डॉक्टर तुम्हीच सांगा
परवा एका लग्नाला गेलो होतो त्यानंतर आमच्या मित्राचे सासर शेजारच्या बिल्डींग मध्ये आहे म्हणून त्यांच्या घरी( तिसर्या -पुण्याच्या भाषेत चौथ्या मजल्यावर) गेलो होतो.
मित्राचे सासरे बुवा म्हणाले कि डॉक्टर आजकाल जरा काही खाल्ले कि पोटाला तडस लागते. एकंदर त्यांच्या पोटाचा आकार पाहून ते "जरा काही" खात असतिल असे वाटत नव्हते. म्हणून मी त्यांना विचारले कि साहेब तुम्ही आता धावत जिना चढता का ? त्यावर ते म्हणाले कि अहो मी रिटायर झालो तिसरा मजल धावत चढणे कसे शक्य आहे? मग मी विचारले तुम्ही चष्मा का लावता? ते म्हणाले चाळीशीचा चष्मा आहे. मी परत विचारले कि तुमचे अर्धे केस गेले आणि उरले अर्धे पांढरे का झाले?
मिसळपाव