Skip to main content

विचार

विचार — वैचारिक मराठी लेखनाचा विभाग. तत्त्वचिंतन, समाजचिंतन आणि जीवनमूल्यांवरील मराठी विचार येथे वाचा व चर्चेत सहभागी व्हा.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ६

लेखक शीतलउवाच यांनी शनिवार, 26/08/2023 21:35 या दिवशी प्रकाशित केले.

गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो.
तो – आज काय सुट्टी आहे का?
ते – नाही.
तो – मग कामावर का जात नाही ?
ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ?
तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे….
ते – बरं पुढे ?
तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल….
ते –बरं मग?
तो – मग काय, निवान्त बसता येईल ..

अंतरंग – भगवद्गीता – भाग ५

लेखक शीतलउवाच यांनी शनिवार, 26/08/2023 21:26 या दिवशी प्रकाशित केले.

मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय.

फोरिए सीरीज - अजुन एक चिंतन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 25/08/2023 02:22 या दिवशी प्रकाशित केले.

प्रस्तावना :
सर्वप्रथम म्हणजे मी काही उच्च शिक्षित गणितज्ञ वगैरे नाहीये, थोडंफार स्टॅटिस्टिक्स शिकलो आहे, अ‍ॅप्लाईड मॅथेमॅटिक्स नाही, प्युअर तर नाहीच नाही. ह्या आधी केलेले अन अन ह्यानंतर होणारे सर्व लेखन हे वरवरील आकलनावर आधारित असुन हेच अंतिम सत्य आहे असा काही माझा दावा नाही. कोणी वेल ट्रेन्ड गणितज्ञ यदाकदाचित हे वाचेल अन ह्या अर्धवट ज्ञानाची खिल्ली उडवेल तर त्याला काही ही हरकत नाही.

अमेरिका ८- मेल्टींग पाॅट

लेखक निमी यांनी शनिवार, 19/08/2023 06:55 या दिवशी प्रकाशित केले.

आम्ही मुलीकडे ज्या भागात राहतोय तिथं खरोखरच केवळ अठरापगड जातीच्या नाही तर अनेक विविध देशांमधून लोक रहायला येतात. इथल्या काही राज्यात तर मूळ अमेरिकन फारच कमी आणि बाहेर देशातून वेगवेगळ्या कारणांसाठी येणारे आणि आता इथेच स्थायिक होऊन इथलेच झालेले रहिवासी नागरिक जास्त आहेत. मेक्सिको - एशिया मधून हे प्रमाण अधिक आहे. त्यातही कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडा, न्यूयॉर्क, न्यू जर्सी ह्या राज्यांमध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आहे. इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते की भारतातून येणाऱ्यांचे प्रमाण 6% आहे, तर मेक्सिकन लोकांचे 24% आहे.

अमेरिका ७ -आराम का व्यायाम

लेखक निमी यांनी गुरुवार, 17/08/2023 21:04 या दिवशी प्रकाशित केले.

भारतात फार कमी लोक स्वतःच्या तब्येतीची-आरोग्याची काळजी घेतात आणि नगण्य लोक मनापासून व्यायाम करतात. अस्मादिकही त्यास अपवाद नाहीत. 'केला पाहिजे' म्हणून, डॉक्टरनी विचारलं तर होकार भरता यावा म्हणून किंवा स्वतःला फसवणं थोडं सोपं जावं म्हणून जितका व्यायाम करणं आवश्यक असेल तेवढाच मी करते. याबाबत थोडा अवमान गिळून कबूल करते की 'कळतंय पण वळत नाही' च्या धर्तीवर 'पटतंय पण उठवत नाही.' अशी पहाटे साखरझोपेत अवस्था असते.

जीवनातील "Q/क्यू"

लेखक भालचंद्र लिमये यांनी गुरुवार, 17/08/2023 10:30 या दिवशी प्रकाशित केले.

जन्माला येण्यापासून मरेपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरचा 'क्यू' काही संपत नाही. एकांच्या अंत्यविधीसाठी गेलो होतो. ओळीत ठेवलेले अनेकांचे मृतदेह पाहून 'क्यू' ची कल्पना सुचली.

जन्म होण्यासाठी कारणीभूत असलेली गुणसूत्रे मोठ्या प्रमाणात एकमेकांशी स्पर्धा करत मिलनासाठी येतात. योग्य मिलन झाल्यावरच जन्म होतो. इथपासून आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर 'क्यू' काही सुटलेला नाही. तुमचा जन्म झाल्यावर तुमच्या आधी/नंतर बाळे जन्म घेतात, दवाखान्यात अंघोळ घालण्यासाठी सुद्धा दाई किंवा नर्स एका नंतर एक असे करून बाळांच्या अंघोळीसाठी नेतात.

नैवेद्य

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 14/08/2023 08:39 या दिवशी प्रकाशित केले.

n

सिंहगडावर जाताना या ठिकाणी एखाद्या कुठल्यातरी ट्रेकरने शिवरायांच्या मूर्तीसमोर ग्लुकोजच्या गोळ्या नैवेद्य दाखवावा तशा ठेवल्या होत्या.

कल्पना तशी गमतीशीर आहे, पण छान आहे.

त्यावरून मला काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला.

अमेरिका ५ - व्हिजिट Nvidia

लेखक निमी यांनी शनिवार, 12/08/2023 21:05 या दिवशी प्रकाशित केले.

21 जून 2023 हा आंतरराष्ट्रीय योग दिवस ! आमचा योग आला याच दिवशी आमच्या मुलीच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा येण्याचा! तीचं कॅली मधील, बे तील Nvidia कंपनीचे हे एचक्यू! हे झालं शॉर्ट फॉर्म उत्तर.. समजेल असे उत्तर म्हणजे कॅलिफोर्नियातील बे एरिया भागातील Nvidia कंपनीचं एचक्यू म्हणजे हेडक्वार्टर. आवश्यक सिक्युरिटी चेक करून आम्ही आत आलो. अबब ! भली मोठी 4 मजली छतापर्यंत ओपन दिसणारी बिल्डिंग. पूर्ण छतावर सोलर पॅनल आणि उजेडासाठी ठिकठिकाणी ग्लास पॅनल्स् ! प्रत्येक मजल्यावर चहा-कॉफी-गरम पाणी देणारी पॅन्ट्री एरिया. तळमजल्यावर कॅफे वेगळा. त्यात वेगवेगळ्या देशाचे खाद्यपदार्थ मेन्यू रोज बदलणारे असतात.