Skip to main content

विचार

महाराज की जय..

लेखक आजी यांनी सोमवार, 04/07/2022 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या नोकरीच्या निमित्ताने मी एका गावी राहात होते. माझ्या कडे एक १५/१६ वर्षांची मुलगी कामाला होती. वरकाम करायची. मी तिला शाळेतही घातलेली होती. तिच्या शिक्षणाचा खर्च मीच करायची. तिची आई माझ्याकडे काही जास्तीचं काम निघालं तर ते करायला यायची. तिचा नवरा दारुड्या होता. काबाडकष्ट करून मुलीचं,नवऱ्याचं आणि स्वतःचं पोट भरत होती. नेहमीचं चित्र. एके दिवशी मी तिला विचारले,"उद्या माळा झाडायचाय. येशील का?" तर ती म्हणाली,"मला हजार रुपये उसने द्या. मला भगताकडं जायचंय."मी म्हटलं "का ग?भगताकडं का? तुला काही होतंय का?" तिनं उत्तर दिले,"मला बाया आल्याती. उतरवायच्या आहेत." मला काही कळलं नाही.

मीर जाफरची आठवण

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 24/06/2022 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजची तारीख 23 जून. सकाळी ब्रेकिंग समाचार पाहताना मीर जाफरची आठवण आली. 1757 साली आजच्या दिवशी प्लासीचे युद्ध झाले होते. राबर्ट क्लाईव जवळ अत्यंत कमी सैन्य होते. नवाब सिराजुदौलाच्या सेनापति मीर जाफर जवळ अठरा हजारचे. राबर्ट क्लाईवला विजयाचा पूर्ण विश्वास होता. त्याने नवाबच्या सेनापति मीर जाफरला बंगालचा नवाब बनविण्याचे आश्वासन दिले होते. आता मीर जाफरचे सल्लागार योग्य असते तर त्यांनी सल्ला दिला असता, युद्ध जिंकल्यावर नवाबकडून मोठी जागीर तू सहज पदरात पाडू शकतो. पुढे मागे आपल्या कर्तृत्वाने नवाब ही बनू शकतो. पण दुर्भाग्य एक ही योग्य सल्लागार त्याच्या जवळ नव्हता. क्लाईव युद्ध जिंकला.

करोंना : माझी गल्ली , गाव, आयएमए , पतंजलि इत्यादि

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 16/06/2022 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीतील अधिकान्श जनता अनिधिकृत भागात राहते. अर्थात त्याचे श्रेय ही पंडित नेहरूंच्या डीडीए अक्ट 1957ला आहे. त्या कायद्यात घरे बांधण्याचा अधिकार फक्त डीडीए मिळाला. डीडीए मागणीनुसार घरे बांधू शकली नाही. नेता आणि प्रॉपर्टी डिलर्सने हात मिळविणी करून अनिधिकृत कालोनीज बांधल्या. लोकांना घरात शिरण्यासाठी रस्ता म्हणून 10, 20 आणि 40 फुटांच्या गल्ल्या आणि रस्ते मजबूरीने निर्मित करावे लागले. त्यामुळे सार्वजनिक सुविधा- शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, पार्क इत्यादि या भागांत फारच कमी. घरे ही जमिनीवर १५X६० ft. आणि वरचे माले दोन-दोन फूट पुढे मागे जास्त. ७० टक्के दिल्लीकर अश्याच भागांत राहतात.

का ? का? का?

लेखक आजी यांनी गुरुवार, 09/06/2022 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यमवर्गीय कुटुंबात मिळणाऱ्या थोड्या फार रिकाम्या वेळात स्त्रीवर्ग काहीशा नाईलाजाने किंवा काहीवेळा आवडीने टीव्ही वरच्या कौटुंबिक मराठी मालिका बघतो. त्यांनाही त्यातील काही गोष्टी खटकतात. पण त्या जाने दो म्हणून सोडून देतात. मीही वृद्धावस्थेत रिकामटेकडी झाल्याने ह्या मालिका बघते. मलाही काही गोष्टी खटकतात त्या अशा- १) प्रत्येक मालिकेत एक रडकी नायिका असतेच. ती सारखी रडतच असते. तिला कुणीतरी छळत असतं.

श्रीदासबोध : दुश्चितपणा आणि राजाची सुरक्षा.

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 02/06/2022 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थांनी छत्रपति संभाजीराजेंना उद्देश्यून एक पत्र लिहले होते त्या पत्राची सुरवात "अखंड सावधान राहावे, दुश्चित कदापि नसावे" या ओळीने केली होती. इथे दुश्चितपणाचा एक अर्थ असावधान, बेफिकीर असा होतो. राजा सुरक्षित असेल तर राज्य सुरक्षित राहते. एका सुरक्षित राज्यातच प्रजा संपन्न आणि सुखी राहू शकते. प्रजेच्या हितासाठी राजाची सुरक्षाही सर्वोपरी असते. राजाच्या सुरक्षेची जवाबदारी राजाचे सुरक्षा सल्लागार, सचिव आणि अंगरक्षक यांच्यावर असते. त्यांना नेहमीच अखंड सावधान राहण्याची गरज असते.

ताजमहाल, लालकिल्ला यासंदर्भातील मुगल शैलीच्या पेंटिंगवर भाष्य

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 01/06/2022 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, ज्ञानवापी, ताजमहाल, मथुरा श्री कृष्ण मंदिर, कुतुबमिनार वगैरे सध्या चर्चेत आहेत. संगीत ताजमहाल, व डॉ विद्याधर ओक यांनी नव्याने सादर केलेल्या पुराव्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने काही वर्षांपूर्वी कोरा. कॉम वर संपर्क एका चर्चेत जस्टिन नामक व्यक्तीने ताजमहाल शिवमंदिर नाही. पुना ओक किंवा वासुदेवराव गोडबोले यांचे मुद्दे सविस्तरपणे खोडून काढले होते. त्यावर एक ई-बुक सादर केले आहे. जस्टिन यांच्या मुद्यांतून निर्माण झालेल्या वैचारिकतेवर गोडबोले यांनी काही वर्षांपूर्वी उत्तर द्यायला टाळले. मला उत्तर द्यायला सांगता तर मग तुम्हीच का उत्तर देत नाही असे म्हटले होते.

चिंता नक्को, हम हइ इद्दर!!"

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 31/05/2022 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
"चिंता नक्को. हम हइ इद्दर!" अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:। पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः।। - कालिदास (कुमारसम्भव १/१) आजवर बघितलेला हिमालय हा कुठेतरी काव्यात वाचलेला, सिनेमांमधून पाहिलेला, अद्भुतरम्य तरीही सुंदर. निळ्या नभाला शोभायमान करणार्‍या पांढर्‍याशुभ्र सानुंचा.

व्यायाम: आय डोन्ट केअर

लेखक आजी यांनी मंगळवार, 31/05/2022 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
व्यायाम आणि डाएट (विविध प्रकारची) याबद्दल इतक्यांकडून,इतक्यांदा, इतकं लिहिलं गेलंय की आता ही वृद्धा आणखी नवीन काय लिहिणार असं तुम्हांला वाटेल. पण जसा/जशी प्रत्येकजण प्रेमात पडतो/पडते. काहीजणं तर अनेकदा प्रेमात पडतात, आणि त्या प्रत्येकाला आपलं प्रेम वेगळं, नव्या नवलाईचे, नवंकोरं आणि दुसऱ्याला"सांगण्यासारखं"वाटतं तसंच हे आहे. मलाही माझ्या व्यायामाबद्दल नव्यानं सांगावंसं वाटतं. खरं सांगायचं तर मी जन्मभर व्यायाम करत आलेली आहे. पण माझ्या वजनाचा आणि व्यायामाचा फारसा काही संबंध नाही हे माझ्या पक्कं लक्षात आलेलं आहे.

माझी सैराटी समीक्षा

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 30/05/2022 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र मला म्हणाला, पटाईत, बर्‍याच महिन्यांपासून तू काही लिहले नाही. मी म्हणालो आजकाल मूड होत नाही. तो म्हणाला, अस कर, काहीतरी नवीन लिह. एखाद्या सिनेमाची समीक्षा तुझ्या शैलीत कर. मी त्याला म्हणालो, मी सिनेमे फारच कमी बघतो. उभ्या आयुष्यात थिएटरमध्ये जाऊन जास्तीसजास्त डझन भर बघितले असतील. तो म्हणाला, अरे सिनेमांची समीक्षा करायला, जास्त डोक्स लागत नाही. आपल्या सुपर डूपर मराठी सिनेमा सैराटची कर. आता मित्राचा आदेश टाळणे शक्य नव्हते. आपल्या बॉलीवूड सिनेमांची एक विशेषता असते. विषय कुठलाही का असेना, कथेचा मूळगाभा एकच असतो.

अंतरंग - भगवद्गीता - भाग ४

लेखक शीतलउवाच यांनी गुरुवार, 19/05/2022 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् । किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ऋग्वेद १०-१२९॥ नासदीयसूक्त………असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे!) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण?