Skip to main content

प्रकटन

स्वैपाकघरातून पत्रे ३

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 30/06/2018 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अन्नपूर्णा, तू जेव्हा कुणाला कौतुकाने सांगतेस ना, आज अठरा वर्षे झाली पण या किसणीची धार जश्शीच्या तश्शी आहे, तेव्हा माझे खवल्याखवल्याचे अंग मोहरून येते. माझ्यावर खराखरा होऊ लागले कि मुळा, काकडी, गाजरं, रताळी, बटाटे, खोबरं यांची मस्ती अशी जिरते, मला फार मज्जा वाटते. I enjoy it. तुम्ही लोक माझ्या नावाचा इंग्रजी किस’शी चाबरट संबंध जोडून, कोट्या करता ना........., मी ऐकते ते! आधी मला माहित नव्हते इंग्रजी ‘किस’ म्हणजे काय ते!

शेवट

लेखक मनुष्य यांनी बुधवार, 27/06/2018 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
पंधराव्या मजल्यावरून खाली बघताना तिच्यात कसलीच भावना नव्हती. फक्त वरून सारं जग खेळण्यातलं वाटत होतं. टेरेसच्या कठड्यावर चढताना तिच्या पायांना सुरवातीला घाम सुटला होता पण आता भितीची कणभर ही जागा तिच्यात उरली नव्हती. फक्त श्वासांचा आवाज आणि वाऱ्यामुळे कुडत्याचा फड-फडण्याचा आवाज. पण सकाळच्या पाखरांची किलबिल तिच्या काना पर्यंत पोहोचत नव्हती. एक दिर्घ श्र्वास घेत तिने डोळे मिटले. कोणतातरी पाखरू अलगद तिच्या खांद्यावर येऊन बसल्याचा भास तिला झाला आणि मनाने ती थेट बालपणात जाऊन पोहचली. "एक होती चिऊ" अशी बोलणारी आई. इवल्याशा फाईटने जोराचं लागलं असं खोटं-खोटं ॲक्टिग करणारे बाबा.

वाळवीची पावसाळी रात्र.

लेखक गवि यांनी सोमवार, 25/06/2018 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ पुष्कळ झाली तसे वाळवीने आपले थकलेले दोन्ही डोळे तळव्यांनी दाबले. कार्यालयातले सर्व सहकामी कधीच निघून गेले होते. वाळवीने तिच्या मांडीमाथ्याच्या पडद्याकडे एक शेवटची नजर टाकली. काही नवीन ईडाक वरिष्ठांकडून आलेली नव्हती. क्षेत्रीय कार्यालये आणि केंद्रीय कार्यालय यांच्यातल्या संपर्कांबाबत वाळवीचं काम नेहमीच मरणरेषेवर चालत असे. उदेका किंचित जरी जास्त झाला तरी साप्ताहिक पुनरावलोकनात त्याचा उल्लेख होत असे. तिच्या कुंजी परिणाम क्षेत्रात हा उदेका मुख्य होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. स्थानिकेने आमटीपथ ते श्रीस्थानकापर्यंत जाताना मांडीमाथाथैली भिजली असती.

मृत्यू – समाधी, प्रायोपवेशन, बलिदान आत्महत्या वगैरे

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 23/06/2018 06:46 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यू – समाधी, प्रायोपवेशन, बलिदान आत्महत्या वगैरे... सध्या भैयुजी महाराजांच्या आत्महत्येने बराच गोंधळ (फक्त सोशल मिडीयावर) चालू आहे. अगदि परवा परवा हिमांशू राय ह्यांनी दीर्घ आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली तेव्हा देखील एवढा गदारोळ मजला नव्हता, म्हणजे हळहळ सगळ्यानी व्यक्त केली पण हे भैयुजी महाराज पडले महाराज, राष्ट्रसंत वगैरे, मग संत, महाराज, बाबा वगैरे लोकांनी आत्महत्या करावी का असे प्रश्न विचारले जाऊ लागले . कसा काय कुठून पण समाधी घेणे म्हणजे एक प्रकारे आत्महत्या नाही काय, स्वा.सावरकरानी प्रायोपवेशनाने प्राणार्पण केले ती आत्महत्या नव्हती काय?

