विचार
शशक-फ्रिज
ती-रोज रोज काय तेच तेच? तुला कंटाळा कसा येत नाही?
मी-आलाय ना. मला तुझा कंटाळाच आलाय. तसेही आपल्याला एकत्र राहायला लागुन आता २ वर्षे होउन गेली आहेत. किती वेळा तेच तेच बघायचं? आणि तुझा ईंटरेस्ट आजकाल कमी झालाय फार. बाहेर काहीतरी चालु नाहीये ना?
ती- मूर्ख आहेस का? एकच चूक माणुस पुन्हा पुन्हा कशाला करेल? आधीच डोक्याला ताप झालाय. उत्तराखंड ट्रिपवर गेलो होतो तिथेही तुझी कटकट होतीच. आणि तुला परत सांगते, माझ्या अंगावर हात उगारलास ना तर सरळ पोलिसात तक्रार करीन आणि तुझे घोडे लावीन. मग बस खडी फोडत तुरुंगात.
मी- मला धमकी देतेस?
कॅलेंडर
आपण कुठेही एखादा फाॅर्म भरायला गेलो तर त्यात तारखेचा रकाना असतोच. आपली स्मृती आपल्याला दगा देते आणि आपल्याला नेमकी त्यादिवशीची तारीख आठवत नाही. मग आपण समोर पाहतो. तिथं भिंतीवर कॅलेंडर असतं. ते पाहून आपल्या ला तारीख आठवते,आपण ती लिहितो. कॅलेंडर अर्थात् दिनदर्शिका अशी एक उपयुक्त वस्तू आहे.
दिनदर्शिका ह्या विविध प्रकाशनसंस्थांच्या, विविध भाषांमध्ये उपलब्ध असतात.
चित्रपट परीचय-- फ्री गाय-
नमस्कार् मंडळी!!
सध्या मिपावर साय फाय ची चलती दिसते. तद्वत काल स्टार मुव्हीज वर एक मस्त चित्रपट बघितला आणि वाटले की मिपाकरांना त्याची ओळख करुन द्यावी. तर हा चित्रपट म्हणजे "फ्री गाय" चित्रपटाची गोष्ट साधारण्पणे अशी----
फ्री सिटी हा एक ऑनलाइन व्हिडिओ गेम आहे जो सुनामी गेम्स नावाच्या कंपनीने विकसित केला आहे. पण त्याचा सोर्स कोड वॉल्टर "कीज" मॅकी आणि मिली रस्क यांनी विकसित केलेल्या लाइफ सेल्फ नावाच्या अप्रकाशित गेममधून चोरला गेला आहे. सुनामीचा मुख्य डेव्हलपर अँटवान होवाचेलिकने फ्री सिटी तयार करण्यासाठी तो कोड वापरला आहे.
गंधीत आठवणी
साधारण एप्रिल-मे महीन्यात परीक्षा आटोपत्या आलेल्या आणि सुटीची आतुरता लागलेली असायची. उन्हाळ्याच्या उकाड्यासोबतच सगळीकसे हवा कशी मोकळी वहात असे. अधुन मधुन घामाळलेल्या अंगावरुन एखादी हवेची झुळूक गेली की काय तो आनंद व्हायचा. पडवीत असलेले कडुलिंबाचे झाड उन्हाची दाहकता बर्याच अंशी कमी करायचे. आम्ही गल्लीतील सगळी मुले ह्या झाडाखालीच खेळायचो. उन्हाळ्याच्या त्या दिवसांचा गावाकडचा विशिष्ट असा गंध आजही माझ्या लक्षात आहे. उन्हाळा आला कि आजही मला तो गंध सुटीची आतुरता देऊन जातो. सुटीमधे चाखायला मिळणारे आंबे, कैरी यांचेही विशिष्ट वास मनात घर करुन आहेत.
पुस्तक परिचय-शोध-लेखक मुरलीधर खैरनार
नमस्कार मंडळी
खूप दिवसांनी एक ऐतिहासिक , सत्य आणि कल्पिताच्या सीमेवर रेंगाळणारे , उत्कंठावर्धक पुस्तक हाती आले आणि २-४ दिवसात वाचूनही झाले त्याचाच मिपाकरांसाठी हा परिचय करून देतोय. पुस्तकाच्या संदर्भसूचीमध्ये आपले मिपाकर बिपीन कार्यकर्ते यांचा उल्लेख वाचून अभिमान वाटला तसेच माझे आवडते पुस्तक "नाशिक जिल्ह्याची दुर्गभ्रमंती" लिहून नाशिक बागलाण भागातील किल्ल्यांची आपल्याला ओळख करून देणारे अमित बोरोले यांचाही उल्लेख इथे आला आहे.
