Skip to main content

विचार

संधिप्रकाश आणि सांजवेळ

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 27/10/2012 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसातल्या २४ तासात आपण काय काय करत असतो......पोटापाण्याच्या सोयीसाठी नोकरी....विद्यार्थीदशेत शिक्षण.....माणूस तोच असला तरी प्रत्येक क्षणाला त्याचे रूप बदलत असते.

शिवसेनाप्रमुखांचे दसर्याच्या मेळाव्यातील भाषण

लेखक yeda यांनी शनिवार, 27/10/2012 04:43 या दिवशी प्रकाशित केले.
शिवसेनाप्रमुखांचे दसर्याच्या मेळाव्यात CD वर झालेलं भाषण ऐकलं . http://www.dailymotion.com/video/xularp_bal-thackeray-speech-at-shivsen… मनात कित्त्येक विचार आले.

वेळ नाही.........

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 26/10/2012 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेजण नेहमी म्हणत असतो की खूप काही करायचं आहे पण वेळ नाही....कधीतरी विस्कटलेला कप्पा आवरायचाय पण वेळ नाही.....खूप दिवस कुणा मित्राला अथवा नातेवाईकाला फोन करायचाय पण वेळ नाही.........जर आपल्याकडे कशालाच वेळ नाही तर मग आपल्या आयुष्यातला वेळ नक्की जातो तरी कुठे? कधीतरी मी या गोष्टीचा विचार करतो....अगदी मनापासून वाटतंय की मला अजूनही याचे उत्तर सापडलेले नाही....... वेळ नसणे म्हणजे नक्की काय? खरच आपल्याकडे सवड नसते की आपणच एखादी गोष्ट न करण्यासाठी शोधलेली ती एक लंगडी सबब आहे? समजा आपण खरच आपल्याला वेळ नाही असे मानू पण मग आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे वेळ असतोच ना?

अवतार

लेखक शैलेंद्रसिंह यांनी बुधवार, 24/10/2012 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
महानता त्याच्या रोमारोमात भिनलेली आहे... अशक्य असं काही नाहीच....खरंतर जगाचे सगळे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर व्हावे.... पण त्याचे त्याला काहीही अप्रुप नाही.......डेक्कन क्वीन फ़ुल स्पीडने डोंबिविली स्टेशनवर येत असते....त्याच दिशेच्या टोकाला हा उभा असतो....गाडी आली तेव्हाच हा रेस सुरु करतो....आणि पळत सुटतो....गाडी स्टेशन पार करण्याच्या आधी ह्याने दुसऱ्या टोकाचा ब्रिज चढुन....दुसऱ्या प्लॅटफ़ॉर्मवर जाऊन तिथुन धावत डेक्कन क्वीनच्या आधी प्लॅटफ़ॉर्म पार करुन....खाली रुळावर उतरतो आणि डेक्कन क्वीन जाण्याच्या आधी तिला क्रॉस करतो.... सांगा आता हा मनुष्य जगातला सर्वात वेगवान माणुस नाही का?

बाँबे टॉकीज

लेखक मस्त कलंदर यांनी रविवार, 21/10/2012 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसमधल्या बर्‍याच धामधुमीनंतर दोनेक दिवसांपासून थोडा रिकामा वेळ मिळाला. रिकामपणाचे उद्योगही खोळंबले आहेत, पण लॅपटॉपला अत्यंत प्रेमाने वागवल्यामुळे त्याने मुकेपण धारण केलं होतं. ( तरीही कानसेन कसंबसं निभावून नेलं खरं) त्यामुळे नवीन लॅपटॉप घेतल्यानंतर बर्‍याच दिवसांचे पाहायचे पाहायचे म्हणून कित्येक दिवसांपासून ठेवलेले सिनेमे आधी पाहायचे ठरवलेयत. सकाळीच काही नवीन शोधावं म्हणून पाहात होते. खरंतर काल रात्री नाना पाटेकरचा कुठल्याशा मराठी मंडळातली जुनीपुरानी मुलाखत पाहून हा माणूस इतका शहाणा आहे, तर त्या फालतू हिंदी सिनेमांतून अतिफालतू भूमिका का करतो हा प्रश्न पडला होता.

