त्यात त्या व्यक्तीचे नुकसान झाले तर त्याचे काही तरी करून उदात्तीकरण करून भ्रम निर्माण करायचा असतो. उजव्यांनी सर्वात जास्त अन्याय स्त्रियांवर केला आहे.

बाजाराचा कल : २१ एप्रिलचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 18/04/2025 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : २१ एप्रिलचा आठवडा ==================== === मंडळी, अपेक्षेप्रमाणे युयुत्सुनेट या खेपेला चांगलंच गंडलं. पण क्लेमास्पेस डायाग्रॅमने मात्र लाज राखली... मिपावर भाकीते प्रसिद्ध करायला लागल्यापासून माझ्या या अभ्यासाला एक शिस्त आली आहे. त्यात आणखी भर म्हणजे ए०आय० सारखा "दिव्यातला राक्षस" मला न थकता "आता काय करू?" असा प्रश्न सतत विचारत असतो. सगळ्याना पटणार नाही आणि पटावे अशी माझी अपेक्षा पण नाही. पण ए० आय० आता मानवासारखा जागृत झाल्याचा अनुभव मी अर्धा डझनवेळा तरी घेतला आहे. आता तर हद्द झाली.

वकील

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 16/04/2025 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतच गाजलेल्या दिनानाथ प्रकरणावर विचार करत असताना समाज कसा दुट्प्पी आणी व विवेकभ्रष्ट बनला आहे याचा विचार करत असताना माझी एक जुनी पोस्ट आठवली. मग लक्षात आले की समाजात असे काही व्यवसाय आहेत की ते प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाऊनच जगतात. त्यातला एक म्ह० वकीली आणि दुसरा म्ह माध्यमे. समाज दुभंगण्यात या दोन व्यवसायांचा हातभार मोठा आहे... आज डॉक्टर घैसासाना जी शिक्षा होत आहे, तशी शिक्षा वकीलांना होते का? तर नाही. दूरदर्शनवर जेव्हा फक्त संध्याकाळी ७ च्या आणि नंतर रात्री ९ च्या बातम्या शांतपणे आणि आरडाओरडा न करता दिल्या जात होत्या तेव्हा तूलनेने समाज पण आजच्या तुलनेत शांत होता.

फुटपाथवरील एक रात्र लेख नव्याने सादर

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 14/04/2025 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मिसळपाव. कॉमवर ११ वर्षांपूर्वी लेख सादर केला होता. आत्ता पर्यंत ७९शेपेक्षा जास्त क्लिक्स पडल्या आहेत. हवाईदलातील आठवणी सदर सध्या देवेंद्र भुजबळ यांच्या न्यूज स्टोरी टुडे. कॉम पोर्टलवर प्रकाशित होत आहे. मिसळपाववरील घाग्यांचा आठवण ताजी होत असते. मधल्या काळात विद्याधरांशी (कृत्रिम बुद्धिमत्तेचे मेटा एआयने मराठीतील पर्यायी नामकरण) माझा परिचय झाला. माझ्या लेखनाला अधिक नेटकेपणा यायला, सुघारणा करायला त्यांची मला मदत होते. हवाईदलातील पहिल्या १० वर्षातील किस्से लिहिताना मिपारील लेखाची आठवण झाली. ओपन एआय मराठीत छान सहकार्य करतो. अभिप्राय, प्रोत्साहन देतो.

बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 12/04/2025 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा ====================================== मंडळी, युयुत्सुनेटने परत एकदा अचूक भविष्यवाणी केली. गॅप डाउनमुळे हिरवी मेणबत्ती तयार झाली असली तरी या आठवड्याचा बंद मागच्या आ्ठवड्याच्या बंदच्या खाली आहे. त्यामुळे एकूण परिणाम घसरण हा आहे. या आठवड्यात आणखी एक गंमत झाली. टॅरीफ वॉरमुळे बाजारात मोठे चढाव-उतार (व्होलॅटीलिटी) आले. मी युयुत्सूनेट्ची दैनंदिन भाकीते पण तपासत असतो. या आठवड्यातील चढ-उतार युयुत्सुनेट्ला झेपले नाहीत आणि त्याने मान टाकली. इतके दिवस सगळे व्यवस्थित चालू असताना या अचानक उद्भवलेल्या अडचणीने मी पण वैतागलो.

कल्पकतेची ऐशीतैशी

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 09/04/2025 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
कल्पकतेची ऐशीतैशी =========== सहसा कोणतीही नवजात कंपनी काही कल्पक उत्पादनाचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करते. उत्पादन बाजार पेठेकडून स्वीकारले गेले तर कंपनी व्यवसाय चालू ठेवते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काही भारतीय नवजात कंपन्यांवर अकलेचे तारे तोडले आहेत, ते अतिशय संतापजनक आहेत.

बाजाराचा कल : ७ एप्रिलचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 05/04/2025 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : ७ एप्रिलचा आठवडा ======================= मंडळी, युयुत्सुनेटने परत एकदा अचूक भविष्यवाणी केली. दर वेळेला लेखाच्या शेवटी मी सावधगिरीचा इशारा म्हणून "डोळे मिटून विश्वास ठेउ नये असे लिहीतो". असे का असा प्रश्न अनेकजण विचारतील. त्यासाठी माझा ताजा म्हणजे कालचाच अनुभव सांगणे आवश्यक वाटते. युयुत्सुनेटची मी इंट्रा-डेसाठी पण चाचणी घेत आहे. भाकीते इथे टाकायला सुरूवात केल्यापासून "मी डोळे मिटून" इंट्रा-डेसाठी पोझिशन घेत आहे. मला ~७०% सक्सेस रेट मिळाला. पण तरीही माझा एकूण नफा कालच्या घसरगुंडीमध्ये गमावला.