Skip to main content

प्रकटन

Mission भगीरथ

लेखक आदित्य अनिल रुईकर यांनी शनिवार, 27/02/2016 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी Advocate आदित्य रुईकर. मला वकील म्हणून आपण सगळे ओळखताच, याव्यतिरिक्त मी अनेक विषयात दीर्घ लेखन एक छंद म्हणून गेली पाच सहा वर्षे करत आहे. त्यातील काही लेखन मी प्रसिद्ध करावे असे, मला अनेक हितचिंतकांनी व मित्रांनी वारंवार सुचवल्यामुळे मी माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध करायची ठरवली. त्यादृष्टीने प्रकाशकांशी बोलणे, करार इत्यादी सुरूच आहे. पण प्रत्यक्ष कादंबरी छापून विक्रीस येण्यास थोडा अवधी लागणार आहे.

क्रिकेट शौकीन ग्राहकाचा ग्राहक न्यायालयातील षटकार !

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 26/02/2016 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
कसोटी सामन्यात फलंदाजाने एखादा टोलेजंग षटकार लगावल्यावर प्रेक्षक उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करतात. पण एखादा क्रिकेट शौकीन चक्क ग्राहक न्यायालयात जाऊन षटकार ठोकतो त्यावेळी आपण सर्व ग्राहकांनीही त्याचं असंच भरघोस कौतुक करायला हवं.  त्याचं असं झालं, दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर ३१ जानेवारी २००२ रोजी भारत वि. ऑस्ट्रेलिया असा एक दिवसाचा क्रिकेट सामना होणार होता. हरसिमरनसिंग संधू हा क्रिकेटचा जबरदस्त शौकीन! त्यामुळे त्याने लांबच लांब रांगेत उभं राहून प्रत्येकी दोन हजार रुपयांची चार तिकिटे स्वतः व आपले तीन मित्र यांच्यासाठी खरेदी केली.

तपोवन / झुरळे / प्रभु धावुनी आले

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 26/02/2016 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझी संभाजीनगर {औरंगाबाद} - जालना दौरा काही कारणामुळे बदलुन नव्या दिवशी ठरवावा लागला होता. माझ्या तिर्थरुपांनीच सर्व आरक्षण केले होते, व परत नविन तारखे नुसार येण्या-जाण्याचे आरक्षण त्यांनीच केले. आत्ताच घरी परतलो आहे आणि आज मला अनुभवता आलेला आणि तो कायअप्पावर मिपाकर मंडळी बरोबर लाईव्ह शेअर केला त्या बद्धल हा धागा आहे. प्रवास सुरु झाला तसे मी कायअप्पावर जसे जमेल तसे त्या त्या वेळीचे अपडेट्स टाकत होतो, आज {२५-०२-२०१६} परतीच्या प्रवासात तसे करण्याचा काही विचार नव्हता.

कुत्री पालन ---- भाग २ ---- बीगल

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 25/02/2016 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागाची लिंक ===> http://www.misalpav.com/node/34821 आमची स्वीटी (लॅब्रेडॉर जातीची) देवाघरी गेली आणि मी मानसीक रोगी झालो.(साधारणपणे कुत्री पाळणारे बहूतेक जण ह्या स्थितीतून जातात.) मी जिथे असेन तिथे स्वीटी माझ्या जवळच असल्याने, तिचा विरह मला सहन होईना.बायकोच्या आणि मुलांच्या लक्षांत ही गोष्ट आली.३-४ दिवस रडण्यातच गेले पण मनाला काही आराम मिळेना.शेवटी एक दिवस बायको म्हणाली की, आपण आता अजून एक कुत्री पाळू या. ह्या वेळी मात्र एक ठरवले की, मोठे कुत्रे घेण्यापेक्षा एखादे छोटे-खानी कुत्रे घेवू. छोट्या कुत्र्यांची माहिती घेतांना बरीच कुत्री

बेण आणि मी - एक ओळख.

लेखक भरत्_पलुसकर यांनी बुधवार, 24/02/2016 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
तर का मंडळी आमच्या हापिसात बेन हाय एक. ते का नाय जवा बगाव तेवा स्क्रीनला डोळे लावून बसतय अन खी खी खु खु करत असतंय. मायला म्हणलं आपून तर कटाळतो अर्धा तास एका जागेव बसून अन हे बेन कशापायी आनंदात असतंय. एक दिवस म्या हुभा ऱ्हायलो तेच्या मागं. बगत हुतो बेन काय करतंय. तर हे एक पान सरसर वरखाली करून उगा बघितल्यावानी केला आणि पुना डायरेक खाली जाउन थांबला. म्या म्हणलं काय हुतं ते बगू बी दिना. खाली येउन ते बेन हातातल्या पेनाला तोंडात धरलं अन उगा इचारात पडल्यावानी झाला. मंग एकदाचा त्यानं पेन तोंडातन भायेर काढला अन हातानं कीबोर्ड बडवाय घितला. "छान!

मावशी... मीनल मावशी

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 22/02/2016 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
आईची बालमैत्रीण... पूर्ण नाव मीनल कवळे. लग्ना आधीचं मीनल राउत. मुळची आक्षीची... आई आणि ती खुप धमाल करायचे म्हणे, कबड्डी चैंप होती म्हणे! नेशनल लेवल पर्यन्त मजल!... आई आणि मावशी आणि ग्रुप सायकल चालवायचे आक्षिच्या अरुंद रास्त्यांवरून आणि मी त्यांना बघुन घराच्या फाटकावर रडरड रडायचो... हा सीन अगदी नीट आठवतो मला, एकूणच सॉलिड मैत्री! लकीली लग्न होऊन मावशी बोरिवलीत आली... आम्ही ही बोरिवलीतच राहायचो, शाळेच्या ५मिनट अंतरावर मावशी आणि १५मिंटावर आमचं, त्यामुळे शाळा झाली की आई मावशी कडून मला घ्यायला यायची... आई माझ्या 'प्रगती'पुस्तकावर खुश नसायची म्हणून माझी शिकवणी मावशी कड़े...

राष्ट्रीय आयोगाचा सोन्यासारखा निर्णय.....

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 22/02/2016 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यासारखे मोठे सण जवळ आले की फ्रीज, टी.व्ही. अशा किमती वस्तूंच्या खरेदीवर मोठी सूट, हप्त्याने खरेदीच्या योजना, किंवा मोठी भेटवस्तू इ. चा सुकाळ असतो. यामध्ये अलीकडे स्क्रॅच कार्ड योजनेची भर पडली आहे. या योजनेमध्ये खरेदीच्या वेळी बिलासोबत एक कार्ड दिले जाते. त्यावरील एक छोटेसे आवरण खरडले की खाली एका वस्तूचे नाव, चित्र किंवा क्वचित रोख रकमेचा आकडा लिहिलेला असतो. ग्राहकाला बक्षीस म्हणून मिळालेली ही वस्तू, किंवा रक्कम देण्याची मुख्य जबाबदारी योजना जाहीर करणाऱ्या उत्पादकाची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून वस्तू विकणाऱ्या वितरकाची असते.

शोध उत्तरांचा : आपण सारे गुलाम आहोत का?

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 22/02/2016 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सारे गुलाम आहोत का? हा धागा वाचला आणि लक्षात आलं की यातील काही प्रश्न मलाही सतावत असतात. गेले काही वर्ष मी माझ्या परीने या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. ही उत्तरे शोधताना मी जमेल तितके वाचले. त्यावर विचार केला. आणि आपल्याला थोडं फार कळत आहे असं वाटू लागले. त्याआधारे मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथे माझे आकलन चुकीचे असेल तिथे नक्की सुधारणा सुचवा.
आपण सारे गुलाम आहोत का?
आपण या प्रश्नाला मुख्य प्रश्न समजू या. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय मानता यावर अवलंबून आहे.

पहाट / सकाळ!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 21/02/2016 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट / सकाळ! - नको पहाटेच म्हाणुयात, किती भिन्न असतात ह्या! कधी कधी राग येतो जेव्हा झक्क मारत उठावच लागतं! आणि कधी कधी ती पहाट इतकी प्रिय असते की झोप लागत नाही! अश्या खुप पहाट आहेत लक्षात! जास्त करून दिवाळीच्या! तेव्हा त्या गोधडीतुन बाहेर पडायला अगदी इतकं नकोसं व्हायचं! पण एखादा फटाका फुटावा तसा झोपेचा फुगा फूटायचा गजर किव्वा आईची हाक ऐकल्यावर! - अजुन अश्या पहाटांपैकी पहाट म्हणजे गावी जायच्या वेळेची! बैग रेडी.. कपडे तयार....

इन्टॉलरंस म्हणजे काय हो ?

लेखक Dinesh Satpute यांनी रविवार, 21/02/2016 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
पप्पा इन्टॉलरंस म्हणजे काय हो ? माध्यमात सुरु असलेली चर्चा ऐकून माझ्या मुलाचा मला प्रश्न. अरे इन्टॉलरंस म्हणजे असहिष्णुता..पुरस्कार वापसी करणाऱ्या लेखकांच्या मते देशात सध्या जे वातावरण आहे त्याला म्हणतात असहिष्णुता ....मी उत्तर दिले. पप्पा, मी तुम्हाला अवघड नाही तर सोपं करण्यासाठी प्रश्न विचारला आहे. बर सांगतो सोपं करून. आता हे बघ..