Skip to main content

विचार

'क्वीन' - फ्रेडी मर्क्युरीची जादूगारी

लेखक प्रास यांनी शनिवार, 29/01/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
झांझिबार मध्ये भारतीय पारशी आई-बापाच्या पोटी जन्मलेला एक मुलगा फारोख बलसारा शिक्षणासाठी भारतात येतो, मुंबई मध्ये, दादर (पूर्व) च्या पारशी कॉलनीमध्ये राहतो आणि शालेय शिक्षणानंतर पुढच्या शिक्षणासाठी लंडनला जातो. गीत-संगीतामध्ये लहानपणापासून रस असणारा फारोख लंडन मध्ये कलेचं रीतसर शिक्षण घेतो आणि संगीतामध्येच करीअर करतो. त्यात इतकं नाव मिळवतो की जगातल्या सर्वोत्तमांपैकी एक म्हणून गणला जातो.

डास ढेकुण झुरळ

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 29/01/2011 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो आपण ज्याना अगदी क्षुल्लक मानत असतो ते खरेतर खूप काही करत असतात. त्यांचे कर्तृत्व वादातीत असते. त्यांचे आपण त्यांचेकडे नीट पहात नाही. मूर्ती लहान पण कीर्ति महान असेच म्हणावं लागेल यांचे कर्तृत्व पाहून. 1 नाना पाटेकरसारख्या बुलन्द अभिनेत्याला सुद्धा याची दखल घ्यावी लागली. आणि एखादा क्षुद्र जीव प्रबळ माणसाला सुद्धा हिजडा बनवतो असे म्हणावे लागले.

स्पेस शटल चॅलेंजर

लेखक विकास यांनी शनिवार, 29/01/2011 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
स्फुटनिक पासून अमेरिका-रशिया यांच्या मधे चालू झालेल्या अंतराळ स्पर्धेत अमेरिकेने मजल मारली होती. स्पेस शटलचे तंत्रज्ञान विकसीत करून पुन्हा पुन्हा तेच वाहन आंतराळात उपग्रह सोडण्यासाठी तसेच मानवी वावरासाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी वापरणे आता नवीन राहीलेले नव्हते.

प्रशंसा ---> अहंकार

लेखक शुचि यांनी शनिवार, 29/01/2011 04:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज १ विचार वाचनात आला- तो हा की "प्रशंसा का पहेला भोग भगवान को लगाये." ज्याप्रमाणे अन्नग्रहण करण्यापूर्वी देवाला प्रसाद दाखवतो त्याप्रमाणे कोणीही आपली स्तुती केली तर तिचा मनोमन त्याग करून ती प्रथम ईश्वराला समर्पित करा. "त्वदीयम वस्तु गोविन्दम तुभ्यमेव समर्पयेत" स्तुतीपासून कटाक्षाने दूर रहा. यामुळे तुमच्या मनात अहंकाराचे बीज रोवले जाणार नाही. गर्वाने तुम्ही आंधळे होणार नाही. तुम्हाला अनाठायी(?) अभिमान वाटणार नाही इ.इ. मग माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले ते असे की "हेल्दी" अहंकार अशी काही गोष्ट असते की नसते?

ओळख

लेखक दादा बापट यांनी शुक्रवार, 28/01/2011 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , अखेर मिपा चे सदस्य झालो. १५ आठवडे लागले. तात्याने मिपा सुरु केले तेव्हा कोकणस्थ वर आवाहन केले होते त्याच वेळेस नोन्द्णी करायला हवी होती. असो. मी मिपा चे आणि सुधीर काळे यान्चे आभार मानतो. दादा बापट हे माझे खरे नाव. उगाच परा, शूची वगैरे टोपण नावे वापरून लेखण करायचा माझा प्रान्त नाही. लवकरच टी. बाळू चा सामना मधला लेख वाचून मला स्वरभास्करान्ची कीव का वाटली ते टाकायचा विचार आहे.

चूकचक्र..

लेखक गवि यांनी गुरुवार, 27/01/2011 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
3

प्रजासत्ताक दिन माझे मनोगत (माझ्या बालपणीचा भारताचा ते इंडियाचा प्रवास ))

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी गुरुवार, 27/01/2011 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजांच्या काळात सर्वाना शिक्षणाची समान संधी व अश्या अनेक गोष्टी भारतीय समाजात नव्या होत्या (ह्या त्यांनी अर्थातच स्वताचा राज्यकारभार सोयीने व्हावा म्हणून केल्या )पण .भारता स्वतंत्र झाला तेव्हा ३५ कोटी भारतीय जनतेपैकी किती लोक साक्षर होती ? साक्षर लोकांमधील किती लोक प्रगल्भ होती?

लोकशाहीच्या वाटेवर...

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 26/01/2011 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज आपला प्रजासत्ताक दिन आहे. त्यांनिमित्त सर्वांना शुभकामना. भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीची सुरुवात आज झाली. आपण खर्‍या अर्थाने स्वतंत्र झालो आणि सार्वभौम झालो. आज थोड्या थोड्या कारणाने वैतागलेल्या मित्रांना देशाला आणि येथील व्यवस्थेला शिव्या देताना बघतो आणि कित्येकदा मीसुद्धा त्यात सामील होतो. मात्र एक जाणीव कायम असते की सध्या भारतात अस्तित्वात असलेली राजकीय/ प्रशासकीय व्यवस्था अत्यंत संतुलित व नवीन बदलांना सामावून घेणारी आहे.