Skip to main content

विचार

असा ही एक क्लायंट

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी बुधवार, 20/04/2016 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मुलगी दुसर्‍या यत्तेत जाऊन शाळा सबंद वेळ सुरू झाल्यावर मी काही उद्योग करावा असं ठरवलं. बी.एस्.सी. (फिजिक्स) असल्यामुळे जनरल शिक्षण होतं पण उद्योगधंद्याला पूरक असं काही नव्हतं. बारा वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा कॉलेजला प्रवेश घेतला, D.C.A. केलं. वर्गामधली मुलं मुली मला आंटी म्हणायचे! नवीन शिक्षण संपल्यावर डी.टी.पी. आणि छपाईचा व्यवसाय सुरू केला. कोणत्याही नवीन उद्योगाप्रमाणेच हा देखील पडंत, धडपडंत, टक्केटोणपे खात, पुस्तकांपेक्षाही जास्त परिस्थितीकडून आणि गिर्‍हाइकांकडून शिकत शेवटी स्थिरावला. प्रत्येक उद्योगाची स्वतःची एक ठरलेली त्रिज्या असते.

सायकलीशी जडले नाते २७: २०१५ च्या लदाख़ सायकल मोहिमेची झलक. .

लेखक मार्गी यांनी बुधवार, 20/04/2016 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

शृँगार १२

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 18/04/2016 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
" Hi friend how r u ? " - राधिका " I m fine n hows u ? " - मी " काय बोलू fine म्हणू की खर सांगू ? " - राधिका " खरच सांग . " - मी " काही प्रॉब्लेम असला की कुणापुढे बोलाव तेच समजत नाही . बाबा किती रागीट आहेत ते तुम्हाला माहीत आहेच . त्यामुळे त्यांच्यासमोर काही बोलायची हिंमत्तच होत नाही . आणि आई एकतर ignore करते नाहीतर भांडायला येऊ का तिथे अस बोलते , त्यामुळे तिला काही सांगण्यात अर्थ वाटत नाही . तुम्ही सांगत होता ते पटत आहे , काही bad girls पण असतात . आमच्या क्लासमधे पण एक ग्रूप आहे , ज्या सगळ्यांना टॉंन्ट मारतात , खूप वाईट कमेंट करतात .

आरोग्य सांभाळणारी-अ‍ॅप्स? नको रे बाबा!

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 18/04/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवडयात जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सदर लेख, आरोग्यविषयक ‘अ‍ॅप’ला भूलणा-या आणि त्यावर विसंबून आरोग्यविषयक निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेणा-या टेक्नोप्रेमी ग्राहकांसाठी.. HealthApps ‘तंत्रज्ञान’ हा आजच्या युगाचा गुरुमंत्र आहे. सारे जग या तंत्रज्ञामुळे जवळ येत आहे. तंत्रज्ञान एक महत्त्वपूर्व आविष्कार म्हणजे आपला भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल.

शृँगार ११

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 16/04/2016 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
" तुमच्या बद्दल अस कस होऊ शकत ? " " इथे physical strength कमी असण्यापेक्षा mental weakness मुळेच हा त्रास सहन करावा लागतो . " " अरे brother sorry तुला आमच्यामुळे फार थांबाव लागल ." मघाचा बिल्डर अँड फ्रेन्डस् आले होते . " अरे हे लोक्स कुठेपन पुस्तक ठेवतात त्यामुळ तुला त्रास, sorry हा भाई ." झालेल्या त्रासामुळ आणि त्याच्या थोड्याफार ताणाने त्याची original language परत आली होती . " अरे इट्स् ओके चल फाड ६०० ची पावती . मला जरा पटकन जाऊन यायच आहे . " त्यानही अजिबात आढेवेढे न घेता पावती फाडली . मीही निघालो पटकन . बाहेर जाऊन नाष्टा केला . एक चक्कर टाकली आणि परत आलो .

आयपीएल आणि कोर्ट!

