Skip to main content

प्रकटन

तू असता तर...!

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 01/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रीतीची मौज राजसा फेसाळते किनाऱ्यावर.. हात घेऊनी माझा हाती सजणा, तू असता तर......! सोनेरी रुपेरी रंगांची ही नक्षी उमटे रेतीवर त्या नक्षीमध्ये रंग भरण्या सजणा, तू असता तर......! बघ क्षितिजाला भेटे नभ हे चढली लाली पटलावर लाली ती मम भाळी भरण्या सजणा, तू असता तर......! फिदा लहरी रूपावरी त्या चंद्रमा झळके अवनीवर चांद तो मम मुखी पाहण्या सजणा, तू असता तर......! खर्जातली ऐक गाज त्याची खारा वारा अंगावर कुंतल माझे मुक्त करण्या सजणा, तू असता तर......! - प्राजु. ( मनोगत दिवाळी अंकात ही कविता प्रकाशित झाली होती.)
Taxonomy upgrade extras

सांज..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 01/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
संधिकालचे गीत ओठी घेऊन सांज आली अंबराला नवी किनार देऊन सांज आली घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली गुरे वासरे आणि पाखरे घरी परतलेली अस्ताचलाच्या झळाळीला बिलगून सांज आली संपला कोलाहल अन् चाहूल लोपलेली उदास नूर त्या बाजाराला देऊन सांज आली पाऊलाला घरट्याची त्या ओढ लागलेली वाटेवरती नजर कोणती लावून सांज आली तप्त चेतना, शुष्क ओठ अन् गात्रे थरारली गूज रात्रीचे सांगत वेडी लाजून सांज आली.. - प्राजु
Taxonomy upgrade extras

सरदारजीचे पत्र

लेखक सुनिल डोईफोडे यांनी मंगळवार, 29/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.
एका सरदारजीने आपल्या नातेवाईकाला पत्र लिहिले आणि चूकीने To च्या जागी त्याच्या नातेवाईकाच्या नाव आणि पत्याच्या एवजी स्वतःचा नाव आणि पत्ता लिहिला. आणि From च्या जागी स्वत:चे नाव आणि पत्याच्या एवजी त्याच्या नातेवाईकाचे नाव आणि पत्ता लिहिला. पहिल्या डाकेने पत्र गेले पाहिजे म्हणून सकाळीच पोस्टाच्या पेटीत नेवून टाकले. दूपारी तेच पत्र घेवून पोस्टमन सरदारजीच्या घरी पोहोचला. पत्र घेवून सरदारजीने आलटून पालटून बघितले आणि पोस्टमनला म्हणाला " वा वा भाई कमाल होगया... तुमचं पोस्ट डीपार्टमेंट केव्हापासून एवढं प्रॉम्प्ट झालं ..

विडंबनः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी

लेखक अविनाश ओगले यांनी शनिवार, 26/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.
भातुकलीच्या खेळामधली... या कवितेचे विडंबन (प्रा. विसुभाऊ बापट यांच्या "कुटुंब रंगलंय काव्यात" या कार्यक्रमाच्या १००१व्या प्रयोगानिमित्त आयोजित विडंबन स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त विडंबन...
Taxonomy upgrade extras

संथ चालते मालिका ही...

लेखक अविनाश ओगले यांनी शनिवार, 26/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.
संथ चालते मालिका ही... 'पात्रे' बदलून का होईना पण बारमाही वाहणा-या सर्व मराठी मालिकांना अर्पण.. (संथ वाहणा-या कृष्णामाईची क्षमा मागून..) संथ चालते मालिका ही... दर्शक देती दीर्घ जांभया, जाणीव तिजला नाही! कथानकाचा थांग न लागे पुढे तीळभर, गहूभर मागे 'मार्गी' झाली म्हणता म्हणता क्षणात 'वक्री' होई.. संथ चालते मालिका ही... नसे कुणी का तिला नियंता कंटाळून करी प्रश्न ही जनता नदीस फुटावे नाले, ओहळ, तशी 'वाहवत' जाई.. संथ चालते मालिका ही... सूना, सासवा, आजी, नाती मालिकांचे च्युईंगम खाती सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही... संथ चालते मालिका ही... -अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras

तुकयाची अवली.. .. अवलोकन

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 22/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, १५ दिवसांपूर्वी पुण्यांत "तुकयाची आवली" या प्रा. सौ. मंजुश्री गोखले यांच्या मेहता प्रकाशन ने छापलेल्या कादंबरीचे औपचारिक प्रकाशन झाले. हि कादंबरी नुकतीच मला वाचायला मिळाली. आवलीवर आजपर्यन्त जे वाचले ऐकले होते त्यापेक्षा काय वेगळे आहे हे पाहण्यासाठि ही कादंबरी वाचायला घेतली. आणि खरं सांगते, ती वाचायला सुरूवात केल्यानंतर पूर्ण करूनच खाली ठेवली. झपाटल्या सारखी मी ती वाचली. त्याबद्दल थोडेसे.. लेखिकेची भूमिका : आवली , संत तुकाराम महाराजांची द्वितीय पत्नी, एवढि आणि फक्त एवढीच ओळख आहे आवलीची.

श्वासालाही उघाणं आलं.

लेखक raje1981 यांनी रविवार, 20/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज श्वासालाही उघाणं आलं तिला मिटीत घेताना चुकत होते ठोके काळ्जाचे तिला मिठीत घेताना तिचा श्वासही थाबंला आज त्या भेटीच्या वाद्ळांत जराही नाही लवल्या पापण्या तिला डोळ्यात भरताना. आज मनालाही उधाणं आलं तिचा हात मुठीत धरताना थरथरत होते काळीज तिचे कुशीत माझ्या शिरताना हलकी लहर जरी आली तरी तो वादळांचा भास होता आज काळजातही चमक्ल्या विजा तिला जवळ घेताना. मग डोळ्यांनाही उधाण आलं ओठ तिचे पाहताना मग मान वळवली तिने एका श्वासाचं अतंर असताना कापत होते ओठ तिचे पून्हां मागे वळून पाहताना मग ओठांनीच ओठांना शातं केल डोळे बंद असताना.
Taxonomy upgrade extras

विरोप

लेखक अनिला यांनी शुक्रवार, 18/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.
उघडली गवाक्षे फिरू लागली धरा तुज पत्र लिहाया झाले मी आधिरा टिचकीने एका ताव मिळे लिहाया @च्या गोलात पत्ताही दडे नेमका टपटपली अक्षरे उलगडती भाव मनीचे अक्षरेही घेती आकार रंग निराळे मज भासे ते ते लिहिले विद्युत डाकी टिचकीने एका क्षणात तुजला धाडी पावली लगोलग मज रे पोच पावती भासली जणू रे तुझीच ही सावली या कृती जरी असती यांत्रिक तावातिल शब्द सुवासिक मंत्रित मी मंत्रमुग्ध अन धुंद भान गंधित तुज होईल का रे आशीच ही लागण उघडली गवाक्षे फिरू लागली धरा तव पत्र पहाया झाले मी अधिरा
Taxonomy upgrade extras

हे स्वप्ना तु स्वप्नात माझ्या येऊ नको.........

लेखक छत्रपति यांनी मंगळवार, 15/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.
हे स्वप्ना तु स्वप्नात माझ्या येऊ नको......... मनाच्या विवंचनाना आज तु विचारांचा हळवा स्पर्श केलास. स्तब्ध झालेल्या सागरामध्ये क्षणात लाटांचा तांडव निर्माण केलास. मन माझ् आधिर झालं.. तुझ्या आठवणींनी बेजार झाल. परत परत त्याच वळणावर् कस काय् चालायला तयार झाल?
Taxonomy upgrade extras