Skip to main content

विचार

मन अतर्क्य....

लेखक निनाद जोशी यांनी मंगळवार, 12/05/2015 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी मन खरंच किती चंचल असतं. मनाचे झालेले समज,मनाने तयार केलेल्या अनेक दिवसांच्या ओळखी पूर्णपणे बदलायला काही क्षणच पुरेसे असतात. आपल्याला सर्वात जवळचा वाटणारा व्यक्ती काही क्षणातच इतका परका होतो कि ज्याच्या बरोबर आपण अनेक गोष्टी शेअर केलेल्या असतात त्याला नुसते समोर पाहायला हि आपल्याला नकोसे वाटू लागते. त्याच्याशी बोलणे तर सोडाचत्याचा आवाज ऐकला तरी आपल्या मनातील कोलाहल जागृत होऊ लागतो. अश्यावेळी मनाला शांतकरणे अगदीच अशक्य होते. हे मनाचे बदलच मानवी मनाला अतर्क्य बनवतात.

फिटनेस माउंटन अँड युअर एसयुव्ही

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 12/05/2015 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक सहज सुचलेली/केलेली तुलना. FM फिट व्हायचंय, व्यायाम करायचाय... असं म्हणताना/ऐकताना लोकांच्या चेह-यावर एखादं मोठं संकट पुढे उभं राहिल्यासारखे भाव असतात. समजा, की हे संकट आहे. प्रचंड मोठा डोंगर आहे. तुमचं उद्दिष्ट त्याच्या शिखरावर पोहोचणं हे आहे. तुम्ही म्हणजे एक फोर व्हील ड्राइव्ह एसयुव्ही आहात. तर; तुमच्या मागील चाकांना मिळणारी ताकद म्हणजे व्यायाम. सर्वात महत्वाचा. ख-या अर्थाने तुम्हाला प्रॉपेल करतो तो व्यायाम. पुढच्या चाकांना मिळणारी ताकद म्हणजे डायट. रेअर व्हील ड्राइव्ह इज नॉट इनफ.

खंत

लेखक सौन्दर्य यांनी सोमवार, 11/05/2015 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी, ब्लड रिपोर्टसाठी इथल्या ‘मेमोरिअल हर्मन’ हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये सकाळी ९.३० वाजता पोहोचायचे होते. हॉस्पिटल घरापासून अंदाजे सहा मैलावर असून ड्राईव्ह टाईम अंदाजे ३० मिनिटांचा होता. हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी जरा लौकरच म्हणजे साडेआठच्या सुमारास घरून कारने निघालो. वाटेत एका सिग्नलजवळ अपघात झाला होता, फार काही झाले नव्हते, फक्त एका कारने पुढील कारला मागून ठोकले होते. इथल्या प्रथेनुसार दोन्ही गाड्या रस्त्यावरच उभ्या होत्या, पोलिसांनी बाजूची लेन देखील अडवून ठेवली होती.

जरुरत है, जरुरत है......

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 10/05/2015 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुल्ला नसरुद्दिन करडी दाढी [स्वतः ची] कुरुवाळीत, निवांत गप्पा छाटीत बसला होता. गप्पा मारता मारता मित्राने विचारले, “ नसरुद्दिन, तू कधी लग्नाचा विचार नाही का केला?” नसरुद्दिनची दाढी हसली. म्हणाला, “केला तर! कधीकाळी आम्ही पण तरुण होतोच कि! एकदा मी निश्चय केला - आपण स्वतः साठी एक आदर्श स्त्री शोधायची आणि तिच्याशी निकाह लावायचा. ठरवले. निघालो. वाळवंट ओलांडून दमास्कसला पोहचलो. नशीब बलवत्तर. तिथे एक स्त्री भेटली. अत्यंत देखणी. धर्मपरायण. संपूर्ण कुराण तोंडपाठ असलेली!” “मग?” “पण..... तिला काव्यशास्त्रविनोदातले ओ कि ठो कळत नव्हते. आणि व्यवहारज्ञान म्हणशील तर, शून्य. काय करायचीय अशी बेगम?

