Skip to main content

प्रकटन

आत्मविश्वास वाढवणारं भाषण

लेखक लेखनवाला यांनी शुक्रवार, 18/09/2020 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
“तुम्ही इथे उगाच नाही जन्माला आला आहात, काहीतरी कारण आहे, तुम्हाला हा नश्वर देह घेवून नुसतंच जगायचं नाहीय, तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुम्ही ईथे आहात….. आणि ईथे तुम्ही अस्तित्वात आहात… जिवंत आहात…. हीच गोष्ट पुरेशी आहे….. आता फक्त तुम्हाला सिदध करायचं….. तुमची सगळी मेहनत ही तुमच्या मनाची मशागत करण्यासाठी असायला हवी…..एकदा त्यांच्यावरती ताबा मिळवला की झालं…. मनात गोष्ट पक्की करायची, त्यांच्यामागे लागायचं, यांसाठी काही ध्येय डोळ्यांसमोर ठेवावी लागतील….. तुम्हाला आभाळाएवढी स्वप्न बघावी लागतील, तुमच्या सध्याच्या परिस्थितीवरुन तुम्हालां ते अशक्यप्राय वाटेल…..

Once in a lifetime....!

लेखक डॉ श्रीहास यांनी शनिवार, 12/09/2020 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...

वेढा

लेखक rushikapse165 यांनी शनिवार, 12/09/2020 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
अंकिता. . . . . . .

डोक्याला शॉट [चतुर्थी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शुक्रवार, 11/09/2020 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
मला लिहिते करण्यात मोलाची भूमिका बजावणारे जेष्ठ मिपाकर अविनाश कुलकर्णी (अकु काका) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना. ***** ब्रह्मांड लोकातून चिन्मय परत आल्यावर बोललेला नवस फेडायला जानकी बाई लगेच पुढल्या दोन दिवसांनी काशी यात्रेला गेल्या होत्या. काशी यात्रेहून परत आल्यावर चिन्मयही आता पूर्वीपेक्षा जरा बरा वागू लागल्याचे पाहून त्यांनी अप्पा राशीनकरांकडे त्याला कुठेतरी नोकरीला लावण्यासाठी शब्द टाकला. अप्पांनीही त्वरित त्यांच्या परिचयाच्या सरकारी कामांचे कंत्राट घेणाऱ्या एका कंत्राटदाराकडे त्याला नोकरीला लावले होते.

कोव्हीड माझा अनुभव

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 10/09/2020 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
कोव्हीड माझा अनुभव करोनाची साथ आली तेंव्हापासून मी आणि माझी पत्नी दोन्ही वेळेस दवाखान्यात जातच होतो. हा रोग आपल्याला केंव्हा ना केंव्हा तरी होणार हे माहितीच होते. याचे कारण येणाऱ्या रुग्णांपैकी कोणी ना कोणी कोणतेही लक्षण नसणारा रोगवाहक( asymptomatic carrier) असणारच होता. त्याशिवाय इतरत्र म्हटल्याप्रमाणे आपण भारतीय लोक बेजबाबदार आहोत हे आपण परत परत सिद्ध करून दाखवत असतो. बायको गरोदर असताना सुद्धा दवाखान्यात मास्क न घालणे, मास्क नाकाच्या खाली ठेवणे, वाल्व्ह असलेला मास्क घालणे, बोलताना मास्क काढून बोलायला सुरुवात करणे, दोन खुर्च्यात ५ फुटाचे अंतर ठेवले तरी खुर्ची सरकवून जवळ येऊन बसणे.

शिक्षक दिन

लेखक कवि मनाचा यांनी बुधवार, 09/09/2020 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
५ सप्टेंबर... शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. छोट्या-छोट्या प्रसंगातून शिक्षक-विद्यार्थ्यातले संवाद व त्याद्वारे समजलेली शिक्षणमूल्ये लिहिण्याचा हा एक प्रयत्न... ------------------------------------- एक आई आपल्या लहानग्या मुलाला शिकवते की, जीवनात नेहमी चांगल्या लोकांची संगत धरावी. चांगली संगत असेल तरच तुझी प्रगती होईल. वाईट संगत तुला वाईट मार्गावर नेईल. म्हणून देवाची तू प्रार्थना कर - "देवा, मला आयुष्यात नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात ठेव." वाचनाची आवड लागावी म्हणून आई त्या मुलाला गावातल्या सार्वजनिक वाचनालयात जाण्याची सवयही लावते. मुलगा वाचनालयात जाऊन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. सी. व्ही.

कोव्हीड आणि फसवणूक

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 08/09/2020 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
कोव्हीड आणि फसवणूक तीन दिवसापूर्वी मी आणि माझे संपूर्ण कुटुंब करोना विषाणूच्या आजारातून मुक्त झालो. या वेळी सामाजिक विलगीकरणामुळे माझी डोमिनार मोटार सायकल २१ दिवस बंद होती. ती सुरु करण्याच्या प्रयत्न केला असता त्याची बॅटरी उतरली असल्याचे लक्षात आले. डोमिनार या ४०० सीसी ३४ हॉर्स पॉवर च्या मोटार सायकलला किक नाहीच. त्यामुळे बॅटरी नसेल तर ती चालू होतच नाही. यासाठी मी मुलुंड पूर्व ९० फूट रस्ता येथे असलेल्या बजाजच्या सर्व्हिस सेंटर मध्यें फोन केला त्यांनी आपला एक माणूस पाठवला आणि माझ्या मोटर सायकलमधली बॅटरी काढून चार्जिंग साठी नेली.

अचूम् आणि समुद्र (भाग २)

लेखक डॅनी ओशन यांनी मंगळवार, 08/09/2020 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
अचुम् आणि समुद्र (भाग १) मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे. मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला: “अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे, शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे. ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे, तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.” मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात. यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता. असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:

संवाद सूत्र

लेखक पाटिल यांनी रविवार, 06/09/2020 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
"काय रे? काय चाललंय?" - - अरे वा वा.. अगदी वेळेवर आलास.. हे वाच. "काय्ये हे??" - - हे जग हलवून टाकणारं, अद्भूत आणि कालातीत असं लिखाण केलेलं आहे मी आत्ताच.. तूच माझा पहिला वाचक. "आई ग्ग.." - - वाच वाच... आता कळेल त्यांना मी काय चीज आहे ते..! अर्थात हे गंभीर आणि अभिजात लिखाण तुला झेपणार नाही... पण सावकाश वाच... मग समजेल. "काय्ये हे..! नुसता शेणसडा है सगळा आणि जोडीला हंबरडे न् हुंदके..!" - - अरे वेड्याss... ह्या माझ्या तिच्याबद्दलच्या तरल भावना आहेत.. आणि हे सगळं शब्दांत पकडताना माझा आत्मा पार सोलवटून निघालाय रे ss.. "कशाला पकडलं मग शब्दात..??

नोकरी ते उद्योजकता: एक ध्येय वेडा प्रवास!

लेखक केडी यांनी मंगळवार, 01/09/2020 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
Shvaan मी स्वयंपाक कधी करायला लागलो हे खरेच आठवत नाही, पण स्वयंपाक करायला लागलो याचे कारण मात्र माझे बाबा होते. बाबा मुळातच खवय्ये होते आणि आई सुगरण, त्यामुळे आमच्या घरात चमचमीत पदार्थांची रेलचेल असायची. बाबांच्या या खवय्येगिरीमुळेच असेल कदाचित, मला स्वयंपाक करायची आवड निर्माण झाली.