Skip to main content

विचार

महामानवाची जयंती ।

लेखक सवंगडी यांनी मंगळवार, 14/04/2015 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज महामानवाची जयंती । मस्त साजरी होती आहे… हो ,होते आहे. लेझर लाईट च्या प्रकाशात मदमस्त झालेले भीम सैनिक नाचतायेत… मी पण एक मनापासूनचा भीमसैनिक (यात जातपात शोधायला जाऊ नका) ! त्यामुळेच मला हे सगळ पाहून वाईट वाटत.! बाबासाहेबांमुळे मिळालेल्या व्यक्तीस्वातंत्र्य भाषास्वातंत्र्य, आणि आचारस्वातंत्र्य याचा परिपूर्ण वापर (दुरुपयोग) चालू आहें.पण विचार स्वातंत्र्य मात्र जमेल तसं आम्ही वापरतो. बाबासाहेबांचे विचार त्यांच्या अनुयायांनी लवकरच संपवायचे चालवले आहे. गौतम बुद्ध म्हणाले होते ,"मला देव बनवु नका! "माझे विचार अवलंबा!" पण आपण त्यांना देवाच्या जागी ठेवलं ! तिथेच बौद्ध धर्माला उतरती कळा आली.

टोल भैरव !!

लेखक नितिन शेंडगे यांनी मंगळवार, 14/04/2015 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार !!, आज काल सगळीकडे टोल चा मुद्दा खूप गाजतोय. नुकताच सरकार ने काही टोल बंध केले आणि काही ठिकाणी तात्पुरती टोल माफी दिली . मी सुरुवातीला स्पष्ट करतोय कि कोणत्याही राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मी हे लिहित नाहीये. हा तर चला मग, ज्या वेळेस मनसेने टोल चा मुद्दा घेतला त्याच्या आधी आपल्यासारख्या सामान्य माणसाचे तरी लक्ष होते का कि आपण किती आणि का टोल देतो ?? कधीतरी आपण विचारले का रे बाबा किती दिवस टोल घेणार ?

गौ. हत्या बंदी (मांसाहार आणि भूक )

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 14/04/2015 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
एतत्मांसस्य मांसत्वं प्रवदन्ति मनीषिणः॥ ज्या प्राण्याचे या जन्मी भक्षण कराल,पुढच्या जन्मी तोच प्राणी तुमचे भक्षण करेल. (मनुस्मृति- 5:55) वैदिक युगाच्या सुरवातीला लोक गौ. भक्षणकार्याचे, नंतर कामधेनु स्वरूपी गायींचे महत्व लोकांना कळले आणि तिची हत्या पाप मानल्या जाऊ लागली. गौ. हत्येचे फळे आज मानव समाज भोगत आहे. महाराष्ट्रात गौ. हत्या बंदी लागू झाली. तथाकथित अति शहाण्यांनी स्वाभाविकरित्या गौ. बंदीचा विरोध केला. त्या शिवाय त्यांना पुरोगामी कोण म्हणणार. (सध्या १५०-२०० रु किलो ने मिळणारे गौ. मांस गरिबांचे अन्न आहे, असा दुजोरा ही त्यांनी दिला). सध्या देशातल्या अधिकांश राज्यात गौ.

मिस्टिसिझम - एक चिंतन - १

लेखक प्रास यांनी मंगळवार, 14/04/2015 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिस्टिसिझम हा शब्द मिस्टिक आणि इझम या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे. मिस्टिक या शब्दाला साजेसा दुसरा इंग्लिश शब्द मिस्ट्री आहे आणि दोहोंमध्ये अर्थाच्या दृष्टीने साम्यच आहे. सर्वसामान्यपणे दोन्ही शब्दांचा अर्थ गूढ, रहस्यमय असाच अर्थ केला जातो. दोन्ही शब्दांच्या मूळाशी ग्रीक धातु म्यून (muien) आहे. याचा अर्थ गप्प बसणे असा आहे. आपल्याला त्यावरूनच आलेला म्यूट (mute) शब्द परिचितच आहे. अशा पार्श्वभूमीवर मिस्टिक वा मिस्ट्रीला गूढ, रहस्यमय असा अर्थ कसा प्राप्त झाला असावा?

कॉपीराईटचे अर्थकारण आणि माझी (स्वतःची) दुटप्पी भूमीका !

लेखक माहितगार यांनी सोमवार, 30/03/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी राईट्स आणि कॉपीराइट कायद्यांचा उद्देशच हा आहे की, सर्जनशीलतेस निव्वळ दाद नको तर त्या आधारावर आर्थीक उत्पन्नाच्या शक्यता सुद्धा असाव्यात ज्यामुळे नवीन संशोधन आणि सर्जक विचारांची समाजात जोपासना आणि वृद्धी व्हावी. विकिपीडियावर सुद्धा प्रताधिकारांची नवागत संपादकांनी बुजराखावी म्हणून कन्व्हिंसींग साठी बर्‍या पैकी आटापिटा चालू असतो. खास करून विवीध विभूतीभक्त आणि विशीष्ट विचारांनी (चष्म्यांनी) प्रेरीत प्रचारकांना समजावणे सर्वात कठीण असल्याचा सर्व साधारण अनुभव असतो.

