Skip to main content

प्रकटन

करोना व्हायरस - अंताची सुरवात?

लेखक नेत्रेश यांनी सोमवार, 13/07/2020 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
२०व्या शतकाच्या उत्तरार्धात जग खुप जवळ आले. परदेश प्रवास नित्याची बाब झाली. वेगवेगळ्या देशातील लोक दुसर्‍या देशात सहजपणे स्थायीक होउ लागले. मेल्टिंग पॉट चा कॉन्सेप्ट काही शहरापुरता मर्यादीत न रहाता जगभर पसरला. अत्यंत जोमाने आर्थिक भरभराट होउ लागली. २१व्या शतकाच्या सुरवातीला नवनवीन गॅजेट्स स्वस्तात उपलब्ध झाली. व्हॉट्सअ‍ॅपने STD / ISD कॉल्स ईतिहासजमा केले. पण त्याचबरोबर नैसर्गीक साधनसंपत्ती प्रचंड महागली. अवघ्या काही वर्षांतच सोने, जमीन ईत्यादी १० तो १५ पट महागले. लोकांचे आयुष्यमान खुप वाढले. पुढारलेल्या देशात लोक सहजपणे ९० - १०० वर्षे जगु लागली.

बट्ट्याबोळ-१

लेखक कपिलमुनी यांनी रविवार, 12/07/2020 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊनचा बट्ट्याबोळ जगभरात लॉकडाऊन हा वाढणाऱ्या पेशंटच्या संख्येच्या तयारीसाठी वापरला जात असताना आपल्या देशात मात्र हाच एकमेव रामबाण उपाय म्हणून वापरला गेला. कोणतेही प्लॅनिंग ना करता जाहीर केलेला लॉकडाऊन 1,2,3 असा मनमानेल तसा वाढवत नेला.

क्वाएट प्लीज... लेडीज अँड जेंटलमेन!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 11/07/2020 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
चंदा आए, तारे आए, आनेवाले सारे आये आए तुम्ही संग ना... आन मिलो सजना| जुलै महिन्याचा दुसरा आठवडा .... दुपारची वेळ.... बाहेर रिमझिमणारा पाऊस.... हातात मोठा मग भरून वाफाळता चहा आणि ही अप्रतीम ठुमरी. जुन्या आठवणींची हुरहुर लावणारी. ह्यावेळी खरोखरच एका सजणीने झुरवलं. तिच्या आठवणीने जीव वेडापिसा झालाय. तिचं आणि माझं नातं अगदी मी वयात येतानापासूनचं - त्याहीपेक्षा किंचित आधीचंच. हिरवळीवरून - पांढर्‍या शुभ्र पेहरावात ओंजळीने मोती उधळीत येणारी ती. तिच्या त्या निळ्या डोळ्यांना, सोनेरी केसांना, तिच्या तारुण्याने मुसमुसलेल्या अंगकांतीला, स्ट्रॉबेरीचा रंग ल्यालेल्या गालांना चिरतारुण्याचं वरदान.

रंगराज्य -२

लेखक vcdatrange यांनी शुक्रवार, 10/07/2020 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टरीचं शिक्षण म्हणजे एकदम रटाळ काम असतं. त्यातही जर आयुर्वेद शिकायचा असेल तर ती भुक कॉलेजात कधीच पुर्ण होत नाही. मग पर्याय असतो ते प्रस्थापित वैद्यांच्या OPDs अटेंड करणे, पुण्यातले माझी सात वर्षही अशीच खुर्चीमागे उभी राहुन सरली. अगदी पहिल्या वर्षापासूनच याची सुरुवात झाली होती. राहायचो समितीला म्हणजे एफ सी रोडवर पटवर्धनांच्या पॅलेसमागे अन् कॉलेज सदाशिवात. वाहतुकीचं साधन एकच , सायकल. सकाळी साडे सातला तुळशीबागेत वैद्य अजित जोशींच्या दवाखान्यात तिकडुन दहा पर्यंत परत होस्टेल, कारण मेसला जेवण नाही केलं तरी दंड असायचा. जेवुन लगेच सदाशिवात कॉलेजला . .

गुलाबी कागद निळी शाई....7जवळीक

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 10/07/2020 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी कागद निळी शाई..6 शहारा Hi हायेssss. शिकारी खुद यहा शिकार बन गया..... शप्पथ सांगते तेव्हा मी अजिबातच notice नव्हतं केलं तुला. Btw मी पण योगा सोडला आणि मेंगो कलरचा ड्रेस होईनासा झाला. तुझेच शब्द बदलून कली का फूलगोबी होते, बादल का बादली होते, दूध का दुधी (भोपळा) होते, किसने देखा है? दुनिया देखे न देखे, मैने ग्राम को किलोग्राम होते देखा है... ;););) तशी मी कालपासून हसतेय. तुझी शायरी वाचून. म्हणजे आधी मी ती मराठीत आहे असंच समजले.

