Skip to main content

विचार

माम्मा  मिया

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 13/04/2020 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
चिकोडी तालुक्यातल्या एकसंब्याचा पहिलवान श्रीपती खंचनाळे जेव्हा "हिंद केसरी"ची लढत दिल्लीत जिंकला तेव्हा सगळ्या चिकोडी तालुक्याला आणि कोल्हापूर-बेळगांव परिसरातल्या कुस्ती शौकिनांना  ही कुस्ती बघण्यासाठी आपण दिल्लीला हजर नसल्याची चुटपूट लागलेली होती. जर तीच कुस्ती कोल्हापुरात झाली असती तर हेच सगळे कुस्ती शौकीन, गावागावांतून वर्गणी काढून, कसेही करून आपापल्या गावातून ६०-७० मैलांचा प्रवास करून खासबागेत घुसून "त्यांच्या" पहिलवानाची ही ऐतिहासिक कुस्ती प्रत्यक्ष बघण्याकरता हजर राहिले असते.

चकाकीच्या नावाखाली दमणूक

लेखक जेडी यांनी रविवार, 12/04/2020 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
सद्या 'वर्क फ्रॉम होम' सुरू आहे. प्रवासाचे दिड तास वाचत आहेत. धूळ, प्रदूषण, रहदारी यापासून सुटका आहे. पण तरीही खूप दमायला होतं . गेल्या काही दिवसांत कोणतीच नवीन रेसिपी बनवली नाही. तरीही संध्याकाळ पर्यंत जीव मेटाकुटीला येतोय. कामवाल्या मावशी येत नाहीत. त्यामुळे दोन्ही वेळचा स्वयंपाक, ऑफिसचे काम पण हे तर मी पूर्वीही करायचे पण आता प्रवासाचा वेळ वाचूनही सायंकाळपर्यंत जीव मेटाकुटीला येतो. फरशीही मी काही रोज पुसत नाहीये पण तरीही दिवसभर घरातले काम, ऑफिसचे काम ( अगदी काटेकोरपणे त्या मिटिंग करणे, सारखे तेच तेच स्टेटस घेणे, देणे).

मठ

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 11/04/2020 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
ना गुणी गुणीनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी । गुणीच गुणरागीच विरलः सरलो जन: ॥ अर्थ- गुण नसलेल्याला गुणी माणसाची परिक्षा होत नाही, जो स्वत: गुणी आहे तो दुसर्‍या गुणी माणसाचा मत्सर करतो. स्वत: गुणी असुनही दुसर्‍याच्या गुणावर प्रेम करणारा सरळ मनाचा माणूस विरळाच असतो. एकदा सामाजिक, मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्तीस भेटायला गेलो. बोलता बोलता स्त्रीवादाचा विषय निघाला. मी मिळून सार्‍या जणींच कौतुक केल. विद्या बाळ, गीताली व इतर अशा या क्षेत्रात काम करणार्‍या लोकांविषयी आदर व्यक्त केला. बाई मनातून खवळल्या पण मोठ्या संयमाने पण तुच्छतेने मी त्यांच्यापैकी नाही असे निक्षून सांगितले.

लॉकडाऊनच्या दिवसांमधलं गीतरामायण

लेखक अबोलघेवडा यांनी शनिवार, 11/04/2020 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
गदिमांनी रचलेलं आणि बाबूजींनी गायलेलं गीतरामायण हे काव्य अवीटातलं अवीटच. दुर्दैवाने बाबूजी प्रत्यक्ष स्वतः गात असताना गीतरामायण ऐकण्याचं भाग्य कधी लाभलं नाही मला. पण नंतर एकदा श्रीधरजींच्या मुखातून ऐकण्याचा योग आला आणि त्यांच्याही सुमधुर आवाजाने त्यावेळी मी तृप्त झालो होतो . तुम्हाला सांगतो त्या कार्यक्रमामध्ये मी अक्षरशः रडत होतो. वास्तविक आपण मोठी माणसं अशावेळी स्वतःला सावरायचा प्रयत्न करतो. पण एका क्षणानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता स्वतःला सावरणं निव्वळ अशक्य आहे. तसंच आजूबाजूला नजर टाकली आणि लक्षात आलं की इतरही बरेच जण रडतातच आहेत. मग म्हटलं कशाला उगाच स्वतःला सावरा?

स्वतःला ओळखा, इतरांनाही ओळखा - करोना माहात्म्य ||३||

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 09/04/2020 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
करोना माहात्म्य ||३||
स्वतःला ओळखा, इतरांनाही ओळखा
 
       करोना हे संकट अक्षरश: अभूतपूर्व असे आहे. यापूर्वी अशा तऱ्हेचे संकट देशावर कोसळले होते किंवा नाही हे सांगणे तसे अवघड आहे.

दिल हैं छोटासा, छोटीसी आशा..

लेखक आजी यांनी बुधवार, 08/04/2020 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊन चालू आहे. तो कदाचित वाढेल अशा बातम्या येताहेत. किंवा अंशतः हटेल.देशाचा काही भाग सील केला जाईल,काही भाग मोकळा ठेवला जाईल असंही बोललं जातंय. दिवसागणिक रुग्ण वाढताहेत. म्रुतांचा आकडा वाढतोय.बरेचसे भाग हॉटस्पॉट म्हणून जाहीर झालेत. रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स,नर्सेस इतर स्टाफही कोरोनाला बळी पडतोय.व्ही आय पी लोकांच्या घराच्या आसपासही कोरोना शिरलाय. इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आय सी यूत आहेत. राणी एलिझाबेथ, प्रिन्स चार्लस् क्वारंटाईन झालेत. रोजच्या अशा बातम्या वाचून सुन्न व्हायला होतंय.न्यूजपेपर बंद झालेत. टीव्हीवर फक्त कोरोनाच्याच बातम्या.

तुमच्या प्राणप्रिय व्यक्तीची तुम्हीच हत्या करू नका - करोना महात्म्य ।।२।।

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 08/04/2020 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
करोना माहात्म्य ||२||
तुमच्या प्राणप्रिय व्यक्तीची तुम्हीच हत्या करू नका
 
       मनुष्य मरणाला भीत नाही आणि हाच करोनाशी लढताना सगळ्यात मोठा अडचणीचा भाग ठरणार आहे. जो मरणाला भीत नाही, तो स्वतः बेसावध असतो आणि दुसर्‍याचे जीवनही बेसावधपणे धोक्यात घालू शकतो.

Marrital Rape अर्थात वैवाहिक बलात्कार

लेखक chittmanthan.OOO यांनी रविवार, 05/04/2020 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
"उसका मन हो तो वो लेटेगी और उसका मन नही तो नही.. ऐसा कैसे चलेगा भाई..." अश्या प्रकारच्या कॉमेंट्स आपण सहज ज्या विषयावर पास करतो तो विषय म्हणजे marrital rape...!!! . हा शब्द ऐकला की अनेकांच्या भुवया उंचावतात किंवा याबद्दल बोलणं म्हणजे लग्नसारख्या पवित्र गोष्टीवर धर्मविरोधी लोकांनी उडवलेले शिंतोडे वाटतात. पण आजच्या दिवस माझ्यासोबत तिची बाजूही ऐकण्याचा प्रयत्न करा. जमलं तर यावर विचार करा नाहीतर काय फालतूपणा आहे म्हणून ही गोष्ट सोडून द्या. पहिल्यांदा तुम्हाला बलात्कार म्हणजे काय हे सांगतो.

हसता हसता जगणे शिका, हसण्याची सवय बनवा.

लेखक कबिर यांनी शनिवार, 04/04/2020 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
चेहऱ्यावरील हास्य सर्व तणावाना दूर करते. हसरा चेहरा सर्वाना आकर्षित करतो. अनोळखी व्यक्तीबरोबर हास्याद्वारे मैत्रीचे तार जुळतात. चेहऱ्यावरील हास्य दुसर्यांना आनंद देतेच पण स्वतःला एक आंतरिक प्रसन्नतेचा अनुभव देते. तन मनाला ऊर्जा प्रदान करते. जी व्यक्ती हसत हसत प्रत्येक समस्येवर मार्ग काढते ती व्यक्ती जीवनात सफलता प्राप्त करतात. हास्य एक व्यायामासारखे आहे, त्यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढते. लहान बाळ जन्मतःच रडतो. चार पाच हप्त्याने स्मितहास्य करतो. चार पाच महिन्यांनी हसायला लागतो. लहान बाळाचे हास्य निरागस असते. खरे प्रेमयुक्त हास्याचा अभ्यास केल्यास संपूर्ण जीवनात साकारात्मक बदल दिसतात.