कर्तृत्व

लेखक टीपीके यांनी सोमवार, 30/03/2015 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मुलगी ११ वर्षांची आहे, काल तिच्याशी बोलताना सहज काही विषय निघाला आणि तिला मी २-३ मिनिटात एक एक करून जयदेव पायेंग , बाबा आमटे, प्रकाश आमटे, बंकर रॉय, पोपटराव पवार यांच्या गोष्टी सांगीतल्या. त्यांनी काय काम केले, कशा परिस्थितीत केले, त्याने कोणाला काय फायदा झाला इत्यादी इत्यादी. हेतू हा की तिला सध्या वेगळे काम करणाऱ्या लोकांची ओळख व्हावी आणि थोडे इन्स्पीरेशन मिळावे. या गोष्टी मी मला त्यांचे काम जसे आठवेल तसे सांगितले,त्यातील काही बरोबर,काही चूक तर काही अर्धवट असेल,पण तिला या गोष्टी आवडल्या. टेड वरचा बेअरफुट कॉलेजचा व्हिडिओ पण दाखवला.

कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 27/03/2015 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे. जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते?

कालबाह्य बी.बी.रॉय आणि त्याची बायको!

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 26/03/2015 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. म्हणजे जेव्हा आम्ही अकरावीला इलेक्ट्रोनिक्स शाखेत प्रवेश घेतला तेव्हाची. तीस वर्षे होऊन गेली . अख्ख्या होल पश्चिम महाराष्ट्रात दोनच ठिकाणी अकरावीला इलेक्ट्रोनिक्स सुरु झालं होतं. इलेक्ट्रोनिक्स म्हणजे काय ते कुणालाच माहीत नव्हतं पण काय तरी हुच्च आहे इतकंच कळत होतं. मग काय, मिळतोय प्रवेश म्हटल्यावर घेऊन टाकला! अगदी सुरुवातीला एक आठवडा भौतिक शास्त्राची उजळणी झाली अन मग मुख्य विषय सुरु झाला. सुरुवातीलाच काम्पोनंटस ची ओळख वगैरे झाली. मग सरांनी शिकवले रेझिस्टन्स (रोधक) आणि त्याचे कलर कोड्स! हा भाग फारच मनोरंजक होता. आधी रंग ओळीने लिहायला सांगत.

उचलता वजन हे - Lifting Technique

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 25/03/2015 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या रोजच्या धावपळीचा कळत नकळत आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सद्ध्या एक वारंवार ऐकू येणारी तक्रार म्हणजे 'मला बॅकचा प्रॉब्लेम आहे रे' 'लोवर बॅकचा प्रॉब्लेम आहे'. आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करणारा हा अतिशय महत्वाचा अवयव अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित राहतो, आणि त्याचे परिणाम या अशा दुखण्यात दिसतात. पाठीवर किंवा कण्याला अपाय करणा-या अनेक गोष्टींपैकी एक नेहमी होणारी गोष्ट इथे नमूद करू इच्छितो. आपण रोजच्या व्यवहारात अनेकदा कमी अधिक वजन उचलतो. उचलून वर ठेवतो, वरून काढून खाली ठेवतो, सरकवतो, ढकलतो इत्यादी. या सगळ्या हालचाली करताना आपल्या पाठीची कमालीची इन्व्हॉल्व्हमेंट असते.

तो, ती आणि एक सामान्य घटना

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 24/03/2015 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजूबाजूला दिसनारी सर्वसामान्य माणसे किंवा आसपास घडनाऱ्या आणि वरकरणी सामान्य वाटनाऱ्या घटना कधीकधी बरेच काही शिकवून जातात. साधारण दोन महीन्यापूर्वीची गोष्ट मी कुटुंबासमवेत म्हैसूरवरुन बंगलोरकडे येत होतो. स्थळ: बंगलोर म्हैसूर रोडवरील मदुरच्या जवळचे एक अॅदीगॅसचे जॉइंट. वेळ: रात्रीचे सव्वानउ साडेनउ. बंगलोरमधे अॅदीगॅसच्या कुठल्याही जॉइंटमधे जितकी गर्दी असते तितकीच गर्दी इथेही होती. बऱ्याच कार पार्क होत्या. आम्हीही जेवायला तिथेच थांबायचे ठरविले. कार पार्क केली. आत गेलो. आतपण गर्दी होती, बराच गोंधळ होता. आम्हाला बसायला अगदी कोपऱ्यात जागा मिळाली.