दोन शशक--मधुसापळा
अहो लक्ष कुठेय तुमचे? मी म्हणतेय मुलाकडे सिऍटलला जाऊया. पण तुमचे आपले काम आणि काम .सारखे मोबाईलमध्ये डोके खुपसलेले. जणू सगळ्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावरच.
नाही जमणार ग.या महिन्यात दिल्लीला क्वाडची मीटिंग आहे. त्यानंतर युरोपला जायचे आहे. सध्या तर बोलूच नकोस सिऍटलचे.
आता हे युरोपचे कुठून काढलेत? तुम्ही तर याआधी कामासाठी कधीच गेला नाहीत युरोपात? आणि आजकाल तुम्ही फारसे बोलतही नाही घरामध्ये. एनी प्रॉब्लेम?
आता कसे सांगू हिला? सिमरन मागच्यावेळी बँकॉक मध्ये भेटलेली तेव्हा काय मजा केलेली आम्ही. फोनमधले फोटो पहिले की त्या आठवणी पुन्हा उफाळून येतात. आताही ब्रसेल्सला बोलावतेय.
मिसळपाव