अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २
अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २
भ्रष्टाचाराचा मुद्दा आता व्यापक प्रमाणावर ऐरणीवर आला असला तरी माणसाची भ्रष्टाचारी वृत्ती आता इतक्यातच किंवा गेल्या काही वर्षातच जन्माला आलेली नाही. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार अस्तित्वातच नव्हता असेही समजण्याचे कारण नाही.
मिसळपाव
आपल्यापैकी अनेकजण नाणे घाटात मुक्काम टाकतात. दरीतून वरती येणारे ढग कवेत घेतात, शूद्ध हवा छातीत भरून घेतात आणि त्या गुहेतल्या पवित्र आणि गुढ अशा वातावरणात निस्तब्ध होतात. त्या गुहेच्या दारात उभे राहून मग आपण खालून रस्त्याने येणार्या व्यापारांचा काफिला नजरे समोर आणू लागतो. दमलेले, तहानलेले ते जीव हळू हळू वर येत असतात आणि वर आल्यावर विश्रांतीसाठी आपली पथारी सोडतात, जेवणाचे डबे उघडतात आणि थंड पाणी पिऊन तृप्त होतात. सुखदु:खाच्या दोन गोष्टी बोलून पुढच्या मार्गाक्रमणाबद्द्ल चर्चा करतात.
|| वैभव संपन्न गणेश ||
१९७८ साली मी विद्यार्थी दशेत असताना बेलूर आणि हळेबीड येथील मंदिरे पहावयास गेलो होतो.तेथे असलेल्या गणेशमूर्ती पाहिल्या आणि मी भारावून गेलो.त्या दागिन्याने खूप सजवलेल्या होत्या पण मला ते दागिने जास्त बोजड वाटले. माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपल्या पारंपारिक मूर्तीला असे दागिने घातले तर आणि जरा नवीन पद्धतीचे दागिने घातले तर ती मूर्ती कशी दिसेल!म्हणुन मी दागिन्यांचा अभ्यास करु लागलो.
मुंबईत आलो त्यावेळी पेन आणि पेन्सील दोन्ही बरोबर घेऊन आलो. सर्वच गोष्टी नवीन होत्या.घराबाहेर पडल्यावर असंख्य प्रकारचा जीवन संघर्ष बघायला मिळतो. मुंबई महानगर मायाबाजार आहे. त्यात सत्य काय आणि आभास कोणता हे कळणं जवळजवळ अशक्यच आहे.
पत्रकारिता करत असल्यामुळे मुंबईच्या कानाकोपर्यात फिरण्याची संधी मिळाली.प्रत्येक वेळेला वेगळा रंग ,वेगळा आशय जाणवला.