लेखक चिनार यांनी शनिवार, 16/04/2016 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
काल कोर्टाने आयपीएल सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश दिले आणि देशभरात या निर्णयावर प्रतिक्रिया यायला सुरवात झाली. कोणी या निर्णयाचे स्वागत केले तर कोणी टीका केली. 'जखम कपाळाला आणि मलम पायाला' अश्या बोलक्या प्रतिक्रियासुद्धा आल्यात. निर्णय चूक की बरोबर हा भाग वेगळा, पण कोर्टावर असा निर्णय घेण्याची वेळ का आली असावी ह्याचा विचार करणे आवश्यक आहे. मनोरंजन या एकमेव संकल्पनेवर आधारित असलेली आयपीएल ही अत्यंत लोकप्रिय स्पर्धा आहे. आणि आताशा त्याला एखाद्या महोत्सवाचे स्वरूप आले आहे. मोठ्या शहरांच्या वीकएण्ड संस्कृतीमध्ये हजारो रुपयांचे तिकीट काढून आयपीएल सामने बघितले जातात.

शृँगार १०

लेखक अनाहूत यांनी शुक्रवार, 15/04/2016 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाच्या मनाचही अस असत ना कधी कोणता विचार येईल आणि काय मानसिक स्थिती होईल सांगता येत नाही . तसच झाल होत आता . साधी दाढी करायची त्यातही दोन तीनदा कापून घेतल होत आता अशा परिस्थितीत मी न डगमगता मिशांकडे मोर्चा वळवला . फारच वाढल्या आहेत म्हणून त्यांना थोड बारीक करण्याचा आणि आकार देण्याचा प्रयत्न होता पण हे साध कामही किचकट झाल होत . कधी इकडची मिशी बारीक कधी तिकडची . इकडं एक आकार तिकड भलताच फार प्रयत्न करूनही काही जमेना तेव्हा तीन पर्याय राहिले होते आहे तसच राहू देण व हस करून घेण . इतके दिवस अस्ताव्यस्त दाढी मिशा घेऊन फिरत होतो पण आता तो उपाय अशक्य होता .

मुंबई ग्राहक पंचायत - 41 वा वर्धापन दिन

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 15/04/2016 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गुढीपाडवाच्या दिवशी म्हणजे 1975 च्या गुढीपाडव्याला मुंबई ग्राहक पंचायतीची गुढी रोवली गेली. 41 वर्षे अव्याहत पणे ग्राहक शिक्षण, ग्राहक चळवळ तसेच सदस्यांकरीता उपयोगी वाणसामान, वस्तुंचे मासिक वितरण अशा विविध उपक्रमांतून मुंबई ग्राहक पंचायतीचे काम वाढतच आहे. आज जवळपास 36000 कुटुंब सदस्य संख्या असलेल्या मुंबई ग्राहक पंचायतीचा वटवृक्ष बहरतच आहे. आपण या निमित्ताने एक नविन अनुदिनी (Blog) सुरु करीत आहोत जी आवाजी (Audio) स्वरुपात आहे.

एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम

लेखक शान्तिप्रिय यांनी बुधवार, 13/04/2016 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
१४ एप्रिल. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती. या महामानवास कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन. कर्मठ हिंदु समाजातील काही अतिकर्मठ लोक माणसा माणसांत भेद्भाव करुन रानटी पणे वागत असताना या जनतेला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी जीवाचे रान केले. त्यांच्या प्रयत्नामुळे महाड चे चवदार तळे सर्वांना खुले झाले. जिथे तिथे अस्प्रुश्यतेची माणुसकीहीन परंपरा चालू असताना त्यांनी तिथे तिथे एल्गार पुकारला. याशिवाय भारतीय राज्यघट्ना तयार करण्या साठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. त्या दिवसांत ते दिवसांतून १८ तास काम करीत.

'पुरुष' ... हवा आहे पण कशाला !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी बुधवार, 13/04/2016 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषाचा नराचा खरंच काय उपयोग असतो पुरुषाचा उपयोग काय तर फक्त मुलांना जन्म देण्यापुरताच... एका अभिनेत्रीचे वाक्य ऐकले. मोठी गंभीरपणे घेण्याजोगी ही गोष्ट आहे. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने वावरते आहे. काही ठिकाणी तर पुढेही गेलेली आहे. आजच कशाला जुन्या काळीही झाशीच्या राणीने उत्तम युद्ध नेतृत्त्व करून दाखवले होते. तिच्या सैन्यात अनेक स्त्रिया लढत होत्या. अशी अनेक उदाहरणे दाखवून देता येतील. कुठलेही क्षेत्र स्त्रीने सोडलेले नाही. पोलिसात ती आहे. विज्ञानात ती आहे. ती डॉक्टर आहे. ती इंजिनीयर आहे. ती सॉफ्टवेयर मधे आहे. तिथे 'ती' 'त्या'ची बॉसही आहे.