शशक--दरोडा
रात्रीचे २ वाजलेत. गपागप डोळे मिटतायत. कडक एक्स्प्रेसो प्यायला हवी. समोरच्या काळ्या स्क्रीनवर वायरशार्कचे लॉग्स धडाधड सरकत चालले आहेत. दुनियाभरचे पब्लिक आय पी स्कॅन करतोय. बरेच दिवस झाले कुठे काही क्रॅक मिळत नाहीये. लोक हुशार झालेत की माझी टूल्स बोथट झालेत?
अरेच्या!! एका सर्व्हरचे होम पेज उघडते आहे. पण एच टी टी पी, आर डी पी, एफ टी पी काहीच चालत नाहीये. आले लक्षात. व्ही पी एन क्लायंटवरून सोर्स आय पी बदलून बघतो. दोन तास खटपट केल्यावर क्रॅक सापडत गेला. आता फक्त थोडेच क्षण आणि कदाचित त्यानंतर....
दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये हेड लाईन--कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक होऊन ९४ कोटी लुटले.
शंभर अदाणी हवे आहेत…
...आमच्या शेतकऱ्यांना सरकारचा इथला एखादा निर्णय अमान्य असेल तर आमचे शेतकरी आणि आमचे सरकार काय करायचे ते बघून घेतील. शेतकऱ्यांना अगदी एखादे सरकार पसंत नसेल तर त्यांना ते सरकार खाली खेचायचा देखील नैतिक अधिकार आहे. पण इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये काड्या घालणारे, ते भडकाविणारे आपल्या देशा बाहेरचे खलनायक होते हे अलीकडे लक्षात आले :टुल किट गॅंग !
महामारी नंतर तर आर्थिक दृष्ट्या सावरलेला भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव बडा देश आहे. केवळ सावरलेलाच नाही तर आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थिती असणारा आणि प्रगती करत असणारा.
वेताळ टेकडी-ए आर ए आय टेकडीचा सत्यानाश
संध्याकाळी पाय मोकळे करावे म्हणुन म्हटले जरा लांबवर फिरायला जावे. कौतुकाने कोथरुडच्या वेताळ टेकडी/परमहंस्/ए आर ए आय टेकडीवर फिरायला गेलो. बरीच मंडळी वरच्या दिशेने चढत होती. चढावर तुरळक झाडी होती. पण म्हटले सध्या हिवाळा आहे, पावसाळ्यात पुन्हा हिरवेगार होईलच की. वर जाऊन भिंतीपलीकडे गेलो मात्र सगळी कडे धूर पसरलेला दिसत होता. कोथरुड कचरा डेपो एका बाजुला असल्याने पहीले वाटले त्याचा- धूर असावा. पण नाही, पुढे गेल्यावर लक्षात आले की काही हौशी थेरडे मुद्दाम थिकठिकाणी गवत एकत्र करुन जाळत होते. विचारले का? तर म्हणे आम्ही ईथे खूप झाडे लावली आहेत, ती जागा मोकळी व्हावी म्हणुन.
विहीर
"विश्वास ठेवा अगर ठेवू नका,पण हे सत्य आहे."
मी आता जी हकीकत सांगणार आहे,तिची सुरुवात वर दिलेल्या टिपिकल वाक्याने करावी असा मोह मला होतोय. पण तशी मी करत नाहीये. मी तर म्हणेन "विश्वास ठेवाच. कारण ही सत्य आहे. कारण मी हे डोळ्यांनी पाहिले आहे.
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यासारख्या शहरांचाही त्यावेळी आजच्याइतका विस्तार झाला नव्हता. त्याच पुण्याजवळचं एक खेडं. ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारं. लहानशी वस्ती. त्या एरियात जमीन स्वस्त मिळायची. आता ती जागा अगदी मध्यवर्ती समजली जात असेल.
माझ्या ओळखीचं एक जोडपं. दिलीप आणि प्रतिमा. प्रतिमा माझी मैत्रीण.
मिसळपाव