Skip to main content

प्रकटन

गुलाबी कागद निळी शाई....3 मायना

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 28/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी कागद निळी शाई..2 काहूर Hi.. कसला स्मार्ट आहेस तू. ओळखशील आणि तेही इतक्या पटकन, असं वाटलंच नव्हतं. अर्थात खूप आत कुठेतरी तू ओळखावं असंही वाटत होतंच म्हणा! U know? माझ्या आयुष्यातील हे पहिलं पत्र, तू पाठवलेलं. आणि तेसुद्धा प्रिय न all असं सगळं लिहिलेलं. (मायना म्हणतात नं त्याला??) So cute! तुझी presentations सुद्धा इतकी मस्त असतात ना. इमेल सुद्धा( btw आत्ता सुचलं म्हणून सांगतेय, आपण एकमेकांना पत्रच लिहायची, email ping WhatsApp वगैरे काही नाही. चालेल?? सॉल्लिड मज्जा येईल ना?) तर काय सांगत होते?

गुलाबी कागद निळी शाई....1 अनामिक

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 24/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी कागद निळी शाई Hiiii पत्र पाहून आश्चर्य वाटलं ना? गंमत सांगू, मलाही वाटलं. :) कारण शाळेतलं पत्र लेखन संपल्यावर पुन्हा कधी खरंखुरं पत्र लिहिलंच नाही बघ. तसंही बोअरींगच होतं ते. तिथं हमखास मार्कस् जायचे. मराठीच्या मिस् तर छळायच्याच मला. माझे निबंध आणि पत्र भर वर्गात वाचली जायची. लेखन कसं नसावं याचं उदाहरण म्हणून. सगळे चिडवायचे मग. Science घेतलं आणि सुटले त्यातून. ते जाऊदे. तर काय सांगत होते? हं तर तुला लिहिलेलं पत्र. त्याचं काय आहे, तसा तू मला नेहमी भेटतोस. भेटतोस म्हणजे दिसतोस. कँटीनमध्ये, टी कॉर्नर वर.

डोक्याला शॉट [तृतीया]

लेखक गड्डा झब्बू यांनी गुरुवार, 18/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
"हरी ओsssम" असे मोठ्या आवाजात म्हणत रवी बाबाने चिलीम धरलेली हातांची जुडी कपाळाला लावली आणि डावीकडे बसलेल्या राजाराम बुवाने पेटवून धरलेल्या माचीसच्या दोन काड्यांजवळ तिचे टोक आणून सर केली. गांजाचा एक दमदार झुरका मारून तोंडातून धुराचे लोट सोडत चिलीम शेजारी बसलेल्या रज्जुभैय्याच्या पुढ्यात धरली. "चल चली को चाम ले...साई बाबा का नाम ले" असा घोष करून रज्जुभैय्याने जोरकस दम मारून चिलीम बाजूच्या सागर संजयक्षीर कडे पास केली. सर्वज्ञानी सागरने आधी तोंडावरचा N95 मास्क काढला. मग खिशातून 80% अल्कोहोल असलेल्या सॅनीटायझरची बाटली काढून दोन्ही हातांचे निर्जंतुकीकरण केले.

ग्राहकमंच : सामान्यांचा हक्क !

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 18/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
बँक ऑफ इंडीयाचा नॅशनल इंशुरन्सबरोबर मेडी-क्लेमचा टाय-अप होता. बँकेच्या कस्टमर्सना माफक प्रिमियममधे मेडि-क्लेम कवर अशी योजना होती. फॉर्म भरतांनाच तिथे असलेल्या स्टँडींग इंस्ट्रक्शनवर सही करणं (प्रिमियम ड्यू डेटला खात्यातून परस्पर नॅशनल इंशुरन्सला पाठवला जाईल) अनिवार्य होतं. त्याशिवाय तो फॉर्म वॅलीड नव्हता. सात वर्ष प्रिमियम योग्य वेळी बँकेतून परस्पर खात्याला डेबीट होऊन पॉलिसी ऑटोमॅटीक रिन्यू होत होती. आठव्या वर्षी बँकेच्या गफलतीनं प्रिमियम भरायचा राहिला आणि पॉलिसी लॅप्स झाली. नेमक्या त्याच वर्षी पत्नीला हॉस्पिटलाइज करावं लागलं. पॉलिसी लॅप्स झाल्याची मला कल्पनाच नव्हती.

