Skip to main content

विचार

अप्रिय आठवणींपासून सुटका

लेखक शाम भागवत यांनी सोमवार, 06/07/2020 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. मला माझ्यातल्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हे सुचवले गेले आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हते. २००७ च्या सुरवातीपासून अंदाजे दीड वर्षे मी अभ्यास करीत होतो. मे २००७ च्या पहिल्या आठवड्यात घडलेली ही गोष्ट आहे. एक दिवस रात्री गाढ झोपलेलो असताना एकदम जाग आली. पहाटेचे साडेचार पाच वाजले असतील. मनात विचार सुरू होत असतानाच माझा जपही सुरू झाला होता. एवढ्यात मला नेहमी त्रास देणाऱ्या एका माणसाची आठवण आली आणि मन एकदम संतापाने भरून गेले. हातात पिस्तूल घेऊन गोळ्या माराव्याश्या वाटत होत्या.

अथ श्री पुरुषलीळा।

लेखक आजी यांनी गुरुवार, 25/06/2020 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक माणूस वेगळा असतो तसा प्रत्येक पुरुषही वेगळा असतो. पण तरीही सर्व पुरुषांच्यात मिळून काही गोष्टी सारख्या,समान असतात. मग तो नवरा, मुलगा, भाऊ, काका, मामा कुणीही असो. याला काही सन्माननीय अपवाद असतातही. पण अपवादाने नियमच सिद्ध होतो. ट्रेन किंवा बस सुटायची वेळ झाली तरी वेळेवर न येणे हा कॉमन पॉईंट. ट्रेनची शिटी होते. सिग्नल मिळतो. ती हलते. चालू लागते तरीही खाली उतरलेल्या पुरुषाचा डब्यामधे पत्ता नसतो. बायको कावरीबावरी होते. मुलं रडू लागतात, तेव्हा कुठे हे पुरुषमहाशय कंपार्टमेंटमधे येतात.

जाज्वल्य राष्ट्राभिमान, थोरा मोठ्यांचे पुण्यस्मरण वगैरे...

लेखक सर टोबी यांनी सोमवार, 22/06/2020 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
या देशात जरा चुकीच्याच काळात आपण जन्माला आलो हि भावना आजकाल फार बळावते. स्वातंत्र्यानंतरची बहुदा दुसरी पिढी असावी आमची. येता जाता म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली अगोदरच्या पिढीने केलेला अभ्यास, स्वतंत्र भारतात जन्माला आल्याचे भाग्य, वगैरे गोष्टी कानावर आदळत असत. स्वातंत्र्य सैनिकांनी आंदोलनात घेतलेली उडी, आसुडाचे फटके, नखं उपसून काढणे, दगडी घाण्याला जुंपून घेणे, फाशी जाणे अशा शिक्षा भोगणे असे सहन केलेल्या लोकांनाच राष्ट्राभिमानी म्हणवून घेण्याचा अधिकार आहे असे कुठे तरी वाटायचे. हे कमी म्हणून कि काय, त्या वेळेस अभिनव असणारी गोष्ट म्हणजे परदेशी वास्तव्य.

हॅपी शॉपिंग

लेखक श्रीकांतहरणे यांनी सोमवार, 22/06/2020 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑफिस कामातून कम्पलसरी सुट्टी घ्यायची होती. लॉकडाउन काळात एम्प्लॉयी वर्क फ्रॉम होम करीत असल्यामुळे, सुट्टीच घेत नाही, हे मॅनेजमेंटच्या लक्षात आले. तेव्हा एक दिवस कम्पलसरी सुट्टीचा नवीन नियम लागू झाला. हे कंपल्शन एम्प्लॉयी, की एम्प्लॉयर कोणच्या हिताचे, यावर फाटे पाडल्यापेक्षा, दोघांनाही एक दुसऱ्यापासून, एक दिवस मुक्ती, आराम, एक दुसऱ्यासाठी बाळगलेली काळजी, असे समजून "इट्स विन विन सिच्युवेशन फॉर बोथ" असे मानायला हरकत नाही. मग आजचा दिवस काही मार्गी लागतो की नाही ते बघायला हवे.

जीजी

लेखक सौन्दर्य यांनी रविवार, 21/06/2020 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. कित्येक वेळा छोट्या छोट्या घटना, गोष्टी आपल्याला आपल्या पूर्वायुष्यात नेतात. ह्या घटना एखाद्या दिव्याच्या बटनाप्रमाणे असतात, बटन दाबले की लख्ख प्रकाश पसरतो तसे आपल्याला काहीतरी अचानक आठवते. जीजी म्हणजे माझी आजी, तिच्या विषयीची खालील आठवण ही अशीच एका रेडिओ प्रोग्रॅमवरून जागृत झाली. जीजी आज सकाळी ऑफिसला येताना एन.पी.आर. रेडियोवर (ह्युस्टनचे लोकल रेडिओ स्टेशन) एक ‘स्टोरी कोर’ नावाचा कार्यक्रम ऐकला. तसा तो दर शुक्रवारी ब्रॉडकास्ट होतोच म्हणा पण आज ऐकायचा योग आला.

हम जल्द ही लौटेंगे एक ब्रेकके बाद.. तोपर्यंत घाला पिठामध्ये तेल..

