Skip to main content

विचार

परीक्षा, उत्तरं आणि समुद्र!

लेखक लेखनवाला यांनी सोमवार, 10/08/2020 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी साडेचार वाजता उठायचं! का तर? सकाळी एकदम टाईमावर सात वाजता परीक्षाक्रेंदावर हजर व्हायचं… कशाला? साडेनऊ वाजताच्या पेपरसाठी…पेपर किती?…तीन… पहिले दोन पेपर झाले की साडेबाराला सुटका. आणि पुन्हा तिसरा आणि शेवटचा पेपर होणार दोन वाजता. तो अडीच तासाचा म्हणजे एका दिवसात तीन पेपर देवून मुक्तता होणार ती सांयकाळी साडेचार वाजता. परीक्षेला मित्र म्हणावा सोबतीला तर कोणी नाही. मग चला एकटेच... काही मोठाली उत्तरे लिहायची नाहीत की परिच्छेदांनी रकाने भरायचे नाहीत, काही नाही, निव्वळ प्रश्न त्याचें चार पर्याय, काही जास्त हाताला ताण न देता पेपर सोडवायचा, हे झालं वेळापत्रक.

!जय श्री राम! - अखेर श्री. मोदींनी करुन दाखवलं

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 05/08/2020 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
ढुशक्लेमरः- माझा भाजप पक्षाशी कोणाताही संबध नाही आणि मी मोदीभक्तही नाही. जे जे मनात आलं आणि आठवलं तसं तसं लिहत गेलो. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आज अयोध्येत पं.प्र. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.

संपला फ्रेंडशिप डे......

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 05/08/2020 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
कसला डोंबलाचा फ्रेंडशिप डे. च्येष्टाय गड्या हा डे !!! ‘मी तुला माझा फक्त चांगला मित्र मानते...' या वाक्याची लय भीती वाटायची राव ! कोंच्या क्षणी थोबाडावर हे वाक्य येऊन आदळेल याचा नेम नसायचा. बरं, ते आलंच अंगावर की मेंदू त्यावेळी मात्र सटासट कॅल्क्युलेशन करायचा. तेवढे फास्ट कॅल्क्युलेशन इंजिनियरिंगला असताना झाले असते तर आज कुठच्याकुठं गेलो असतो आपण!

सुंदर महाराज

लेखक लेखनवाला यांनी मंगळवार, 04/08/2020 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
********************** गल्लीतल्या त्या साईमंदीराच्या पुढच्या बाजूच्या बैठया चाळीत बाजूने मोठासा नाला जातो…. सततचा बगळ्याचा वावर एखादया ओढयाला लाजवेल असा… सतत पाणी वाहत असतं निवातं….. इतकं असूनही त्या परिसरात कधीही मच्छर, डास यांचा त्रास जाणवत नाही, का तर? कारण एकच, तिथं कधीही कोणत्याही वेळी धुपारे घालणं चालू असतं. कोण करतं हे? सुंदरमहाराज. इतरवेळी मस्त शर्ट-पॅन्ट घालून स्कूटीवरुन अख्खं मुंबई शहर फिरणारे पण मग संसारासाठी रोजगार आवश्यक, त्यामुळे जशी सूर्याची पाठ फिरली की भगवी लुंगी नेसत घरात प्रवेश करत आपल्या कामाला लागतात.

दाभोळकर आणि साळगांवकर

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 26/07/2020 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
*************************** आज सुटटी होती आणि रक्षाबंधन पण. सकाळी उठणं लवकरच होणार होतं, साहजिकचं होतं घरी पाहूणे येणारे होते, हो बहिण, आत्या येणार होती, आघोळं संपली आणि मग नेहमीसारखा टी. व्ही लावला, बातम्याचं चॅनेल लावलं, ब्रेकिग न्यूज होती, नंरेद्र दाभोलकराचीं पुण्यात गोळ्या घालून सकाळी हत्या केली होती, माझी पहिली प्रतिक्रिया होती, “असं नाय व्हायला पाहिजे होतं”. आणि मग टी. व्ही. वर झळकत होत्या मान्यवराच्या प्रतिक्रिया, दाभोलकरांनी दिलेल्या मुलाखती आणि इतर चित्रण विविध न्यूज चॅनेल दाखवत होते.