मा.ल.क.-४

लेखक शाली यांनी गुरुवार, 21/06/2018 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवासात रस असल्याने त्याच्या आयुष्यातला बराचसा कालखंड हा प्रवासातच व्यतीत झाला होता. अनेक भुभाग, अनेक देश, त्यांचे रितीरिवाज, संस्कृती, भाषा, कला पहात तो बराच फिरला होता. आज मात्र दिवसभर चालूनही त्याला थकवा आला नव्हता. कारण आजुबाजूचा सधन शेती, निसर्ग असलेला भाग, त्या भागातून जाणारा रस्ता, रस्त्यातील विश्रांती स्थळे, पाणपोया या सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतलेली दिसत होती. तो शहराच्या प्रवेशद्वारावर पोहचला तेंव्हा पहारेदारांनी अत्यंत नम्रपणे पण कसोशीने त्याची चौकशी करुन त्याला शहरात प्रवेश दिला होता. “राजधानीचे शहर असल्याने काटेकोर चौकशी करावी लागते” असे सांगत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती.

निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 18/06/2018 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
निर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे. निर्लेप ब्रँडची भांडी हा विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. अडुसष्ट सालच्या सुमारास सरकारने स्टेनलेस स्टील आयात करण्यावर निर्बंध आणले त्यामुळे आताचे निर्लेपचे मालक श्री राम भोगले यांच्या वडिलांनी प्लास्टिकचे ( टेफ्लॉन ) कोटिंग असणारी भांडी बाजारात आणली. हा प्रयोग आपल्या देशात पहिलाच आणि अद्भुतच होता ! निर्लेप यंदा आपल्या उद्योगाचा सुवर्णमहोत्सव साजरे करतो आहे.

'छंदामागचं त्रिकूट'

लेखक उपयोजक यांनी रविवार, 17/06/2018 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या बाबतीत एखाद्या गोष्टीचं छंदात किंवा मराठीत ज्याला पॅशन म्हणतात त्यात रुपांतर कधी होतं? जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे उदा.चित्रकला असो किंवा गायन,वादन,लेखन,वस्तूंची निर्मिती,दुरुस्ती,विक्रीकला कोणतंही क्षेत्र असो, त्यातून स्वत:ला आनंद तर मिळायला हवाच पण लोकांकडूनही कौतुक व्हायला हवं तरच ती कला,तो छंद अजून बहरतो.त्या छंदातलं अजून जितकं काही शिकता येईल तितकं शिकण्याचा हुरुप वाढतो.हा हुरुप वाढवण्याचं काम लोक करत असतात.त्यांच्यामुळेच तर कळतं की आपण सामान्यापेक्षा थोडेसे का होईना वरचढ आहोत.ही 'थोडसं वरचढ' असण्याची भावनाच सुरुवातीच्या प्रेरणेचं काम करत असते.त्या प्रेरणेच्या जोरावरच आपण अज

गूढ अंधारातील जग -९ पुढे

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 16/06/2018 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -९ पुढे पाणबुडीतील सैनिकांचे मानसिक प्रश्न हे सामान्य सैनिकांपेक्षा वेगळे असतात. धातूच्या नळकांड्यात बंद असताना बाहेरचे काहीही दिसत नाही. जेवढे दिसते ते यंत्राच्या पडद्यावरच, ते सुद्धा प्रकाशमान बिंदूंची आकृती, जी आपण प्रत्यक्षात कधीच पाहिलेली नसते. त्यातून तुम्ही शत्रूच्या प्रदेशात किंवा जवळ गस्तीसाठी जाता तेंव्हा शत्रूने पेरून ठेवलेले पाणसुरूंग किंवा शत्रूच्या गस्त घालणाऱ्या पाणबुड्या यांच्याशी सामना होण्याची सतत असणारी भीती. शिवाय शत्रूचे टेहळणी करणारे उपग्रह किंवा विमाने आणि जहाजे यांची भीती.

प्रणय बाग आणि ध्येयहिन उत्क्रांतीवाद

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 15/06/2018 12:39 या दिवशी प्रकाशित केले.

शनिवारी निसर्गशाळा कॅम्पसाईटच्या परीसरामध्ये, मृगाचा किडा पाहिला. मागच्या वर्षी देखील याच अवधीमध्ये किडा दिसला होता. त्यावेळी याविषयी थोडे वाचले देखील होते. यावर्षी मात्र, मृगाचा किडा पाहताना, ते वाचलेले सर्व आठवले व एक वेगळाच विचार मनात येऊन गेला. आता थोडा थोडा आठवुन इथे मांडण्याचा प्रयत्न करतो.