Skip to main content

प्रतिक्रिया

अण्णा, प्लीज जपा..!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 22/08/2011 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अण्णा, सर्वप्रथम तुमच्याबद्दल अत्यंत आदर व्यक्त करतो. तुमचं स्वच्छ चारित्र्य, तुमची साधी राहणी, तुमची सात्त्विकता, तुमच्यातली सादगी, तुमच्यातली निरागसता, तुमचं सेवाव्रत या सर्वांना माझा सलाम. अगदी मनापासून. अण्णा, खूप भावता तुम्ही मला.. आता काही मुद्दे - १) काही दिसांपूर्वी तुम्ही आणि तुमची टीम असं म्हणत होतात की सरकारनं त्यांच्या लोकपालपदासोबत तुमचंही जनलोकपाल बील संसेदेपुढे किमान सादर तरी करावं; मग संसद त्यावर जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य असेल.

जलेबी बाई...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 12/08/2011 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
जलेबीबाई... आम्ही स्वप्नातून दचकून उठलो आणि क्षणात बरळलो— “आम्ही जिलब्या पाडतो, तुम्ही भजी सोडा...” तसं जिलब्या पाडणं फार काही मोठं काम नाहीये बरं का. अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायचं, कढईतलं तूप उकळू लागलं की कॉटनच्या जाडसर फडक्यात पिठाचा गोळा भरून घेऊन मधोमध किंचित छिद्र पाडून मोठ्या नजाकतीने वेटोळे काढले की झालं. त्या जिलेब्यांना डालडा चांगला आतपर्यंत पिऊ द्यायचा. झाऱ्या कडेला ठेऊन त्या लालबुंद होईतोवर तळायच्या. मग व्यवस्थित निथळून घेतल्या की एकतारी पाकात डुबू द्यायच्या. त्यांनी पाक यथोचित शोषला की झाली खाण्यायोग्य जिलेबी तय्यार! तर अशी ही जिलेब्यांची पाककृती.

भविष्य वर्तवणार्‍यांना आव्हान....इत्यादि...इत्यादि

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 09/08/2011 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आपल्या येथील एका सदस्यांनी त्यांची सतत हेटाळणी होत आहे या समजामुळे ज्योतिष्यशास्त्रासाठी आव्हान स्विकारले आहे. त्यासाठी त्यांनी काही फीही आकारायची ठरवले आहे व ती परत मिळणार नाही असेही जाहीर केले आहे. त्याचे कारण त्यांनी त्यांना या सगळ्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत त्यासाठी ते पैसे त्यांना मिळाले पाहिजेत असे जाहीर केले गेले आहे. एक गोष्ट त्यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही ती ही की हे कार्य कोणाच्या घरचे नसून या शास्त्राचा खरेखोटेपणा सिद्ध करण्यासाठी आहे. त्यात त्यांच्या विरूद्ध दंड थोपटून उभे रहायचे कोणाला वैयक्तिक कारण असेल असे मला वाटत नाही.

आटपाट नगरात नवीन घर आणि ऑफिस...!!!

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 05/08/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे कन्फ्युजन. काय करावं बरं असा प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर आलोय. नक्की काय झालंय हे नमनाला घडाभर तेल न घालता सांगतो. आटपाट नगर होतं. गावामध्ये बारा बलुतेदार, अठरा पगड जातीजमातींचे, विविध व्यवसाय असलेले, विविध कौशल्ये असलेले लोक एकत्र येत जात होते.... तुम्ही म्हणाल 'राहत होते' असे हवे ना? नाही येत जात होते असेच बरोबर आहे. त्या गावाचं वैशिष्ट्यच असं होतं की नगरामध्ये लोक राहत नव्हते. तरी प्रत्येकाचं एकेक घर, एकेक निवारा या नगरामध्ये होता. थोडं सेकंड होम्स टाऊन शिप सारखं म्हणा ना! बर्‍याच्शा लोकांची स्वतःची वेगळी घरं त्यांच्या त्यांच्या गावी होती. या सेकंड होम टाऊनशिप मध्ये..

'दिल्ली बेली' - एक बेली ढवळक अनुभव

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 05/08/2011 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
"भाग भाग डीके बोस, डीके बोस, डीके बोस, भाग भाग डीके बोस डीके भाग..." अशी आर्त स्वरातली विनंती न ऐकून चालणारच नव्हतं. पहिल्यांदा हे गाणे ऐकले तेव्हा मला प्रश्न पडला की हा का एवढं 'भागायला' सांगतोय. बरं, गंमत म्हणजे हे गाणं मी एका रम्य आणि शांत सकाळी पहिल्यांदा ऐकलं होतं. मी अर्धवट झोपेत होतो; खिडकीतून उन्हाची कोवळी तिरीप माझ्या देखण्या चेहर्‍यावर प्रभा फाकवत होती; गॅसवर ठेवेलेल्या चहाच्या आधणाचा गोडसर उबदार वास नाकात शिरत होता; सोसायटीच्या पाण्याच्या पंपाचा मंद आवाज अस्पष्टपणे कानावर पडत होता, लिफ्टच्या दरवाजाचा आणि तो उघडा ठेवल्यानंतरच्या कर्कश अलार्मचा आवाज अधून-मधून कानावर पडत होता.

मला, डायेट विषयी, वारंवार विचारले जाणारे प्रश्न

लेखक खादाड अमिता यांनी सोमवार, 01/08/2011 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
मला सगळ्यात जास्त अश्या प्रकारची ईमेल येतात - 'मी तुमचा लेख वाचतो/वाचते. मी स्त्री/पुरुष, वय: ___, उंची: ____. मला डाएट सांगा.' आता, फक्त एवढीच माहिती सांगून डाएट मागणं म्हणजे एखाद्या डॉक्टर ला एवढंच सांगून त्याच्याकडे 'आता मला औषध द्या' असं म्हणण्या सारखं असतं. आहो, डाएट कशासाठी हवंय, काय विकार आहे, तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयी काय आहेत, व्यायाम किती (किंवा किती नाही!), व्यवसाय काय, घरचं जेवता कि बाहेरचं, शाकाहारी/ मांसाहारी ई. एवढी सगळी माहिती लागते. माझ्या कुठल्याही क्लायन्ट ची पहिली भेट (मुलाखत) कमीतकमी एक तास चालते.

द स्मर्फ्स ( 3D ऍनिमेशनपट )

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 01/08/2011 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवारी मुलांच्या 'ऑर्डर'ला मान देउन (हो, आजकालची मुले विनंती करत नाहीत) द स्मर्फ्स हा 3D ऍनिमेशनपट बघितला. तसे मला ऍनिमेशनपट भयंकर आवडतात.

प्रिय कॅटरीना,

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 21/07/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय कॅटरिना, सर्वप्रथम म्हणजे तू सुरेख दिसतेस आणि माझ्यासारख्या बर्‍याच जणाना तुझं रुपडं आवडतं हे आवर्जून सांगतो. ते असो. परवा बाकी बेटा (तुला बेटा म्हणू का? आता मी चाळीशी पार केली आहे त्यामुळे तेच मला शोभून दिसेल!) :) कुठल्याश्या वृत्तवहिनीशी बोलताना तू स्वत: जन्माने अर्धी एशियन व अर्धी युरोपियन आहेस हे तू अगदी बिनदिक्कत सांगितलंस. शिवाय त्यात काही लपवण्यासारखं नाही हेही मनमोकळेपणाने सांगितलंस. पण हे बोलताना उदाहरण म्हणून तू राहूल गांधीचं नाव घेतलंस ती मात्र एक मज्जाच केलीस. त्याकरता सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन..!