व्हिडिओ अभिवाचन:-गुरुजींचे भावविश्व-प्रस्तावना व भाग १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
खुला-सा:- हे व्हिडिओ अभिवाचन फेसबुक वर सुरू केलेले आहे.ते इथे देत आहे. फेसबुक वर केलेले असल्यामुळे त्या हिशोबानी मनातून आलेली ही प्रस्तावना आहे. आपण मिपाकरांनी माझ्या गुरुजींचे भावविश्वला अलोट प्रतिसाद दिलात. आता या वरील प्रस्तावनेसह केलेल्या पहिल्या भागाच्या अभिवाचनासाठी आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे.

हम जल्द ही लौटेंगे एक ब्रेकके बाद.. तोपर्यंत घाला पिठामध्ये तेल..

लेखक आजी यांनी गुरुवार, 18/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
जाहिरात जीवनाचं अविभाज्य अंग आहे. फार प्राचीन काळापासून जाहिराती केल्या जाताहेत. त्या आज वाचल्या की हसू येतं. जाहिरातदार सकाळपासूनच आपलं काम सुरु करतात. आपण आंघोळीला कोणता साबण वापरायचा, केसांना कुठलं तेल लावायचं म्हणजे ते'लंबे ,घने,काले'होतील. स्वयंपाकात कुठलं तेल वापरायचं की तुम्ही बटाटेवड्यासारखे चमचमीत पदार्थ नेहमी खाऊ शकाल. जीवनसाथी कसा निवडावा,त्यासाठी कोणत्या डॉट कॉम वर जायचं, गुंतवणूक कुठे करावी, कुठल्या जंतुनाशकानं फरशी स्वच्छ करावी,दात कशानं घासावेत म्हणजे दाताबरोबरच 'मसूडे'मजबूत होतील, क्रिम्स, डायपर, निळा रंग वापरून सँनिटरी पँडस्,चप्पल, शूज, लस्सी, दूध, कुकर,बिस्किट,नाश्ता!

ह्याचं आपलं काहीतरीच..!

लेखक पाटिल यांनी गुरुवार, 18/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
ह्याच्या सध्याच्या जगण्याबद्दल किंवा जगण्याच्या नावाखाली किंवा जगणं चालू रहावं, यासाठी हा जो काही करतोय, त्याबद्दल बोलताना ह्याला अवघडल्यासारखं होतं. अर्थात त्यात स्वत:ची शरम वाटावी असं काही नाही.

एका खटल्याची गोष्ट

लेखक पहाटवारा यांनी बुधवार, 17/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसाधारण लोक सहसा कोर्ट-कचेर्री करायच्या फंदात फारसे पडत नाहित. माझाहि स्वभाव मूलतः भांड्खोर नाहि अन कोर्ट-पोलिस यांच्या कहाण्या ऐकुन, मी स्वतः कधी या फंदात पडेन असे वाटले नव्हते, अन इतक्या छोट्या गोष्टिकरता तर खचितच नाहि .. पण कधीतरी तुम्हालाच तुमच्या स्वतः विषयी नवीन कळते ! तर .. ही गोष्ट आहे अशाच एका खटल्याची. मला अमेरिकेत येउन एखादेच वर्ष झाले असावे.

देवाचं नांव कुणी ठेवलं ?

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 16/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
देवाचं नांव कुणी ठेवलं ? या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो. तुमचं जीवन निर्भार होतं; सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते, पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे, एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली ! कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही. कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही. कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत, कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्‍याचं धन होणारी दानपेटी नाही.

शरीर..

लेखक पाटिल यांनी मंगळवार, 16/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
ह्याचं शरीर ह्याला पुरेपूर ओळखून आहे. फार जुनी सोबत आहे..! ह्याचं शरीर चालतं, बसतं, लोळतं, लाडावतं, कधी बासरीसारखं झंकारतं.. शरीर ह्याच्या इच्छा विनातक्रार झेलत, ह्याच्यापाठोपाठ पळतं...तेव्हा हा कृतज्ञ नसतो शरीराबद्दल.. पण तेच आजारलं की मलूल होऊन पडून राहतं, तेव्हा मात्र ह्याला दगाफटका झाल्यासारखं वाटतं. ह्याचं शरीर थरथरतं. पिकल्या पानांबरोबर हल्लकफूल गिरक्या घेतं. पाचोळा तुडवतानाचा आवाज ऐकत ऊर्जावान होतं. कधी वेल्हाळ गाण्याबरोबर आपोआप डुलायला लागतं.. शरीर घारींसोबत आकाश तोलतं. कधी सुनसान हायवेवर, सुसाट बाईकवर, वारा कापत भिंगरी होतं. पावसात भिजून लगदा होतं. रखरखत्या ऊन्हात पाणी धरून ठेवतं..