लेखक आजी यांनी गुरुवार, 18/06/2020 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
जाहिरात जीवनाचं अविभाज्य अंग आहे. फार प्राचीन काळापासून जाहिराती केल्या जाताहेत. त्या आज वाचल्या की हसू येतं. जाहिरातदार सकाळपासूनच आपलं काम सुरु करतात. आपण आंघोळीला कोणता साबण वापरायचा, केसांना कुठलं तेल लावायचं म्हणजे ते'लंबे ,घने,काले'होतील. स्वयंपाकात कुठलं तेल वापरायचं की तुम्ही बटाटेवड्यासारखे चमचमीत पदार्थ नेहमी खाऊ शकाल. जीवनसाथी कसा निवडावा,त्यासाठी कोणत्या डॉट कॉम वर जायचं, गुंतवणूक कुठे करावी, कुठल्या जंतुनाशकानं फरशी स्वच्छ करावी,दात कशानं घासावेत म्हणजे दाताबरोबरच 'मसूडे'मजबूत होतील, क्रिम्स, डायपर, निळा रंग वापरून सँनिटरी पँडस्,चप्पल, शूज, लस्सी, दूध, कुकर,बिस्किट,नाश्ता!

एका खटल्याची गोष्ट - २

लेखक पहाटवारा यांनी गुरुवार, 18/06/2020 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व तयारी झाली. होता करता प्रत्यक्ष कोर्टात जाउन, जज समोर माझी बाजू मांडण्याचा दिवस आला. ------------------------------------------------------------------------------------------- कोर्टात हजर राहण्यासाठी जेव्हा कामावरुन सुटी घेण्याची वेळ आली, तेव्हा मनात परत एकदा विचार आला की आपण उगाच याच्या मागे लागलो आहोत का ? एवढे करुन काही तरी फायदा होणार आहे का? पण बहुदा कुणीतरी आपल्यावर चुकीचा आरोप केला आहे ही कल्पना माणसाला सहन होत नसावी. मी पुन्हा एकवार नीट आठवून पाहिले की आपण अनवधानाने तर सिग्नल तोडला नसेल ना ?

हिजडा आणि क्रमवार निरीक्षणं

लेखक लेखनवाला यांनी बुधवार, 17/06/2020 10:47 या दिवशी प्रकाशित केले.

हिजडा आणि निरीक्षणं : क्रंमाक एक : कचरेवाला

रोज सकाळ व्हायची, तो कामाला जायला निघायचा, मेन रस्त्याअगोदर तिथं एक हनुमानाचं छोटसं मंदिर होतं आणि बरोबर त्यांच्याअगदी समोर एक भलमोठं गणपतीचं मंदिर दोन्हीकडे अनुक्रमे शनिवार आणि मंगळवारी गर्दी असायची, त्यांच्यापुढे सुरु व्हायचा रेल्वेस्टेशनला जाणारा रस्ता आणि बसस्टॉप, समोर येणारी बस पकडण्यासाठी बसस्टॉपच्या अगोदरच त्या हनुमान मंदिरापाशी लोक जमा होतं, तिथं तो ही यायचा, जर तिथं बस भेटली तर पकडायची नाहीतर सरळ चालत रेल्वेस्टेशन गाठायचं, त्यासाठी अर्धा तास लागायचा.

धन्य (?) ती लेखनकळा!

लेखक आजी यांनी गुरुवार, 11/06/2020 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी लिहिते. (हे तुम्ही बघता आहातच).. आत्तापर्यंत बऱ्यापैकी लेखन केलंय. लहानपणी माझे निबंध माझे मराठीचे सर वर्गात वाचून (त्यावरुन अक्षरही बरे असावे.) दाखवत असत. त्यामुळे मला आणखी लिहावंसं वाटायला लागलं. आई कविता करायची. मी मात्र कधीही कविता केल्या नाहीत. (वाचकांनी हुश्श् केलं तरी चालेल. मी माईंड करणार नाही.) अगदी प्रेमात पडल्यावर सुद्धा कविता केल्या नाहीत. मला आल्या नाहीत. मला झाल्या नाहीत. पण म्हणून काय झालं मला कविता वाचायला आवडतात. मी लिखाण मात्र चालू ठेवले. सुरुवातीला मी अगदीच कच्चं मडकं होते.

जरी आंधळी मी तुला पाहते

लेखक मी-दिपाली यांनी शुक्रवार, 05/06/2020 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हाना मन की बात सगळ्यांच्याच परिचयाची झाली आहे. पण हे गाणं ऐकलं ..जरी आंधळी मी तुला पाहते ...आणि वाटलं अरेच्चा ! हे तर मन की आँख! दिव्यदृष्टीच म्हणा ना! महाभारतात महर्षी व्यास संजयास दिव्यदृष्टी बहाल करुन जातात; कुरुक्षेत्रावरील वृत्तांत धृतराष्ट्रास कथन करण्यासाठी. गांधारीची दिव्यदृष्टी मात्र तशी बक्षीसपात्र नाही. अंध धृतराष्ट्राशी लग्न होणार समजताच आजन्म डोळ्यावर पट्टी बांधुन घेण्याच्या कठोर प्रतिज्ञेत स्वतःला बद्ध केलं तिने. त्या साधनेतुन, तपश्चर्येतून ती कमावलेली.