विचार
दिवाळी विशेष – भायखळ्याचं स्टेशन
यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख.तमिळनाडू - वारसा आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटन.
तमिळनाडू - वारसा आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटन.
प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा: २५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण
२५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण
पूर्ण भारतात दिसू शकेल
नमस्कार. प्रकाशाचा सोहळा असलेली दिवाळी लवकरच येते आहे. प्रकाशाच्या ह्या सोहळ्यासोबत ह्यावेळी प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहणही बघता येणार आहे. २५ ऑक्टोबरच्या सायंकाळी चंद्र सूर्याच्या काही भागाला झाकणार आहे आणि हे बघायची संधी आपण सर्वांना आहे. अगदी दिवाळीतच मला स्वत:ला एक रमणीय असं सूर्यग्रहण बघितल्याचं आठवतं. पण ते वर्ष १९९५ होतं आणि तेव्हा मी लहान होतो. त्यामुळे मुलांसाठी ही संधी किती वेगळी असते ह्याची कल्पना आहे.
घर पाहतो बांधून : १
गावी स्वतःचं, स्वतः घडवलेलं एक घर असावं अशी खूप इच्छा होती.
घरांबद्दल मी खूप वाचत आलो. अगदी अलिकडचं उदा. द्यायचं तर नंदा खर्यांच्या नागपूरच्या घराबद्दल त्यांच्या 'ऐवजी' या आत्मचरित्रात्मक पुस्तकात वाचलं. त्याआधी माधव आचवलांपासून ते गणेश मतकरी अशा अनेक लोकांचे घराबद्दलचे लेखन मी वाचलं आहे. काहींची अगदी किशोरवयीन उत्साहाने कात्रणंही जपून ठेवली आहेत.
कोल्हापुरात असताना माझ्या वास्तव्याशेजारी एक सुंदर बंगला होता. मी त्या बंगल्याच्या बागेकडे, कुंपणावर सोडलेल्या वेलींकडे जातायेता आवर्जून खूप वेळ पाहत असे. मालकांचे नाव गर्दे अंकल. गर्दे अंकल नामांकित आर्किटेक्ट.
खरचं गरज आहे का?
ढवळ्या शेजारी पवळा बांधला
वाण नाही पण गुण लागला
पेरणा
एकदा सुट्टीवर गेलो होतो. टाईमपास म्हणून डॉक्टर मित्राच्या दवाखान्यात बसलो होतो. बऱ्यापैकी गर्दी होती. रोगी येत होते, मित्र त्यांना तपासून औषधे गोळ्या, इंजेक्शन इ. देत होता. मला पण बर्यापैकी वैद्यकीय क्षेत्रात अनुभव म्हणून त्याच विषयावर अधून मधून गप्पा चालू होत्या.
मित्र रोगी तपासत असताना मी रोडवर येणारे जाणारे बघत आपले मनोरंजन करत होतो. कुणी ओळखीचा आसेल तर हाय,हॅलो. कधी आला,कधी जाणार टाईप विचारपूस.
आजच्या काळात विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्व
वाढत्या घटस्फोटाच्या कारणांमध्ये जोडीदार निवडताना केलेली चूक, स्त्री-पुरुषांमध्ये असलेल्या काही लैंगिक समस्या, कामजीवनविषयक अभ्यासाचा अभाव यांचा समावेश होतो. या सगळ्यावर विवाहपूर्व समुपदेशन हा उपाय ठरतो. जोडीदार निवडताना काय काळजी घ्यावी हे यातून समजते. तसेच सेक्स मधील विविधता, वेगवेगळ्या सेक्स पोजिशन्स यांचीही माहिती मिळते.
विवाहाची तयारी करताना जशी कपडे, दागिने, हॉल याची काळजी घेतली जाते तशी काळजी सेक्स लाईफ चांगले होण्यासाठी घेतली जात नाही हे खेदजनक आहे.
अलेक्सा झाssssली ...!!
अलेक्सा... "झाssssलीssss ...!!!!!"
माझा नातू खच्चून ओरडत होता. मी जमेल तितका झटपट उठून बसलो. एकदम उभा राहिलो तर मला ब्लॅक आउट व्हायला होतं. बराच वेळ मी आडवाच असतो ना, म्हणून.
एक मिनिट बसून मी उभा राहिलो. संतुलित होऊन बाथरुमकडे पावलं टाकत निघालो. मीही जाता जाता अलेक्सा अलेक्सा ओरडत राहिलो. काय झालं होतं मला कळेना.
सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं.
कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले...
X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.
बिग बुल
वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, मार्जिन कॉल ते स्कॅम १९९२. जवळपास प्रत्येक सिनेमा आणि टीव्ही सिरिजने शेअर बाजाराला सट्टा बाजार स्वरूपात दाखवलं आहे. हा सट्टा खेळून नुकसान करून ठेवल्याचे एक तरी उदाहरण प्रत्येक घरात असते. या सर्व प्रकारात, बहुतांश ठिकाणी राकेश झुनझुनवाला नाव माहीती असलं तरी कामाबद्दल फार कमी माहीती असते. नाव माहीती असल्याचं कारण म्हणजे बनलेला पैसा. कामाबद्दलची माहीती तशी कमी प्रकाशझोतात असते. बाजारातले काम आणि त्याचे महत्व मेन स्ट्रीम मध्ये फार कमी वेळा दिसते.
मिसळपाव