Skip to main content

विचार

सावरकर आणि क्रांती

लेखक अभिषेक९ यांनी शनिवार, 19/11/2011 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
pic
देशावर उत्कट प्रेम, इंग्रजांविषयी चीड आणि बलिदानाची तयारी ह्या तीन गोष्टींपलीकडे बघण्याची आवश्यकता होती. संह्याद्रीच्या कुशीतील चार-दोन किल्ले जिंकून स्वातंत्र्याची ज्योत फुंकणे ह्यात व्यवहार्यता होती पण ती मोगलांविरुद्ध! हाच मार्ग इंग्रजांच्या विरोधात केवळ अव्यवहार्यचं नाही तर भाबडेपणाचा होता.

हरवलेले खेळणे !

लेखक आशु जोग यांनी शुक्रवार, 18/11/2011 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
बालपण आठवायला सुरुवात केली म्हणजे त्याच्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी एक एक करून आठवायला लागतात. विशेषतः खेळणी. अनेक खेळणी होती, प्रत्येकाची काही वैशिष्ट्ये आणि इतिहास होता. त्याविषयी नंतर लिहूया पण एका खेळण्याची फार याद येते. 3 D Viewer - GAF View Master याच्याबरोबर फिल्मच्या चकत्या, डिस्क्स असत.

.(नेत्रपटलावरील चित्रांवेगळे)

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 16/11/2011 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द म्हणजे चिह्न - जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी वापरलं जाणारं. ते कधी पांढऱ्यावर काळ्या रेषा म्हणून येतं, तर हवेत उमटणाऱ्या ध्वनिलहरींतून जाणवतं. पण जग जाणण्यासाठी आपण केवळ शब्दच वापरत नाही. चित्रंही वापरतो. कोणीतरी म्हटलं आहे की एक चित्र हजारो शब्दांइतकं महत्त्वाचं असतं. आपण प्रत्येकच अशी चित्रं वापरतो. ती वारंवार आपल्या नेत्रपटलावर उमटत असतात. म्हणून मी यशवंत कुलकर्णी यांच्या लेखात 'शब्द' या शब्दाच्या जागी 'नेत्रपटलावरील चित्र' वापरून हा लेख लिहिलेला आहे. खरं तर त्यांचाच सल्ला वापरून मी त्यांचा लेख अधिक व्यापक केला आहे असं म्हणता येईल.

एक हे विश्व, शून्य हे विश्व

लेखक धनंजय यांनी बुधवार, 16/11/2011 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
विश्व आहे कांद्यासारखे. त्याचा अर्थ आणि गाभा शोधता-शोधता मोठेच आश्चर्य होते. शून्य कांद्याचा बाहेरचा पदर काढला, की काय होते? पदर होतो वेगळा - तो कांदा नाही. असला काय आणि नसला काय. राहातो तो गड्डा म्हणजे कांदा. कांदा ही कल्पना पदराशिवाय शिल्लक राहाते. "कांदा" हा शब्द त्या कल्पनेसाठी उपयोगी राहातो. एक एक पदर काढता-काढता शेवटी असे होते - शेवटचा पदर बाजूला केल्यावर काहीच शिल्लक राहात नाही. गाभा शोधायला गेले, तर कांदा असा नसतोच. म्हणजे "कांदा" कल्पनेसाठी आवश्यक काय? हाती येते शून्य. शून्य कल्पनेकरिता असलेला शब्दही शून्य. कांद्यासारखी कुठलीही गोष्ट घेतली, तरी असेच दिसते.

यु. जी. कृष्णमूर्ती : एक नाकारण्यायोग्य 'तत्त्वज्ञ'

लेखक प्रास यांनी बुधवार, 16/11/2011 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखनाची प्रेरणा यु. जी. कृष्णमूर्तींच्या (युजी) विचारांवर आधारीत उपरोल्लेखित लेखासंदर्भात एकूणच यशवंतराव कुलकर्णींच्या माझ्याबरोबर आणि इतरत्र प्रतिसादप्रपंचादरम्यान झालेल्या वक्तव्यांचा विचार करता त्यांनी लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात काही लेखन आवश्यक वाटलं.

मला आवडलेली काही वाक्ये.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 14/11/2011 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मर्कटलीलामृत या धाग्यावर श्री. जगमोहन प्यारे यांनी मी ते पुस्तक लिहायला सुरवात केली त्या तारखेची आठवण करून दिली.... दोन वर्षे झाली मी वेळ मिळेल तसे लिहितोय लिहितोय..... नंतर हार्ड डिस्क चाळता चाळता अजून एक जूने पान सापडले...तारीख १८-८-२००८.... त्या पानावर मी मला आवडलेल्या काही वाक्यांचा अनूवाद करून ठेवला होता.

शब्दावेगळे

लेखक यकु यांनी सोमवार, 14/11/2011 04:21 या दिवशी प्रकाशित केले.
यु. जी. कृष्‍णूर्तींचे साहित्य वाचताना त्यांच्या रूपांतरणोत्तर आयुष्‍यात घडलेल्या एका अगदीच सूक्ष्‍म पण अत्यंत महत्त्वाच्या फरकाचा उल्लेख येत रहातो. हा अगदीच छोटासा फरक 'युजी' हा माणूस आणि बाकीचे जग यांतला कळीचा मुद्दा आहे. कदाचित आध्‍यात्माच्या वाटेवर चालून ती वाट संपवलेल्या सर्वांच्यामधला व बाकी माणसांच्या मधला तो फरक असावा; इतरांचं मला जास्त माहित नाही, पण युजींनी मात्र सतत या फरकावर जोर दिला आहे. हा फरक म्हणजे शब्द आणि त्यातून निर्माण होणारी प्रतिमा! युजींच्या अंतर्पटलावर शब्दांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही.