Skip to main content

प्रकटन

पुर्वसुचना

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 20/08/2013 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे नरेंद्र दाभोळकर ह्यांची हत्या करण्यात आली . अत्यंत निषेधार्ह घटना . समाजाच्या सर्वच स्तरातुन ह्या घटनेचा जोरदार निषेध होत आहे . पण
ज्या विचारांनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच विचारांनी आज डॉ.

भ्रष्टाचाराचा उड्डानपुल

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 20/08/2013 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज लोकसत्तेत आलेल्या बातमीने माझे लक्ष वेधुन घेतले... ती बातमी पुढील प्रमाणे आहे :- कमकुवत ‘सांध्यां’मुळे ठाण्यातील उड्डाणपूल धोक्यात माझ्या लहानपणी मी या पुलाची प्रस्तावीत उड्डानपुल अशी शासकिय पाटी वाचल्याचे स्मरते ! त्या पुलाचे बांधकाम २००८ साली सुरु होणार होते. तो पुल अजुन पूर्ण होउ शकला नाही त्यातच या आजच्या बातमीची भर पडली ! २००९ साली 'एमएमआरडीए'च्या निधीतून ठाणे शहरात कापूरबावडी फ्लायओव्हर, घोडबंदर रोडवरील तीन फ्लायओव्हर आणि शहरातील तीन फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहेत.

आरोग्य पंचविशी- २ -- गंधार

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 20/08/2013 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
गंधार पंचेन्द्रीयातील पहिले इंद्रिय आणि मानवाची आद्य संवेदना म्हणजे घ्राणेन्द्रीय शक्ती सर्वात आदिम प्राणी म्हणजे अमिबा सारखा एक पेशीय प्राणी सुद्धा आपल्या पेशीच्या भिंतीतून झिरपणार्या अणुरेणु ची रासायनिक तपासणी करून आजूबाजूच्या वातावरणाची माहिती काढत असतात. मुळ वासाची शक्ती म्हणजे वेगवेगळ्या रसायनाची संवेदना मेंदूला देणे. हि शक्ती अंधारात उन्ह पावसात रात्री बेरात्री सुद्धा काम करीत असते आणि प्राणी मात्रांना सभोवतालच्या वातावरणाची जाणीव करून देत असते. प्राण्यांच्या आहार निद्रा भय आणि मैथुन या चार मूलभूत अंतरप्रेरणा सुद्धा वासाच्या शक्तीवर अवलम्बून असतात.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

लेखक धर्मराजमुटके यांनी मंगळवार, 20/08/2013 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पुण्यात ओंकारेश्वर पुलावर सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. जरी त्यांच्या विचारांबाबत मतभेद असले तरी अशा प्रकारच्या हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे हे निश्चित ! डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

गेम कुणाचा होणार ?

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 20/08/2013 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागे म्हटल्याप्रमाणे २०१४ च्या निवडणूकीचे वेध सगळ्यांनाच लागले आहेत. सर्वच आघाड्यांवर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मागील कित्येक वर्षात देशपतळीवर प्रभाव टाकेल असा खासदार पुण्याने दिलेला नाही. तरीही पुण्याची निवडणूक अनेक कारणांनी गाजते. यंदाच्याही निवडणूकीबाबत अशीच उत्सुकता आहे. कोण कोण आहेत इच्छुक ? त्यापूर्वी हे जरूर पाहावे यापूर्वीच्या गेम्स

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (१)

लेखक शिवोऽहम् यांनी सोमवार, 19/08/2013 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
=============================================================================== आंतरजालावर असलेल्या अनेक स्रोतांवर हे लेखन आधारित आहे. येणारी वळणं, त्यांचा क्रम, किंवा कमी-अधीक गडदपणा माझा म्हणावा. संदर्भ आणि स्रोत शेवटी देईन म्हणतो. =============================================================================== पियुष मिश्राबद्दल बरंच बोलता येईल. पण आधी ताजी ओळख.. आजकाल बर्‍याच चित्रपटातुन दिसतो. वासेपुर १ आणि २ मध्ये नासिरचा रोल केलाय त्याने. वासेपुरच्या लंब्याचवड्या श्रेयनामावलीत कदाचित सुटुन जात असेल हे नाव पण नासिरचे कॅरेक्टर लक्षात रहातेच.

श्रद्धा

लेखक अर्धवटराव यांनी सोमवार, 19/08/2013 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. आज आम्हि एका कुलीन स्त्रीची फर्याद घेऊन मिपा दरबारी हजर झालो आहोत. या बयेचं नाव आहे श्रद्धा. हिच्या बद्दल आम्हाला अपार सहानुभुती, आदर, प्रेम आणि आपुलकी आहे (... नाहि, 'ति' श्रद्धा वेगळी आहे हो... एव्हाना ति लग्न वगैरे करुन सुखाने नांदत असेल.) हिचं गार्‍हाणं असं आहे कि येऊन जाऊन लोकं हिला उगाच टपली मारुन जातात. विचारवंत (अस्सल, आणि खरे अस्सल) हिला "त्या" गल्ली बोळातली असल्यासारखं तुच्छ समजतात, तर अविचारवंत (अस्सल आणि निव्वळ अस्सल) हिच्या नावाने काय वाटेल ते खपवतात.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - १

लेखक तिरकीट यांनी शनिवार, 17/08/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .. मिपावर माझे हे पहीलेच लिखाण आहे. कुठला विषय घ्यावा हा विचार करताना असं मनात होतं की मिपावर आत्तापर्यंत माझ्या वाचनात न आलेला विषय घ्यावा. आपल्याकडे अश्या अनेक गोष्टी वारसा असल्यासारख्या आल्या आहेत की ज्या नवीन पिढीला वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत, घरातील थोरा-मोठ्यांचे बघून, ऐकून त्या लहान मुलांपर्यंत पोहोचतात..मग त्यामध्ये रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी यांसारखी घरोघरी म्हटली जाणारी स्तोत्रं असोत किंवा क्रिकेट सारखे खेळ असोत. याचसारखी अजून १ गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे 'गीतरामायण'...

लादेन ध्यानप्रकार

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 11/08/2013 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
अध्यात्म या विषयावर अनेक गैरसमज आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे अध्यात्म गूढ, अंधूक, धूसर, अगम्य आहे हे नसून अध्यात्माविषयी विचार करणारे बहुतेक लोकं मठ्ठ असतात हे आहे. त्यांचा हा मठ्ठपणा दूर करण्याची जबाबदारी मी नाईलाजाने स्वीकारतो आहे. तशी ती जबाबदारी 'कृपया स्वीकारा, मी तुमच्या पाया पडतो, कृपया ही जबाबदारी स्वीकाराच. नक्की...' अशी विनंती करत काही शेकडो लोकं आले होते असं नाही. मला केवळ तसं वाटतं म्हणून मी स्वीकारतो आहे. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो की जे तुम्ही करत आहात ते ठार चूक आहे.

सच्चिदानंद बाबांची गोष्ट

लेखक धन्या यांनी रविवार, 11/08/2013 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट तशी खुप जूनी. जवळपास आठशे वर्षांपूर्वीची. आताच्या आहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नावाचं गाव. गावातील मोहिनीराजाचं मंदीर थेट समुद्रमंथनातील अमृतवाटप आणि विष्णूच्या मोहीनी अवताराच्या कथेशी निगडीत. या गावातील मुख्य रस्त्यातून एका सुंदर सकाळी संन्याशी वाटावीत अशी चार मुलं, तीन मुलगे आणि एक मुलगी मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते. एकमेकांच्या पाठीला पाठ लावून जन्माला आलेली सख्खी भावंडेच जणू. चौघांच्याही चेहर्‍यावर एक अतीव समाधान, शांती विलसताना दिसत होती. वाट चालत असताना या मुलांच्या समोरुन एक प्रेतयात्रा येते.