Skip to main content

प्रकटन

कोषातून बाहेर (Ice-Breaker)

लेखक राघवेंद्र यांनी मंगळवार, 15/03/2016 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला लोकांसमोर बोलायला आवडते. (No Stage Fear) मला २-३ तासांच्या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन करता येते. (Host a Meeting) मला लोकांच्या विचारावर अभिप्राय, टिप्पणी करायला आवडते. (Evaluation) मी कोणत्याही प्रश्नावर उत्स्फूर्त १-२ मिनिटे मत देऊ शकतो. (Impromptu Speech) या वरील एखादे वाक्य तुम्हाला लागू होत नसेल तर पण लागू व्हावे असे वाटत असेल तर जगभरात या विषयावर एक संस्था कार्यरत आहे आणि तिचे नाव Toastmasters International. ही ना नफा - ना तोटा या तत्वावर चालणारी संस्था आहे.

मदत

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 14/03/2016 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
"देवा ते प्रेस नोट झाली का हो तयार?" "करतोय साहेब" "ती कॉन्फरन्सची पावती फाडा काय असल ती. पाकीटासहीत प्रेस्नोट देऊन टाका" "हो साहेब" "ते आपलं ल्याबराडार कुठं खपलंय? फोटोसहीत कव्हरेज पाह्यजे म्हणाव. नुसती हाडकं चघळाया पाय्जेत" "सांगतो साहेब" "ते फाउंडेशनचं काय लागतय का पत्ता?" "साहेब तेनी बीड ला हायत म्हणं कार्यक्रमाला" "बघावं का सांगून दादासाहबाकडून?" "नको साहेब, कव्हरेज तेनीच खातेत, आकडा बी आधीच द्यावा लागतो म्हण" "राव्ह दे राव्ह दे. आपन हाव हितं.

१५ मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने...

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 11/03/2016 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
"ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा राजा आहे; उत्पादक, व्यापारी, सेवांचे पुरवठादार इ. वर्गांचा तो पोशिंदा आहे, त्याच्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती मिळते इ. वाक्ये अर्थशास्त्राच्या पुस्तकात वाचतांना मन सुखावते. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ग्राहकाला कशी वागणूक दिली जाते याचे दर्शन याच संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सत्यकथांवरून घडते. ग्राहकाचे अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती स्थान आणि त्याचे मूलभूत हक्क यांचा प्रथम उच्चार केला तो अमेरिकेचे प्रे. जॉन एफ. केनेडी यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून तेथील प्रतीनिधीगृहात १५ मार्च १९६२ रोजी केलेल्या पहिल्या भाषणात! आपण सर्वजण ग्राहक आहोत.

भूतकथा - "दुराई"

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 11/03/2016 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणच्या समुद्रकिनार्याावरील कुचवडे गावची गोष्ट ... पक्या आणि तुक्या हे दोघे जिगरी दोस्त , सकाळी उठायचे .. मिश्री लावून चहा पीवून गावात फिरायला जायचे आणि आवश्यक ते “संशोधन” करून १० वाजेपर्यंत घरी परत यायचे ,... मग न्याहारी करून १२ वाजता सख्याच्या अड्ड्यावर जावून पावशेर गावठी दारू ढोसायची आणि मग घरी येवून जेवायचे आणि मस्तपैकी सहा वाजेपर्यंत ताणून द्यायची हा त्यांचा नेहमीचा उद्योग ....त्यांचा दिवस खर्याी अर्थाने सुरू व्हायचा तो रात्री दहा वाजल्यावर ! सगळीकडे नीजांनीज झाल्यावर मग हे दोघे वाड्यांतून आंबा काजू बागा धुंडाळायला बाहेर पडायचे !.

छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके

लेखक विवेक ठाकूर यांनी मंगळवार, 08/03/2016 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी कलाकृती किती संभाव्यता निर्माण करु शकते यावर तिची कालातीतता ठरते. आणि त्याचं एक अनोखं उदाहरण म्हणजे अमीर खुसरोचा हा क़लाम आहे : छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके ! मूळ क़लाम खाली दिलायं आणि त्याची अनेकानेक वेरिएशन्स एकेका दिग्गजानं आपल्या प्रतिभेनुसार केली आहेत. अपनी छ्ब बनाइके जो मैं पी के पास गई जो छब देखी पिहू की, तो अपनी भूल गई । इथूनच कल्ला सुरु होतो. कारण हा क़लाम सूफी़याना आहे.

गाव तस न्यार

लेखक शाहिर यांनी सोमवार, 07/03/2016 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावामंदी बगा, समदं कसा निवांत हुतं ! समदे पब्लिक गुन्या गोविंदाने नांदायचा आणि भांडायचा . त्याच असा हाये , आमच्या गावात हये एक पार, चार गल्ल्यातले चार रस्त्ये हितेच येउन टेकत्यात. दिवसभर कुठ कुठ काम करून माणस , बाया बापड्या यायच्या. चार घटका पारावर टेकायच्या, काय सुख दुख असेल तर सांगनार, कुनाला काय दवा पानी विचारणार , कुणाच्या घरी काय कालवणं याची बातमी काढणार आणि कुनी नवीन पाव्हना घावला तर येड्यात काडून रिकामा व्हनार ! सगळी टाळकी एकदम १२ **ची ! पण टाईम कसा जायचा कळ्ळाचा नाही आणी थोरामोठ्याकंन कायबाय कानावर पडायचा त्यात ज्ञानाचा मार्जिन पन निघायचा.. पन गेल्या साली घोळ झाला..

नाव सोनीबाई आणि ................

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 07/03/2016 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशी कंपन्यांची ग्राहकांप्रती इतकी बांधीलकी असते की एखाद्या ग्राहकाने त्यांचे उत्पादन सदोष आहे या कारणाने परत आणले तर वितरकांनी काहीही प्रश्न न विचारता उत्पादन परत घेऊन ते बदलून द्यावे किवा किंमत परत करावी अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात, अशा सुरस चर्चा ऐकायला मिळतात. परंतु त्याच कंपन्या भारतात कसा दुटप्पी व्यवहार करतात याचे उदाहरण म्हणून ही न्यायालयीन सत्यकथा वाचा ----- निषाद कुलकर्णी या मुंबई आय. आय. टी. च्या विद्यार्थ्याने औरंगाबाद येथील मे. सोनी एक्स्क्लुझिव या सोनी इंडिया प्रा. लि. चे अधिकृत विक्रेते यांच्याकडून २९ एप्रिल २००९ रोजी सायबर शॉट डिजिटल कॅमेरा रु. १२५००/- ला विकत घेतला.

मोदी सरकारच्या नवीन योजना

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी रविवार, 06/03/2016 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
मेक-अप इंडिया- या योजनेअंतर्गत स्त्रियांना मेक-अप चे साहित्य कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाईल. तसेच हे साहित्य वापरून सेल्फ़ी काढून 57855 या नं. वर पाठवून द्यावी, निवडक 100 स्त्रियांना 5kg तुरडाळ मोफत दिली जाईल. वेक अप इंडिया- या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेक अप इंडिया नावाचे ऍप इनस्टॉल करावे लागेल. सकाळी 4 वाजता हे ऍप आपणास आपण सेट केलेली रिंगटोन वाजवून उठवेल. अर्थात डिफ़ॉल्ट रिंगटोन "नमो नमः" ही असेल.

कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

लेखक विवेक ठाकूर यांनी शनिवार, 05/03/2016 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतिही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. यापूर्वी त्याचा जेएनयू कँपसमधे बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो.

मार्टिन क्रो यांना श्रध्दांजली

लेखक गॅरी ट्रुमन यांनी गुरुवार, 03/03/2016 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
न्यू झीलंडचे माजी क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांचे आज वयाच्या ५३ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!! Martin Crowe मार्टिन क्रो हे नाव माझ्यासाठी माझ्या लहानपणाच्या क्रिकेटवेडाने भारलेल्या दिवसांच्या अनेक आठवणी जागृत करते.