सारेगमप आणि प्रजासत्ताक दिन
या वर्षीचा प्रजासत्ताक दिन सोमवारी आला. नुकत्याच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बर्याचश्या भारतीयांना ही नुसतीच सुट्टीची मजा उपभोगण्यापलीकडे जाऊन देशप्रेम व्यक्त करण्याकरीता योग्य संधी वाटली. देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवण्याचे काम या वेळी झी मराठी ने सारेगमप लिटिल चॅम्प्स च्या माध्यमातून केले. एक तर या कार्यक्रमाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. लहानच काय पण मोठेही या कार्यक्रमाच्या आधीन झालेले आहेत. त्यातूनही दुग्धशर्करा योग म्हणजे या कार्यक्रमाची संकल्पना प्रत्यक्ष बाळासाहेब मंगेशकरांनी मांडली आणि प्रत्यक्षातही आणली. स्वत: पंडीतजींच्या मार्गदर्शनाखाली गायची संधी मिळालेल्या या चिमुरडयांचा काही क्षण हेवाही वाटला आणि त्याच वेळी त्यांच्यावर असलेल्या दडपणाचे मलाही दडपण आले.
पण कार्यक्रम मात्र एकदम ’चाबूक’ झाला. लिटील चॅम्प्स बद्दल तर काही बोलणंच शक्य नाही पण सगळ्यात जास्त आनंद पंडितजींच्या तोंडून प्रत्येक गाण्यामागची पार्श्वभूमी समजावून घेताना. तसेही भावसरगम मध्ये त्यांच्याकडून गायल्या जाणार्या गाण्याची पार्श्वभूमी ऐकायला मिळाली होती, पण ती बहुतेक भावगीते होती. इथे मात्र एकामागोमाग एक अशी शौर्याचा इतिहास जागवणारी गाणी त्यामागच्या इतिहासासकट ऐकायला मिळाली. एक कायम जपून ठेवावा असा हृद्य कार्यक्रम बघायला मिळाला.
वर्गीकरण
जयस्तुते गाण छान
छान कार्यक्रम
सगळ्या
In reply to सगळ्या by विसोबा खेचर
१००%
In reply to सगळ्या by विसोबा खेचर
बहुतेक 'न' राहिला... :)
In reply to बहुतेक 'न' राहिला... :) by झेल्या
मी ही
In reply to बहुतेक 'न' राहिला... :) by झेल्या
धन्यवाद
In reply to धन्यवाद by विसोबा खेचर
राहीला तर
मस्त
पं हृदयनाथांचे निवेदन
चाबुक
या
सुंदर चित्रे
In reply to सुंदर चित्रे by मैत्र
महाराज नव्हे.
In reply to महाराज नव्हे. by ढ
दोन्ही पुस्तकांत होती ती चित्रे
In reply to दोन्ही पुस्तकांत होती ती चित्रे by भडकमकर मास्तर
अरेच्चा!!
शब्द कमि पड्तात.
In reply to शब्द कमि पड्तात. by मॅन्ड्रेक
इतर कार्यक्रम...
मुले
सर्वच गाणी
प्रजासताक दिनाच्या
देखणा