नारायण...कोण नारायण?
(प्रेरणा: स्व.श्री.पु.ल.देशपांडे ह्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं अजरामर व्यक्तिचित्र: नारायण…!)
"हे बघ नारायणा..ती तुझ्यासारखी लग्नातली स्वयंसेवकगिरी मला अजिबात जमणार नाही आता",मी नारायणाला सांगून मोकळा झालो.
"का नाही जमणार पण?"
"अरे हल्ली कोणाच्या लग्नाला जायलासुद्धा जमत नाही रे.लग्नाची कामं कुठून करणार?"
"काय सांगतोस."
"इतरांच्याच काय...स्वतःच्या लग्नात जरी मी उपस्थित असलो तरी पूर्ण वेळ स्टॅण्डबाय मोडमध्येच होतो."
"आता हा स्टॅण्डबाय मोड काय असतो"
"म्हणजे आसपास सुरु असलेला अभूतपूर्व गोंधळ हा आपल्या नावानेच सुरु असूनही मी 'बघ्या' शिवाय काहीही करू शकत नव्हतो!
मिसळपाव