'अल्लाह्'- 'अल्लाह्' मधील फरक

लेखक प्रदीप यांनी गुरुवार, 18/10/2012 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच तरूण मित्रमैत्रिणींच्या तोंडून नसरत फते अली खाँ ह्यांच्या 'अल्लाह् हू' विषयी ऐकले होते. सगळेच ऐकलेले केवळ कौतुकच होते, तेव्हा आज वेळ काढून मुद्द्दाम ते यूट्यूबवर पाहिले/ऐकले. हे संपूर्ण सुमारे पंचवीस मिनीटांचे सादरीकरण आहे. अगदी खरेच सांगतो-- कसेबसे शेवटपर्यंत पाहिले/ ऐकले. कारण जी स्तुति मी ऐकले होती, त्याचे कारण मला कुठेच सापडले नाही, तेव्हा 'आता काही सुंदरसे, आतून हलवणारे येईल, नंतर येईल' असे करत राहिलो. शेवट झाला आणि अत्यंत निराशाच पदरी पडली. एखाद्या गायकाने/ गायिकेचे गाणे, माझ्या मते, नुसते ऐकावे.

पुस्तक संस्कृती/पुस्तक प्रदर्शन

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 12/10/2012 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
वाचन संस्कृती लोपण्याच्या काळात,काहि व्यक्ति यासाठी हिरिरिने काम करतात.ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद असते. शिवाय ज्या भागात पुस्तकांची म्हणुन विशेष दुकाने नाहित तिथे तर अश्या कामांना अतिशय महत्व असते. हेच काम आज राज जैन यांनी सिंहगड रोडवर पुष्पक मंगल कार्यालय येथे १० दिवसांचे पुस्तक प्रदर्शन भरवुन केले आहे. वेगवेगळे बहुविध विषय,आणी दर्जेदार प्रकाशनं या दोहोंचा मिलाफ राज जैन यांनी उत्तम घडवुन आणला आहे.

आम्हांला काय हवंय?

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 11/10/2012 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे सगळे शाळकरी मित्र इंजिनिअरिंग करताहेत. माझी सहामाही परिक्षा नुकतीच संपल्याने मला सध्या भरपूर वेळ असतो आणि म्हणून मी त्यांना "भेटायला येता का?' असं विचारायला फोन किंवा मेसेज करत असतो. एरवी त्यांचे क्लासेस, कॉलेज किंवा परिक्षा असल्या की ते "नाही' म्हणतात. पण मी परवापासून विचारतोय तर एकजात सगळ्यांचं एकच उत्तर - असाइनमेंट्‌स आहेत रे! खूप आहेत. सॉरी, नाही जमणार. पुढच्या आठवड्यात एक्साम्स आहेत, त्यांचा अभ्यास करायला सुद्धा वेळ मिळत नाहीये. मी विचारलं, की या असाइनमेंट्‌सचा मार्क मिळण्यापलीकडे काही उपयोग आहे का, तर सगळेच जण नाही म्हणाले.

एकापेक्षा एक.

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 09/10/2012 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ: मुंबै (आणी आश्चर्यकारकरित्या मराठी दुकानदार) "एक ** साइझ ची अंडरवेयर द्या ह"" "कोणाला हवी आहे" - दुकानदार "मलाच" - मी आश्चर्याने (ऐश्वर्या रायला हवी असेल तर मी कशाला येइन मरायला. हे मनात) "** ची घ्या. ** होणार नाही तुम्हाला" - इति दुकानदार (दुकानातल्या इतर ३-४ गिर्‍हाइकांसमोर) " ("भोसडिच्या" हे मनात) अंडरवेयर मी घालतो तर साइझ मला माहिती असणार ना?" " लोक मुद्दाम कमी सांगतात. आणी मग बदलुन मागतात" "तुम्ही वापरलेली अंडरवेयर बदलुन देता?" " आमी नाहिच देत हो. पण कष्टमर येतात त्याला काय करायचे?" "("ढेकण्या" हे परत मनात) मग तुमी द्या ना.