Skip to main content

विचार

मोक्ष

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 31/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आज मोक्ष मिळायला हवाच... उगीच ह्या मृगजळात अडकलोय... दरदिवशीची कटकट, साडेसातची लोकल, ऒफिसचा ऊशीर, मोठ्या साहेबांचं तणतणणं. घरी गेल्यावर मुलांच्या मागण्या, सौ ची कैफियत. आज हे महाग तर उद्या ते. छ्या किती सहन करायचं? किडामुंगीशी जवळीक साधायची ती अशी? एवढं राब राब राबून विरंगुळ्याचे क्षणच दुर्मिळ झालेत ... मोबाईलच्या रेडियोवर एकशेसातवर जाऊन जुनं मदन मोहन ऎकावं... आयुष्य सार्थकी लागावं असं काहीतरी... तो तर गेला त्याच्या स्वरलता सोडून... पण आम्ही काय सोडलं? आमचं नाव? की आडनाव? आमची सौ की ती पिल्लावळ? ...

फेसबुक आणि मास्लोची चढती भाजणी

लेखक शुचि यांनी मंगळवार, 30/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नीलीमा चहाचा कप खाली ठेवत पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारती झाली - "पण शुचि मला एक कळत नाही तुला जिम आहे, पुस्तकं आहेत,रुममेट आहेत मग फेसबुकची गरजच काय?" माझ्या प्रश्नार्थक चेहेर्‍याकडे पाहून ती उत्तरली "अगं म्हणजे "किलींग टाईम इज नॉट अ प्रॉब्लेम." यावर परत परत तक्रार काय करायची म्हणून मी अचूक भावनिक मुद्दा शोधू लागले - "हे बघ नीलू" मीदेखील चहाचा घुटका घेत म्हटले "प्रत्येक मित्र-मैत्रिणीचे माझ्या आयुष्यात काही एक स्थान आहे. काही जणांच्या कमेंट्स तर काही जणांनी टाकलेले व्हिडीओ तर काही जणांची विचारपूस मला ताजीतवानी करते, रोज नव्या दिवसाला सामोरी जायची उभारी देते.

() हजामांना मार्गदर्शन करता येईल का? ()

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 30/08/2011 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
हे वाड्मयचौर्य नाही, फारतर कल्पना आणि शब्द उधारीवर आणले आहेत. कुठून? करा थोडं खोदकाम. सर्वच छोट्या मोठ्या शहरखेड्यांत हजाम अस्तित्वात आहेत. वेळोवेळी नवीन हजाम आपापली दुकानेदेखील उघडतात. (त्यातल्या काहींचा हजामपणाचा धंदा बसला. काहींनी वयोपरत्वे राजीनामा दिला. काहींनी तर पुन्हापुन्हा राजीनामा दिलेला आहे. तर काही दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. काही हजामांच्या मते आपण त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिल्लक असलेल्या) सर्वच हजामांना बिनपाण्याने सफाई करण्याची इच्छा असते.

स्टेपनी

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 29/08/2011 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली गाडीचे अ‍ॅव्हरेज पार झोपले होते.त्यामुळे मेक्यानिकच्या हवाली केले होते. गाडी दुरुस्तीचे काम विचित्र असते गाडी दुरुस्त होत असताना आपण गप्प बसणे अवघड जाते आणि काहि करणे देखील शक्य नसते. गाडी दुरुस्त करणारा मिस्त्री अनोळखी असला तर हे अवघड जागचे दुखणे होते. आमचा नेहमीचा बारक्या मिस्त्री म्हणजे एक वल्लीच आहे तो कशाला काय म्हणेल हे सांगता येत नाही. त्याची ती सातारी बागवानी हिंदी हे एक भन्नात प्रकरण. थोडिशी हैद्रबादी आणि बरीचशी मराठी अशी काहिशी ती भाषा आहे. कळायला सोप्पी बोलायला गेलो तर कैच्या कैच अर्थ निघतात. पुर्वी बजाजची चेतक स्कुटर असताना त्याची माझी ओळख झाली.

विकासाची फळं

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 29/08/2011 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
एक अगदी मनाला भिडणारा लेख नुकताच वाचनात आला. त्या लेखाची 'लोकप्रभा' साप्ताहिकातली लिंक येथे देत आहे. अवश्य वाचा. http://www.loksatta.com/lokprabha/20110902/andolan.htm पुण्याजवळच्या अत्यंत सुपीक आणि सुंदर अशा मावळ खोर्‍याची विकासाच्या नावाखाली सुरु असलेली लूट, राजकारण्यांची अधू दृष्टी, तिथल्या साध्या माणसांची होणारी परवड आणि पैशाच्या मोहात उडून जाणारी अस्सल मावळ संस्कृती याचा खूप चांगला ऊहापोह लेखक श्रीरंग गायकवाड यांनी या लेखात केलेला आहे. विकासचा राक्षस या सुपीक मावळाला गिळंकृत करणार अशी भीती या लेखातून व्यक्त होतेय.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा

लेखक रणजित चितळे यांनी सोमवार, 29/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
जन लोकपाल हे विधेयक संसदेत आणण्यासाठी अण्णा हजारे ह्यांच्या आमरण उपोषणा बद्दल लोकांकडून व सरकार कडून बरेच प्रश्न विचारले जात आहेत. प्रामुख्याने त्यातले काही प्रश्न असे आहेत. अ) जन लोकपाल किंवा लोकपाल विधेयक आणल्याने भारतातला भ्रष्टाचार संपणार नाही. ब) अण्णा हजारे ह्यांचे आमरण उपोषण हे असंविधानिक आहे व पुढे हेच उदाहरण घेऊन बाकीची लोकं सरकारला वेठीस धरू लागतील. क) जन लोकपाल विधेयक लागू करण्यालायक नाही. त्यातल्या तरतुदी लोकशाहीच्या तत्त्वांविरुद्ध आहेत. ड) विधेयक संसदेत आणायला व ते पारित होण्यास वेळ लागतो.

मेणबत्त्यां​चा उजेड

लेखक चारुवाक यांनी रविवार, 28/08/2011 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
लता आणि आशाचे गाणे, गुलझारच्या कविता, कलमाडींचे निर्दोष असणे , मेधा पाटकरांचे एखाद्या विषयावरील वक्तव्य अश्या विषयांवर रूढ मतांपेक्षा वेगळे मत व्यक्त करताना मी नेहेमी दहा वेळा विचार करतो. आजकाल या यादीमध्ये अण्णा आणि त्यांच्या आंदोलनाची भर पडली आहे. आजकाल IAC आणि मेणबत्ती मोर्चे ही 'in' आहे ...म्हणजे सध्याचा ट्रेंड आहे. कार्यालयात मला एकाने विचारले की तुमच्या इथे candle march झालं का? मी हो म्हणालो. आजकाल रोज कुणी ना कुणी मार्च काढते आहे. मग तू गेला होतास का? माझ्या 'नाही' या उत्तरावर एक उपेक्षित कटाक्ष टाकून तो निघून गेला.