रंगराज्य

लेखक vcdatrange यांनी बुधवार, 08/07/2020 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
आडनावाचा प्रभाव असेल कदाचित, पण रंगांच obsession लहानपणापासनंच. वडील चित्रकला शिक्षक असल्यानं घरात कायमचीच रंगपंचमी असायची. पुण्याजवळ थेऊरला राहायचो तेव्हा. . त्याकाळातला मास्तरांचा पगार वैग्रेचं गणित जुळवायला बोर्डस् रंगविणे, घरांचे रंगकाम देखिल करायचे. आईचाही सहभाग असायचा यात. . त्याकाळी लाकडाची चौकट बनवुन त्यावर पत्रा ठोकुन बोर्ड बनवले जायचे. पुण्यात पेठेत कुठे साहीत्य खरेदी करुन पुलगेटपर्यंत पायी यायचं अन् तिथुन थेऊरसाठी गाडी पकडायची. कारण सिटीबसमध्ये साहीत्य घेवुन जावु देत नसतं. कापडी बोर्ड रंगविण्याअगोदर "सरस" नावाचा प्राणिज डिंक उकळुन त्यात कापड भिजवायचे.

खेळ मांडीयेला, कोरोना भिववी दारी - भाग २: फुटबॉल (अपूर्ण)

लेखक शेखरमोघे यांनी बुधवार, 08/07/2020 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
(जसे कोरोनामुळे जगभरात सर्वसामान्यांचे जीवन काही ठिकाणी थोडेसे विस्कळीत तर कांही ठिकाणी जवळ जवळ उध्वस्त झाले आहे, तसेच थोडेसे वेगवेगळ्या खेळांचेही झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जागतिक खेळांत  मोठ्या प्रमाणांत बदल अपेक्षित आहेत. त्याबद्दल थोडेसे.......

पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत : भारतीय मानसिकतेतला फंडामेंटल घोळ !

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 08/07/2020 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही एकमेकात गुंफलेल्या, फंडामेंटली चुकीच्या मानसिक धारणा आहेत. कर्मसिद्धांत मानणं म्हणजे आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेण्याऐवजी, ते आपल्या पूर्वसंचिताचं फळ समजून गप्प बसणं, किंवा (आता इलाजच नाही म्हटल्यावर), दुसर्‍याला माफ करणं, किंवा प्रसंग निस्तरण्याशिवाय पर्यायच नसेल तर, अत्यंत पडेल मनोवृत्तीनं, जमेल तसा प्रसंग रेटणं ! शिवाय ही थिअरी मानणार्‍याला, पूर्वसंचितात आपली नक्की किती लफडी आहेत याचा पत्ता नसतो, त्यामुळे आला बिकट प्रसंग की लाव थिअरी असं करत; तो स्वतःचा सारासार विचार कायमचा गमावून बसतो. त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी क

गुलाबी कागद निळी शाई....5 चंद्रवेळ

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 02/07/2020 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी कागद निळी शाई..4 अलवार Hi दोन दिवस झाले अजून तुझं उत्तर नाही. काय झालं? तू काल ऑफिसला पण नाही आलास? Is everything ok??? सारखं वाटतंय फोन करावा किंवा निदान मेसेज तरी. तुझ्याकडे माझा नंबर जरी नसला तरी माझ्याकडे तुझा आहे. (कसा मिळवला विचारू नकोस.:)) पण असंही वाटतंय मला टाळत तर नाहीस ना? काही चुकीचं लिहिलं होतं का मी पत्रात? आठवत नाहीये. दुखावलं का मी तुला? If so then sorry. मेल किंवा मेसेज असता तर मी काय लिहिलं ते वाचता तरी आलं असतं.

खेळ मांडीयेला, कोरोना भिववी दारी - भाग १: क्रिकेट 

लेखक शेखरमोघे यांनी बुधवार, 01/07/2020 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
(जसे कोरोनामुळे जगभरात सर्वसामान्यांचे जीवन काही ठिकाणी थोडेसे विस्कळीत तर कांही ठिकाणी जवळ जवळ उध्वस्त झाले आहे, तसेच थोडेसे वेगवेगळ्या खेळांचेही झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जागतिक खेळांत  मोठ्या प्रमाणांत बदल अपेक्षित आहेत. त्याबद्दल थोडेसे.......