Skip to main content

विचार

आयचा घो.....

लेखक अनुरोध यांनी शनिवार, 08/09/2012 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
" काय.......?? एच. आय. व्हि. टेस्ट...... डोकं बिकं फिरलय का.....??? चायला नको करुस लग्न काही अडलं नाहीये पण हे असलं काहिहि काय बोलायचं? अत्तार्यंत मुलाला सॅलरी स्लीप मागितल्याच ऐकलं होतं पण हे म्ह्णजे अतिच होतय. वाटलं मुलगी बघायला आलोय, बोलणं ब-यापैकी झालयं वाटतेय पण ओके पण अता हे काय नविनच. " " दोन मिनिट मि काहि बोललोच नाहि. विचार हेच डोक्यात... काहीही काय....? ती पण माझ्याकडेच बघत होती. काय बोलतो हा, चेह-यावरुन काही रिअ‍ॅक्शन कळते का.... मग या बाबतित मि पण हुशार आहे. मठ्ठासारखा चेहरा करुन बसलो, काहिहि भाव नाहित चेह-यावर, ती आपली बघतेय अरे काहि तर बोल... पण मग २ मि.

अति सर्वत्र वर्ज्ययेत....

लेखक Pearl यांनी मंगळवार, 04/09/2012 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
( अति सर्वत्र वर्ज्ययेत.... याबद्दल जे काही विस्कळीत विचार मनात आले. ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चू.भू. द्या. घ्या.) आपल्या संस्कृत भाषेत फार छान छान कोट्स आणि सुंदर अर्थपूर्ण अशी सुभाषिते आहेत. त्यातलं 'अति सर्वत्र वर्ज्ययेत' हे वाक्य पण फार छान आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट अति करू नये. अति राग, अति लोभ, अति काटकसर, अति द्वेष, अति चिंता ..... अशी कोणतीच गोष्ट अति करू नये. एवढचं काय तर अति प्रेम(आंधळं प्रेम), अति काळजीही करू नये. अति चिंता: चिंतेबद्दल तर काय सांगावं. असं म्हणतातच ना की चिता मनुष्याला मेल्यानंतर जाळते, तर चिंता जिवंतपणी जाळते.

एक डोक्यातला किडा

लेखक अस्वस्थामा यांनी सोमवार, 03/09/2012 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा काही काही कर्तृत्ववान लोकांच्या गोष्टी ऐकतो तेव्हा कधी कधी थोडी बोलीवुडी गोष्ट होते असं वाटत रहातं. हुमायून भारत सोडून पळून गेला तरी पण भली मोठी फौज घेउन परत येतो आणि दिल्ली काबीज करतो.. आणि शिवाजी राजे सगळे आयुष्य अस्तित्त्वाची लढाई करत बसतात. परागंदा राजे, नेते परत येवून मिरवतात, परत नेते बनतात आणि लोकं पण त्यांना दारात उभे करतात (उदा. नवाज शरीफ यांचा पाकिस्तानात परत प्रवेश ) नव्हे त्यांना पूर्वीचे स्थान पण देऊ करतात..

माझे पहिले चित्रपट परिक्षण-- खामोश पानी

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 03/09/2012 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझ्यासारख्या अत्यंत रूक्ष आणि अरसिक माणसाचा चित्रपट परिक्षणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.तेव्हा परिक्षण विस्कळीत वाटल्यास ते समजून घ्यावे ही विनंती. त्याचे झाले असे की गेल्याच आठवड्यात एन.डी.टी.व्ही वर २०१२ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास नक्की कसे निकाल लागतील याविषयीचा ओपिनिअन पोल दाखवला होता.हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी तो कार्यक्रम अर्थातच चुकविला नाही.त्या कार्यक्रमात निवडणुकविषयक प्रश्नांबरोबरच सर्वेक्षणात विचारलेल्या इतर प्रश्नांनाही लोकांनी नक्की कसे प्रतिसाद दिले हे पण दाखविले होते.त्यातच एक प्रश्न होता--

हायटेक चितळे बंधू

लेखक आनंद भातखंडे यांनी शुक्रवार, 31/08/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका शनिवारी भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब पुण्याला जायचा योग आला. पुण्याला गेलं की येताना काय खाऊ आणायचा असा प्रश्नच पडत नाही. चितळ्यांची बाकरवडी तर ठरलेली.मस्त कप भर चहा बरोबर १०-१२ बाकरवड्या कधी फस्त होतात तेच कळत नाही. माझी बहिण कोथरूडच्या Happy Colony मध्ये राहते.तिच्या घराजवळच चितळे बंधूंची शाखा आहे. संध्याकाळी ५ वाजता वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ६:३० वाजायच्या सुमारास सगळ्या बालगोपाळ मित्र मंडळीना बोलावले होते.

मिसळपाव.

लेखक गवि यांनी गुरुवार, 30/08/2012 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
3

अमेरिका , महाराष्ट्र आणि परप्रांतीय

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 27/08/2012 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र आणि अमेरिका दोन्ही मध्ये सध्या परप्रांतीय , त्यांचे आक्रमण आणि लोकल माणसाचा रोजगार याविषयी बरीच चर्चा चालू असते. सहज गंमत म्हणून त्यामध्ये काही साम्य आहे ते बघितले तर मला खालील मुद्दे सापडले. मुद्दे गंमत म्हणून आहेत आणि ते खालील छोट्या गृहीतका वरून काढले आहेत .

कविता आणि स्तोत्रांची आवड

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 24/08/2012 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचे पुस्तक किंवा कवितेचा एखादा ब्लॉग वाचणे हा माझ्याकरता नितांतसुंदर अनुभव असतो. लहानपणी केव्हा या आनंदाची गोडी लागली ते आठवत नाही पण एक पक्के लक्षात आहे - गणितातील प्रमेय सोडविल्यावर झालेल्या शब्दातीत आनंदाची तुलना आतापर्यंत फक्त एकाच आनंदाने झाली आणि ती म्हणजे "कवितेतील सौंदर्यस्थळ" अचानक गवसणे. खरोखर अंतःस्फुरणाने उतरलेली प्रत्येक कविता ही वाचकाच्या मनाशी सूक्ष्म संवाद साधते याबद्दल मला यत्किंचीतही संदेह नाही.