ब्लॉग लिखाणाला चार वर्ष पूर्ण
- डॉ. सुधीर रा. देवरे
बरोबर चार वर्षांपूर्वी दिनांक 29 एप्रिल 2012 पासून मी दर शनिवारी साप्ताहीक ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती. 27 एप्रिल 2014 पर्यंत दोन वर्ष एकही शनिवार ब्लॉगशिवाय टळला नाही. म्हणजेच एकाही आठवड्याचा खंड पडू न देता आणि शनिवार सायंकाळ ही वेळही न टाळता नियमितपणे ब्लॉग लिहीत होतो. मात्र प्रत्येक आठ दिवसांनी ब्लॉग लेखनाने माझ्या अन्य लिखाणावर प्रतिकूल परिणाम होतो असे लक्षात आल्याने दोन वर्षापासून- एप्रिल 2014 पासून प्रत्येक महिण्याच्या 1 आणि 15 तारखेला ब्लॉग लिहीत असतो. प्रत्येक पंधरा दिवसाला एक ब्लॉग. या चार वर्षात एकही खंड जाऊ दिला नाही.
मिसळपाव