अथ स्त्रीलीळा ।

लेखक आजी यांनी शुक्रवार, 24/07/2020 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझी एक मैत्रीण आहे. टू बेडरुममधे राहते. तिला एक नवरा(सुदैवानं एकच असतो.अधिक लफडी करण्याचे गटस् बहुतेक स्त्रियांमधे नसतात.) आणि दोन मुलगे आहेत. (दोन दोन मुलगे म्हणजे तिचा "स्त्रीजन्म धन्य" झालेला आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात तिचा नवरा बेडरुममध्ये बसून लॅपटॉप जोडून वर्क फ्रॉम होम करत असतो. त्याला कॉनकॉल्स असतात. त्याला डिस्टरबन्स चालत नाही. एक मुलगा सेकंड बेडरुममधे आणि एक मुलगा हॉलमधे झूम वगैरेवर ऑन लाईन शिकत असतात. त्यांनाही शांतता लागते. डिस्टरबन्स चालत नाही. मग मैत्रीणीने बसायचं कुठे? तर स्वयंपाकघरात. गुपचूप. घरात टीव्ही लावायचा नाही. गाणी लावायची नाहीत.

नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 23/07/2020 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती.

करोना व्हायरस - अंताची सुरवात?

लेखक नेत्रेश यांनी सोमवार, 13/07/2020 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
२०व्या शतकाच्या उत्तरार्धात जग खुप जवळ आले. परदेश प्रवास नित्याची बाब झाली. वेगवेगळ्या देशातील लोक दुसर्‍या देशात सहजपणे स्थायीक होउ लागले. मेल्टिंग पॉट चा कॉन्सेप्ट काही शहरापुरता मर्यादीत न रहाता जगभर पसरला. अत्यंत जोमाने आर्थिक भरभराट होउ लागली. २१व्या शतकाच्या सुरवातीला नवनवीन गॅजेट्स स्वस्तात उपलब्ध झाली. व्हॉट्सअ‍ॅपने STD / ISD कॉल्स ईतिहासजमा केले. पण त्याचबरोबर नैसर्गीक साधनसंपत्ती प्रचंड महागली. अवघ्या काही वर्षांतच सोने, जमीन ईत्यादी १० तो १५ पट महागले. लोकांचे आयुष्यमान खुप वाढले. पुढारलेल्या देशात लोक सहजपणे ९० - १०० वर्षे जगु लागली.

बट्ट्याबोळ-१

लेखक कपिलमुनी यांनी रविवार, 12/07/2020 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊनचा बट्ट्याबोळ जगभरात लॉकडाऊन हा वाढणाऱ्या पेशंटच्या संख्येच्या तयारीसाठी वापरला जात असताना आपल्या देशात मात्र हाच एकमेव रामबाण उपाय म्हणून वापरला गेला. कोणतेही प्लॅनिंग ना करता जाहीर केलेला लॉकडाऊन 1,2,3 असा मनमानेल तसा वाढवत नेला.

माझं नाशिक

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 06/07/2020 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझा जन्म नाशिकचा. अशोकस्तंभाजवळच्या कुठल्याश्या हॉस्पिटलात माझा जन्म झाला. ४१२, वकीलवाडी हे माझं आजोळ. तिथं मामाचं कुटुंब आणि आजी आजोबा राहायचे. ४१२ चं घर भाड्याचं. जुन्या पद्धतीचं वाडावजा घर. त्यात बरेच भाडेकरु असंत. मुख्य दरवाजातून आत शिरताच एक अंधारा बोळ, त्यातून बाहेर पडल्यावर चौक, तिथून करवादत्या लाकडी जिन्याने वर जाताच दुसर्‍या मजल्यावर मामाचं घर. पुसटसं आठवतंय आता. बाहेरची मुख्य खोली, माजघर आणि रस्त्याकडेला उतरत्या कौलांनी निमुळती झालेली एक माडी. दिवाळीत, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी नाशिकला जायचा. कधी आईवडीलांबरोबर तर कधी मामांसोबत. त्या घरातली माडी ही माझी आवडती जागा.