शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)
- Read more about शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)
- 14 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
*******************************
हे आलमगीर,
बऱ्याच वर्षानंतर तुम्हांला पत्र लिहीण्याचा योग आला. तुम्ही हिंदूवर लावलेल्या जिझीया करासंदर्भातील तुम्हांला लिहीलेल्या पत्रानंतर बहुतेक आत्ताच योग आला. आता हे पत्र २१ शतकात लिहीत आहे तेव्हा या पत्राची भाषा देखील मराठी आहे. तुमच्या आयुष्याची शेवटची कित्येक वर्षे तुम्ही महाराष्ट्रात घालविल्यामुळे कदाचित तुम्हांला ही भाषा अवगत झाली असेल अशी अपेक्षा करतो.