सुपर अँटीस्पायवेअर
अचानक कालपासुन संगणकावर कुठलीही साईट उघडली की एखादा पॉप अप उपटू लागला. मी उघडलेल्या साईट्सही नेहमीच्याच होत्या. तिथुन पॉप अप्स येत नाहीत ही खात्री होती. दोन तीनदा हा प्रकार झाल्यावर लक्षात आले, कुठलातरी ऍडवेअर/मालवेअर सारखा विषाणू घुसला आहे. लगेच आयईची सगळी कॅश मोकळी केली आणि कुक्या/हिस्ट्री वगैरे उडवुन लावले. पुन्हा ब्राउजींग सुरू केले तरी तोच प्रकार सुरू झाल. मग लक्षात आले की आपल्याकडे कुठलेही स्पायवेअरच नाही. लगेच 'विंडोज डिफेंडर' डाउनलोड केले आणि सगळा संगणक पिंजुन घेतला. त्याने किरकोळ एक दोन ट्रॅकिंग कुक्या उडवल्या पण त्यानंतरही बाकीची स्थिती जैसे थेच. आता मात्र लक्षात आले की काहीतरी गंभीर प्रकरण आहे. मग स्टार्टअप मध्ये जाउन कुठल्या कुठल्या प्रोसेसेस लोड होताहेत ते बघीतले तर त्यात एक विचित्र डीएलएल फाईल दिसली. त्या फाईलच्या नावाने गुगलले असता १-२ डिस्कशन बोर्ड्सवरच त्याची नोंद आढळली आणि तिथले पब्लिक हि फाईल विषाणू आहे म्हणून बोंबलताना दिसले. मग मात्र प्रकरणाला चांगलेच गांभिर्य आले. मी लगेचच माझा मकॅफी अँटी व्हायरस अपडेट केला आणि पुन्हा संगणक पिंजून काढला. जवळपास २-३ तास घेतल्यावर त्यातुनही काही फारसे हाताला लागले नाही आणि मूळ समस्या तशीच. आता मात्र काय करावे कळेना.
शेवटी गुगलबाबावर विश्वास ठेवुन आणखी काय उपाय आहेत का ह्याचा शोध एक शेवटचा प्रयत्न म्हणून सुरू केला. त्यातुन एका ठीकाणी मला 'सुपर अँटीस्पायवेअर' ह्या नविनच सॉफ्टवेअर विषयी माहिती मिळाली. त्यांच्या संकेतस्थळावर जाउन ते मोफतच आहे ना, कसल्याही जाहिराती घुसडत नाही ना इ. इ. ची कसुन माहिती काढली. कारण बर्याचदा ही नाव न ऐकलेली सॉफ्टवेअर्स भिक नको पण कुत्रं आवर अशी अवस्था करुन ठेवतात. सगळी खात्री झाल्यावर शेवटी एकदाचे ते डाउनलोड केले, आणि नामवंत डॉक्टर्सनी हात टेकल्यावर शेवटचा उपाय म्हणून रुग्णाला जसे कोण काय सांगेल ते देतात तश्या अवस्थेत पुन्हा एकदा संगणक ह्या सॉफ्टवेअर कडून पिंजुन घेतला. "साध्या सुध्या व्याधी तर कुणीही बरे करते आम्ही असाध्य व्याधी देखिल बर्या करतो" असे काही तरी स्लोगन आले आणि उपचार सुरू झाले. जवळपास १-२ तास खाल्ल्यावर माझ्या संगणकात ह्याने बरेच काय काय शोधुन काढले. निरनिराळ्या ४१ व्याधी दाखवल्या आणि त्यावर उपायही केले. मी संगणक रिस्टार्ट केला आणि ब्राउजींग सुरू केले तर अहो आश्चर्यम!! मूळ समस्यातर दूरच नेटचा स्पीड पूर्वीपेक्षा किंचीत जास्त वाटत होता. सुपर अँटीस्पायवेअर ने झक्कास काम केले आणि माझी बराच ताण हलका केला. भविष्यात आणखी कुणाला असा त्रास उद्भवल्यास वेळ आणि ताप वाचावा म्हणून माझा अनुभव इथे द्यावासा वाटला.
सुपर अँटीस्पायवेअर इथे मोफत उतरवुन घेता येते. तुमच्या संगणकावर देखिल एक ट्रायल घेउन बघाच.
माझा संगणक : विंडोज एक्सपी आणि इंटरनेट एक्सप्लोरर.
----------------------------------------------------------------------------------------------
डिस्क्लेमर : माझा सदर सॉफ्टवेअर बनवणार्या कंपनीशी कसलाही संबध नाही, ज्याने त्याने आपापल्या जवाबदारीवर उतरवुन घ्यावे.
वाचने
3597
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
उपयुक्त माहिती ...
लायनक्स
In reply to लायनक्स by आजानुकर्ण
सहमत आहे
उपयुक्त
माहीतीबद्
मालवेअर बाइटस
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सुनील
हो
माझ्या