पुस्तक परिचयः डॉ. आई तेंडुलकर

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 09/05/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भः मूळ इंग्रजी पुस्तकः डॉ. आई गणेश तेंडुलकर, लेखिकाः लक्ष्मी तेंडुलकर धौल, मराठी अनुवादः सुनीता लोहोकरे, राजहंस प्रकाशन, प्रथमावृत्तीः फेब्रुवारी २०१५, किंमतः रु.३००/-

खड्डा आणि मी

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 08/05/2015 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शहरात एक सुप्रसिद्ध खड्डा आहे.संपूर्ण महाराष्ट्र्ात जरी एक वेळ दुष्काळ पडला तरी तो तेव्हा एखाद्या नदीसारखा दुथडीभरुन वाहत असेल यात शंका नाही तर इतर खडड्याप्रमाणेच याही खड्ड्याचे पुनर्निमाण नेहमीच होत असे. अहो खड्डे आहेत म्हणुन तर लोक गाड्या हळु चालवतात अशी मी स्वताःची समजुत करुन घेतली आहे त्या दिवशी मी महत्वाच्या कामानिमित्त [कोणते ? राष्ट्रउभारणीचे अत्यंत गुपित कार्य होते ते] त्या रस्यावरुन निघालो होतो.एक ब्रह्नानंदी टाळी लावलेला टॅम्पो रस्त्यात हळुवारपणे चालला होता.इतर कोणत्याही सांसारिक गोष्टिप्रमाणे त्याला मागच्या कोणत्याही ओरडणारया वाहनाची तमा नव्हती.

१० हजार एकर जमीन बांगलादेशला दिली

लेखक आशु जोग यांनी शुक्रवार, 08/05/2015 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
भारत-बांगलादेश यांच्यामधील जमीन देवाण घेवाणीचे विधेयक सर्व संमतीने पास झाले. सरकारला यासाठी सर्व विरोधी पक्षांनीही सहकार्य केले. या विधेयकाबाबत काही मतभेदाचे मुद्दे होते. बांगलादेशला जमीन देण्याला भारतातील काही गटांचा विरोध होता. त्यांना ही एक प्रकारची माघार वाटत होती. आजच्या पास झालेल्या विधेयकामुळे भारताकडून बांगलादेशला १० हजार एकरचा भूभाग मिळेल तर बांगलादेशकडून भारताला ५१० एकरचा प्रदेश मिळेल. हेतु हा आहे की यामुळे दोन्ही देशांच्या सीमा मानवनिर्मित न राहता नदी, पर्वत अशा नैसर्गिक घटकांच्या सहाय्याने बनतील असा अंदाज आहे. ज्यामुळे सीमांचे रक्षण करणे सोपे होइल.

रविंद्र पाटील : नाव ओळखीचं वाटतंय ???

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 08/05/2015 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
रविंद्र पाटील या नावाला स्वतंत्र ओळख नाही पण 'सलमान खान' हा संदर्भ दिला की त्यांची ओळख पटू शकेल. रविंद्र पाटील हे सलमानचा अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते, होते म्हटले कारण आता ते या जगात नाहीत. पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका निष्पाप प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी. गेले काही दिवस लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या चि.कु.सलमान खान खटल्याबाबत माहिती करून घेतांना काही धागे मिळाले.

'' अरे, ऐकतोस ना रे...''

लेखक संकेत२५ यांनी गुरुवार, 07/05/2015 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या स्वप्नवतं दुनयेत गाढ असता अचानकपणे जाग यावी अन ते स्वप्नचं कोलमडून जावे तसंच काहीसं आयुष्यात कधी घडतं . आयुष्यातले ' रंग ' एकाकी बदलतात.. अन होत्याच न्हवतं होवून जातं. 'क्षणा' चा हि विलंब न लागता... अशीच एक रविवारची रात्र ,हास्य आनंदा कडून वेद्नेकडे झुकलेली ... रात्रीचे साधारण सव्वा आठ होत आले होते .. पनवेल स्थानकाहून ठाण्यासाठी आम्ही लोकल पकडली अन सीट वर निवांत बसते झालो. . रेल्वे रुळावरून लोकलं अगदी धीम्या गतीनं पुढे सरत होती. डब्यात कमी अधिक रेलचेल होती. हळू आवजात कुणा एकेकाची, आप आपसात कुजबुज चाललेली . कुणी मोबाईल मध्ये डोकावलं होतं.

वन लायनर्स

लेखक गणेशा यांनी बुधवार, 06/05/2015 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
कधी काळी लिहिलेले माझे वन लायनर्स येथे देत आहे. आज काळ थोडा टाईम मिळत आहे मिपा वरती वाचन आणि लिखानासाठी त्यामुळे छान वाटत आहे. कधी काळी एक कादंबरी लिहित होतो, परंतु ती कादंबरी अपुर्ण राहिली ती राहिली.. कादंबरी लिहिणे आपल्याला अशक्य असे वाटते आहे..तो आपला प्रांत नाही उगाच २-३ भाग लिहिले आणि मिपावर वर पण दिले होते . असो एखादे वाक्य आवडले तर जरुर सांगा वन लायनर्स : १. "समर्थन हे चुकीच्या गोष्टींना लागते, जे बरोबर असते ते शास्वत असते त्याला आधाराची गरज नसते." २.