Skip to main content

प्रतिक्रिया

नॉनसेन्स!

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 16/04/2010 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आवडत्या पुस्तकांमधील एक पुस्तक म्हणजे ''वन मिनिट नॉनसेन्स''! म्हणजेच एका मिनिटातील निरर्थकता.... अ‍ॅन्थनी डीमेल्लो ह्या लेखकाचे हे तत्त्वज्ञानाचा मोठा आवाका अतिशय छोट्याशा, दैनंदिन स्वरूपाच्या आणि काही वेळा त्यातील मिष्किल छटेमुळे हसवणार्‍या घटनांमधून पेलणारे सुरेख, चटपटीत पुस्तक! No one is exempt from talking nonsense.

मी एक शेतकरी !

लेखक अश्फाक यांनी बुधवार, 07/04/2010 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ मधे एक बातमी आली आहे, यंदाचा मार्च जरा जास्तीच 'कडक' वाटला का? नक्कीच. आणि ते खरे देखील आहे. देशातील बहुतांश भागात यंदा मार्चमध्ये सर्वाधिक तापमान नोंदविले गेले आहे. उन्हाच्या तीव्र चटक्‍यांपासून एप्रिलमध्येही सुटका होणार नाही. उलट, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तापमानात अधिक वाढ होण्याची शक्‍यता आहे या बातमी वर एक खास प्रतिक्रिया आप्ल्याशी वाटावी (share) वाट्ली म्हणुन, On 4/7/2010 8:02 PM मी एक शेतकरी said: पगारदार लोक्कांनी शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये, व्यावसायिकांनी आपले दुकाने सोडू नयेत, राजकारण्यांनी आपले महाल ए.सी. सोडू नयेत. मी एक शेतकरी..

<तुझे मौन>

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 07/04/2010 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा ही माझं मौन, निगरगट्ट नगरसेवकासारखं लोचट, हलकट्ट, अविश्वासार्ह, चपलेने झोडावसं||१|| माझं मौन, धंदेवाईक डॉक्टर उर्मट्पणे खीसा कापणारं , उगाचच चेक अप करायला लावणारं ||२|| तुझं मौन, कपाळावरची आठी कशासाठी हे न कळणारी, पण भीरड आणणारी||३|| तुझं मौन, एक अबोल वाद घुम्यासारखे राहून, उगाच भांड्याना पोचे आणणारा ||४|| तुझं मौन, तुला पटलेली खात्री माझ्या वागण्याची घरी उशीरा येण्याच्या कारणाची||५||

"चेलुवी"[भारतीय लोककथेच्या सुगन्धाची कहाणी]

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 29/03/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
"चेलुवी"म्हणजे लावण्यवती तरुणी. 'कथासरित्सागर' या कर्नाटकच्या लोककथासंग्रहातील कथेवर आधारित एक अप्रतिम ह्रदयस्पर्शी हिंदी चित्रपट.(भावलेला) चेलुवी ही एक गरीब कुटुंबात आपली म्हातारी आई आणि बहिणीसह राहत असते. चेलुवीच्या हाती एक विलक्षण रहस्य येते.......ते म्हणजे 'सुंदर,दिव्य गंधाच्या फुलांचे झाड होण्याचे,अन् पुन्हा मानवी रुप धारण करण्याचं.' थोडं मोठं झाल्यावर चेलुवी हे रहस्य आपल्या बहिणीस सांगते, फक्त फांद्या तोडु नकोस असे बजावते.

मोहन वाघ, नाट्यक्षेत्रातला एक दिग्गज!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 25/03/2010 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यनिर्माता, दिग्दर्शक, नेपथ्यकार मोहन वाघ यांना मिपा परिवाराची विनम्र आदरांजली.. तात्या.

बिपिन आणि अन्य नाडी उत्सुक मित्र हो,

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 13/03/2010 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या नाडीग्रंथांवरील अदभूत कथनाच्या धाग्यावरील माझा प्रतिसाद इतका खोल गेला की त्या मुळे दुर्लक्ष होऊन मी प्रतिसादाला उत्तर दिले नाही असा संशय येऊ नये. म्हणून येथे नवा धागा टाकत आहे. राग नसावा.
ओकसाहेब, मी आणि मिपावरील अजून एक सदस्या, हे नाडी प्रकरण काय आहे हे पडताळून बघण्यासाठी उत्सुक आहोत.

चंद्रगड आणि ऑर्थरसीट

लेखक बज्जु यांनी गुरुवार, 11/03/2010 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रगड आणि ऑर्थरसीट चंद्रगड आणि ऑर्थरसीटचा ट्रेक म्हणजे महाबळेश्वर आणि जावळी खोर्‍यांमध्ला एक नितांत सुंदर ट्रेक. सदाहरित जंगलाचा हा प्रदेश. तर अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, आणि निर्सगरम्य परिसरातून ट्रेक करणं म्हणजे एक अविस्मरणिय अनुभवच. थोडक्यात इतिहासः- जावळी खोर्‍यावर वर्चस्व असलेले सूर्यराव/चंद्रराव मोरे सहजासह्जी स्वराज्यात सामील होत नाहीत हे पाहून महाराजांनी त्यांच्याकडे असलेला रायरीचा किल्ला म्हणजे रायगड स्वारी करुन स्वराज्यात सामील करुन घेतला. जिवाच्या भितीने मोरे जावळीखोर्‍यात असलेल्या चंद्र्गडावर लपून राहिला.

शब्दबंध २०१०

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 10/03/2010 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे. =========================================================================== २००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०! परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय.

(तेंडुलकर आणि गांगुली फालतु क्रिकेटर -मायकेल कॅस्प्रोविचचे मत)

लेखक चेतन यांनी सोमवार, 08/03/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
रावसाहेबांचा हा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्‍या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा) ;) असो... इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते: १. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही.