एडीएफ, व्हीओआर, आयएलएस...
विमान उडवताना दिशा कशी शोधायची आणि न्येमकं जिथे पोचायचं तिथे पोचायचं कसं? याचं उत्तर म्हणून एअर नॅव्हिगेशन हा विषय काढण्यात आलाय. मी माझ्या बायकोच्या दिग्दर्शनाशिवाय मंडईपासून घरी येऊ शकत नाही असं माझं दिशाज्ञान आहे. तेव्हा आकाशातल्या पोकळीत दिशा ओळखण्याविषयी काय अवस्था असेल ते सांगायलाच नको.
हा विषय मी शिकायला लागलो तेव्हा जाम भंजाळलो होतो. सगळं डोक्यावरुन जात होतं. डोळ्यासमोर अनेक तबकड्या आणि त्यांचे काटे गरागरा फिरायचे.
मिसळपाव