शिंच्याचं पत्र.
होय रे बेण्या!
कसा आहेस? तुझं पत्र काही येणार नव्हतंच. म्हटलं,चला आपणच देऊ एखादं धाडून परत. तू केलेला गुन्हा माझ्यासाठी कितीही अक्षम्य असला तरी फार काळ मी तुझ्याशी अबोल राहणार नव्हतोच. तुझ्याइतकं निष्ठूर होणं नाही जमायचं मला. तसं विशेष कारणही होतंच…
परवा सुंद्री भेटली होती.,हो तीच! शेंबडी,रडकी,ढापणी,दोन वेण्या घालून मिरवणारी पण मनकवडी,मनमिळाऊ,अवसानी,खेळकर आणि तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारी भोळी सुंद्री.केवढा बदल झालाय म्हणून सांगू तिच्यात!
मिसळपाव
“काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.
“काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.
“अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे.
“हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे.
“अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला?
ग्लास रिकामाच आहे अथवा भरलेलाच आहे या ह्ट्टांची टोकांची लोकानुनयाने मांडणी करत टोकाची नेतृत्व पुढे येतात.