शिवसेनाप्रमुखांचे दसर्याच्या मेळाव्यात CD वर झालेलं भाषण ऐकलं .
http://www.dailymotion.com/video/xularp_bal-thackeray-speech-at-shivsen…
मनात कित्त्येक विचार आले. त्यापैकी काही -
मराठी तरुणांसाठी शैक्षणिक संस्था, उद्योगासाठी मदत, बॅंका, लालबाग-परळ मधल्या गिरणगावातल्या मराठी कुटुंबाच्या बाजूने लढा, मराठी कुटुंबांचे गिरगावातून डोंबिवली, ठाणे स्थलांतर होवू नये म्हणून लढा, बदलत्या काळाप्रमाणे मराठी कुटुंबाला आधार दिला असता तर सेनाप्रमुखाना आज हे निराशाजनक उद्गार काढावे लागले नसते.
या वाघाच्या अंगणात येवून बाहेरील आतंक्वद्यानी येवून दहशत माजवली, कित्त्येक लोकांची हत्त्या झाली. भर रस्त्यात आया बहिणींची अब्रू लुटली. आज मुंबईतील कित्त्येक इमारती बाहेर देशातील गुंडांच्या ताब्यात आहेत. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणार्यांनी आधुनिक गनिमी काव्याची पद्धत वापरून या आणि इतर शत्रूंचा खात्मा करून टाकता आला असता.
आयुष्यात असं भरघोस यश कमवून लोकांचे आशीर्वाद घेत हा वाघ महाराष्ट्रात काय, दिल्लीतही रुबाबात फिरला असता, आणि दिमाखात जनतेचा मुजरा घेतला असता. महाराष्ट्राच दुर्दैव हे कि तिकडे बारामतीत साहेब, इकडे सेनाप्रमुख, लातूरमध्ये देशमुख आणि कोकणात राणे यांनी आपापली साम्राज्यांना कुटुंबाच्या परिघातच ठेवलं; राष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी उत्तम शिक्षण, दूरदृष्टी, शौर्य आणि विद्वान लोकांचा सहवास, सतत अभ्यास लागतो. हे सर्व नसल्यानेच आज महाराष्ट्राचा ह्रास होत आहे.
वाचने
1405
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी खरं!
सो सो भाषण.